"जातिनिहाय आरक्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
बदल साचा |
|||
ओळ १४:
==घटनाविरोधी राजकीय पक्ष, कायदे मंडळे आणि सरकार==
एकेकाळी आरक्षणाचा विषय हा न्याय आणि समतेचा होता आणि त्यामुळे तो थेट राज्यघटनेशी संबंधित होता. पण हळूहळू हा विषय न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर काढला गेला. आता राष्ट्रपती, संसद, विधानसभा, मुख्यमंत्री हा संस्थात्मक पसारा राज्यघटनाविरोधी होतो आहे. राजकीय पक्षदेखील न्यायाच्या विरोधात जात आहेत. सरतेशेवटी उच्च जाती व वर्चस्वशाली जातीदेखील न्यायविरोधी, समताविरोधी आणि समानसंधी-विरोधी भूमिका सुस्पष्टपणे घेतील असे वाटते.
==महाराष्ट्रात कुणबी होण्यासाठी लाखोंची उधळण==
कुणबी जात ज्या मागास प्रवर्गात मोडते त्या प्रवर्गासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत २७ टक्के जागा राखीव असतात. ज्या प्रवर्गात आगरी, कसाई, कुंभार, खाटिक, गारोडी, गुरव, जंगम, तांबोळी, तेली, त्वष्टा कासार, न्हावी, मानभाव, माळी, लोहार, शिंपी, सुतार, सोनार आदींसह ३४१ जातींचा समावेश होतो, त्याच प्रवर्गात कुणबी जातही येते. कुणब्यांमध्ये कुणबी मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार या पोटजातींचा समावेश होतो.
कोणतीतरी निवडणूक लढवणे ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात एक प्रतिष्ठेची प्रवृत्ती झाली आहे. मात्र आपला मतदारसंघ राखीव झाला तर निवडणुकीची संधी हुकू नये यासाठी ‘कुणबी’ जातीचे दाखले मिळवण्याची शक्कल लढवली जाते. कुणबी म्हणजे शेतकरी, त्यामुळे उमेदवाराच्या आधीच्या पिढ्यांपैकी सख्खे किंवा चुलत आजोबा, पणजोबा यांपैकी कुणाचीतरी जात कागदोपत्री ‘कुणबी’ अशी नोंदलेली असली की काम होते. त्यामुळे पूर्वी उच्च जातीचे ९६ कुळी मराठा म्हणून मिरवणारे, कुणबी होण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात.
|