4.लैंगिकः- दारू पिणाऱ्या माणसाला संभोगाची इच्छा होते परंतु लींगास आधीसारखी ताठरता येत नाही दारू पिल्याने लैंगिक इच्छा वाढली तरी लैंगिक सुख कमी होते.
व्यसनमुक्तीचे काम करणाऱ्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. जसे की, [[अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस]], [[मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र,येरवडा,पुणे]] इत्यादी.
लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) यांनी व्यसनमुक्ती साठी अनेक वगनाट्ये लिहिली आणि आपल्या कलापथका च्या माध्यमातून ती संपूर्ण महाराष्ट्रात सादर केली.<ref>“बी के मोमीन यांचे साहित्य लोकजागृती करणारे - गृहमंत्री वळसे पाटील”, "दै.लोकमत", Pune, 22-Nov-2021.</ref><ref>'रिवायत' पुस्तक प्रकाशन सोहळा, [https://www.linkedin.com/posts/tamanna-inamdar-2a4241219_research-writer-publishing-activity-6835869469940744192-KQIF], 28-ऑगष्ट-२०२१</ref><ref>[https://puneprimenews.com/latest-news/gangarambuwa-kavthekar-who-sacrificed-his-life-for-social/ “बुवांची ढोलकी आणि भाईंची गाणी राज्यभर गाजली…!!! समाज जागृती साठी आयुष्य वेचणारे गंगारामबुवा कवठेकर व बी. के. मोमीन कवठेकर”], ‘Pune Prime News’, 09-Nov-2022</ref> मोमीन कवठेकर लिखित खालील लोकप्रिय वगनाट्ये पुणे आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारित करण्यात आली आहेत.<ref>वैजयंती सिन्नरकर, [शब्दगंध : लोककला - वग ], "दै. देशदूत, नाशिक, 22-Oct-2023"</ref><ref>[https://www.lokmat.com/pune/senior-literary-b-k-momin-passed-away-fifty-years-contribution-literary-world-a607/ ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर काळाच्या पडद्याआड; साहित्य विश्वाला पन्नास वर्षांचे योगदान ] "दै.[[लोकमत]]”,पुणे, 12-Nov-2021</ref>
*'दारू सुटली चालना भेटली'
*'सोयऱ्याला धडा शिकवा'
*'दारूचा झटका संसाराला फटका'
मोमीन कवठेकरांचे ‘व्यसनमुक्ती अभियान' उपक्रमांमध्ये असलेला सक्रिय सहभाग आणि त्यामाध्यमातून सामाजिक कार्यात त्यांनी दिलेल्या योगदानाची दाखल घेऊन, शासनाने ‘व्यसनमुक्ति पुरस्कार' देऊन सन्मानित केले<ref>[https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/vithabai-narayangaonkar-lifetime-achievement-award-bashir-kamroodin-momin/articleshow/68226068.cms बशीर मोमीन (कवठेकर)],"संपादकीय लेख" [[महाराष्ट्र टाइम्स]], २-मार्च-२०१९ </ref>.
व्यसनमुक्ती या विषयावर विविध लेखकांची पुस्तके सुद्धा आहेत.