"कुमार सानू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
 
== जीवन ==
कुमार सानूने ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात [[मुंबई]]त येऊन गायनक्षेत्रातील आपला संघर्ष सुरू केला. सुरूवातीस [[कल्याणजी-आनंदजी]] यांच्या स्टेज शो मध्ये गाऊन व विख्यात गझल गायक [[जगजीत सिंग]] यांचे कडून [[हिंदी भाषा]] व [[उर्दू]] या भाषेतील बारकावे त्याने शिकून घेतले. तत्पश्चात कुमार सानूने [[टी सिरीझ]] या संगीत कंपनीसाठी [[किशोर कुमार]] यांच्या जुन्या गीतांचे कव्हर वर्जन गायले व ते ''यादें'' व ''किशोर की यादें'' अशा नावाखाली प्रसिद्ध झाले. याच वेळी त्याला [[गुलशन कुमार]] याने [[नदीम श्रवण]] या नवीन संगीतकारांबरोबर [[आशिकी (चित्रपट)|आशिकी]] या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. 'आशिकी 'ने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडून काढले व त्यानंतर कुमार सानू याने मागे वळून पाहेले नाही . सुमारे १५ वर्षे त्यांनी बॉलीवुडाध्येबॉलीवुडमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले.
 
आजतागायत त्यांनी २० भाषांतील सुमारे २०,००० गाणी गायली असून सलग ५ वेळा सर्वोत्तम गायकाचा फिल्मफेरफिल्मफेअर पुरस्कार पटकावणारा हा एकमेव गायक आहे. एकाच दिवसात २८ गाण्यांचे ध्वनिमुद्रण करण्याचा त्यांचा विक्रम इ.स. १९९३ साली गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदला गेला.
 
== बाह्य दुवे ==