"माताहारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Mata Hari 2.jpg|250px|right|thumb|माताहारी]]
'''माताहारी''' ऊर्फ मार्गारिटा गरट्यूडगर्ट्‌यूड हिचा जन्म [[इ.स. १८७६]] मध्ये एक [[नेदरलँड्स|डच]] कुटुंबात झाला होता. तिचे बालपण अत्यंत श्रीमंतीत आणि चैनीत गेले होते. ती आपल्या चार भावंडांत सर्वात मोठी होती. डच लष्करातल्या कर्नल रुडॉल्फ मॅक्लिऑड यांच्याशी लग्न झाल्यानंतर तिचा लब्धप्रतिष्ठित समाजात प्रवेश झाला. नवर्‍याची डच ईस्ट इंडीजमध्ये (आताच्या इंडोनेशियात) बदली झाल्यावर माताहारी [[जावा]] बेटावर गेली.
 
माताहारीचा नवरा दारुड्या असल्याने तिचे वैवाहिक जीवन सुखाचे नव्हते. [[इंडोनेशिया]]त असताना तिने एका नाचगाणी करणार्‍या कंपनीत प्रवेश केला आणि प्रसिद्धीच्या सोयीसाठी आपले नाव माताहारी केले. [[मलाय भाषा|मलायी भाषेत]] माताहारी म्हणजे दिननयनदिवसाचा डोळा(दिनमणी) अर्थात, सूर्य. इ.स. १९०७ मध्ये माताहारी नेदरलँड्सला परत आली आणि तिने नवर्‍याला घटस्फोट दिला. नंतरे ती एक व्यावसायिक नर्तकी म्हणून पॅरिसला गेली. आपल्या सौंदर्याने आणि मादक नृत्यशैलीमुळे तिने लोकांना मंत्रमुग्ध केले. रातोरात तिचे नाव कर्णोपकर्णी होत लोकांलोकांत पोचले. तिच्या नृत्याची दिलखेचक शैली जनतेत विलक्षण लोकप्रिय झाली.
 
{{विस्तार}}
अनेक वरिष्ठ सैन्याधिकारी, राजकारणी आणि अन्य प्रभावशाली व्यक्ती माताहारीच्या संपर्कात येऊ लागल्या. या लोकांत जर्मन राजकुमारही होता. पहिल्या महायुद्धात नेदरलँन्ड्ज हे राष्ट्र तटस्थ होते. त्या काळात माताहारीने फ्रान्स, नेदरलँन्ड्ज व स्पेन या देशांदरम्यान अनेकदा प्रवास केला. एकदा जेव्हा ती स्पेनला चालली होती तेव्हा इंग्लंडच्या फॉलमाउथ बंदरात तिला हेरगिरीच्या आरोपावरून अटक करून लंडनला आणले. फ्रान्स आणि इंग्लंड यांच्या गुप्तहेर खात्यांचा माताहारीवर ती जर्मनीची हेर आहे असा संशय होता. परंतु त्यांच्याकडे त्या वेळी कोणताही पुरावा नव्हता. इतके असूनही तिच्यावर ती दुहेरी गुप्तचर(डबल एजंट) असल्याचा आरोप ठेवला गेला, आणि तिला बंदुकधारी सैन्यदलाच्या रांगेसमोर उभे करून गोळ्या घालून ठार केले गेले. ही घटना इ.स. १९१७ मध्ये घडली. तिच्या अंत्यसंस्काराला तिचे कोणाही नातेवाईक हजर नव्हते. एका प्रथितयश नर्तकीचा असा दुर्दैवी करुण अंत झाला.
 
माताहारीचे चरित्रलेखक रसेल वॉरन हाऊ यांनी इ.स. १९८५ साली, माताहारी निर्दोष असल्याचे फ्रान्स सरकारला कबूल करायला लावले.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:डच व्यक्ती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/माताहारी" पासून हुडकले