[[देवनागरी लिपी]] बऱयाच भारतीय भाषांची प्रमुख [[लेखन पद्धती]] म्हणुनम्हणून वापरली जाते आहे. जसे की [[संस्कृत]], [[पाली]], [[हिन्दी]], [[मराठी]], [[कोकणी]], [[सिन्धी]], [[काश्मीरी]], [[नेपाळी]], [[बोडो]], [[अंगिका]], [[भोजपुरी]], [[मैथिली]], [[रोमा]] इत्यादी भाषा देवनागरीत लिहिल्या जातात. देवनागरी बऱ्याच इतर भाषांप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. प्रत्येक शब्दाच्या वरशब्दावर एक रेषा ओढली जाते. हिचातिला शिरोरेषा म्हणतात. तिच्यामुळे लेखन नीटनेटके व सुंदर दिसते. देवनागरीचा विकास [[ब्राम्ही]] लिपीपासून झाला. ही एक ध्वन्यात्मक लिपी आहे जीव त्यामुळे इतर लिप्यांपेक्षा ([[रोमन]], [[अरबी]], [[चीनी]] इत्यादी) अधिक वैज्ञानिक आहे.
</div>
जगातील विविध भाषांतील बहुतांश शब्द किंवा ध्वनी देवनागरी लिपीमध्ये जवळजवळ जसेच्या तसे लिहिता येऊ शकतात आणि तुलनात्मकदृष्ट्या रोमन किंवा इतर लिप्यांपेक्षा सहजतेने लिहिलेल्या शब्दांचे हुबेहूब उच्चारण करता येऊ शकते.
यात एकुणएकूण ५२(65?) अक्षरे आहेत, ज्यात १४(18?) [[स्वर]] आणि ३८(47?) [[व्यंजन|व्यंजने]] आहेत. अक्षरांचा क्रमसुद्धा वैज्ञानिक आहे. स्वर-व्यंजन, कोमल-कठोर, अल्पप्राण-महाप्राण, अनुनासिक-अन्तस्थ-उष्म इत्यादी वर्गीकरणही वैज्ञानिक आहे.
[[भारत]] तसेच [[अशिया]] मधील अनेक लिप्यांचे संकेत देवनागरीपेक्षा वेगळे आहेत. ( [[उर्दू]] सोडून) पण उच्चारण व वर्ण-क्रम इत्यादिइत्यादी देवनागरीसारखेच आहेत. त्यामुळे लिप्यंतरण करणे सोपे जाते. देवनागरी लेखनाच्या दृष्टीने सरळ, सुंदर आणि वाचनाच्या दृष्टीने सुपाठ्य आहे.