"बनगरवाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''बनगरवाडी''' हे [[व्यंकटेश माडगूळकर]] यांनी इ.स.१९५५ साली लिहिलेले पुस्तक आहे.
==कथानक==
'बनगरवाडी'तून व्यंकटेश माडगूळकरांची प्रयोगशीलता प्रत्ययास येते. रुढ अर्थाने ह्या कादंबरीला कथानक नाही. बनगरवाडी नावाच्या ह्या लहानशा गावातील सामूहिक जीवनाचे विविधांगी चित्रण तीत केलेले आहे. तेथील उजाड व निष्पर्ण सृष्टी, तेथील कंगालपणा, दुष्काळ, तेथील सण, उत्सव, रूढी, परंपरा, श्रद्धा, संकेत, तेथील रहिवाशांच्या जीवनांतील चढउतार ह्यांना जिवंत शब्दरूप लाभले आहे. येथे कोणी विशिष्ट व्यक्ती नायक वा नयिका नाही. बनगरवाडी ह्या गावालाच नायकत्व देण्यात आलेले आहे. इंग्रजी, डॅनिश ह्या भाषांतून ही कादंबरी अनुवादिली गेली आहे. (इंग्रजी- द व्हिलेज हॅड नो वॉल्स, डॅनिश-Landsbyen).
[[वर्ग:व्यंकटेश माडगूळकरांचे साहित्य]]
|