"बॉम्बे-१७ (नाटक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ३:
मुंबईतील झोपडपट्टीतील माळ्यावर राहणार्‍या सुशिक्षित, बेरोजगार, प्रौढ तरुणाची सर्वच बाबतीत होणारी कुचंबणा, आणि त्यातून त्याच्या मनःपटलावर सतत येणार्‍या नाना प्रकारच्या विचारांचे "काहूर" म्हणजे
बॉम्बे -१७.
 
==नाटकाचे कथानक आणि सादरीकरण==
संपूर्ण नाटक हे एक रात्रीची कहाणी आहे.या रात्री नायकाला वस्तीत सुरू असलेले एकतारी भजन, शेजारच्या म्हातारीची खोकल्याची उबळ, माळ्यावरील उंदरांचा सुळसुळाट, मच्छरांची गुणगुण, घाम, जोरात आलेली लघवी इत्यादी इत्यादीविविध कारणांमुळे झोप येत नाही. या निद्रानाशामुळे तो त्याच्या मनात येणारे विचार प्रेक्षकांसमोर मांडतो. यात तो खाली उतरून झोपलेल्या सर्वाना त्रास न देता माळ्यावरील पाईपच्या सहाय्याने जोरात लागलेल्या लघवीला वाट करून देतो असे दाखवले आहे, हे खूपच विचित्र आहे.
 
नाटकाचा नायक एकांतात राहून राहून तो कानावर पडणारे सर्व आवाज ओळखण्यात प्रवीण होतो. घराच्या गल्लीत रात्रीच्या शांततेत कुणी मुतत असेल तर त्या आवाजावरून तो ओळखतो की कोणती बाई मुतून गेली असेल. हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे. आणि ’शेजारची अमुक बाई मुतून गेली म्हणजे पहाट झाली असेल का?’ हे वाक्य सतत २-३ वेळा नायकाच्या तोंडी घालून नाटकाची पातळी घसरवली आहे. शेजारची बाई मुतून जाणे, हातभट्टीच्या दारूच्या पिशव्यांची ने-आण यावरून नायक वेळ किती झाला असेल याचे गृहीतके मांडतो हे मनाला पटत नाही. २ वेळच्या जेवणाची सोय घरात असताना १०० रुपयांचे घड्याळ घरात नाही असे एकही घर आढळणार नाही. परंतु नको असलेला मसाला भरण्यासाठी लेखकाने अशा काहीही गोष्टींची बजबजपुरी नाटकात केली आहे जी उत्तरोत्तर नाहक वाटते
 
==लेखकाच्या डाव्या विचारणीच्या निदर्शक गोष्टी==
चुकीच्या प्रमेयांवर आधारित अश बर्‍याच गोष्टी नाटकात आहेत. त्यांतील काही लेखकाची मूळ वैचारिक बैठक दर्शवणार्‍या आहेत.
 
नायकाचा मित्र बनसोडे हा डाव्या चळवळीचा कार्यकर्ता म्हणून प्रेक्षकांसमोर येतो तो पोलिसांचा ससेमिरा मागे घेऊन, नाटकाचा नायक हा त्याच्या ’चित्रच काढायचं न मग तुमच्यातल्याच त्या संत रोहिदासाचे काढ ना’ या बोलण्यावरून तो चर्मकार समाजातून आलेला आहे हे समजते. तर हा बनसोडे दलित आणि त्यात कम्युनिस्ट चळवळीत गेलेला, नायक त्याला जयभीम कॉम्रेड' असं संबोधतो. हा बनसोडे नायकाला बंदुकीच्या नळीतून सत्ता कशी मिळवता येते. या मार्क्सवादी विचारांवर चर्चा करतो आणि नायकाला या चळवळीत काम करायला प्रवृत्त करतो असे दाखवले आहे, पुढे हाच बनसोडे गडचिरोलीला आदिवासींच्या प्रश्नांवर आंदोलन करताना पोलिसांकडून नक्षलवादी म्हणून मारला जातो. तेव्हा ’साला आपण गांडू, याच्यासोबत गेलो असतो तर बरे झाले असते निदान असे या माळ्यावर खितपत पडलो नसतो’ या नायकाच्या स्वगतावरून संभाजी भगत यांना काय सूचित करायचे आहे? आंबेडकरी तरुणांना आता कम्युनिस्ट चळवळी शिवाय पर्याय नाही? तरुणांनी व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी कम्युनिस्ट चळवळीत सामील व्हावे काय? असे बरेच अनुत्तरीत प्रश्न नाटकाचा एक भाग आहे. या सर्व गोष्टींमुळे या नाटकाद्वारे समाजात चुकीचा समज जात आहे.
 
==मुठ्या मारणे==
आणखी एक विषय जो या नाटकात येतो तो म्हणजे "मुठ्या मारणे" अर्थात पुरुषांचे हस्त मैथुन, " या एका विषयाला नको तितक्या प्रमाणात पुढे ताणले आहे त्यामुळे या गंभीर विषयाचे भजे झाले आहे. पुढे मग या प्रकारामुळे (मुठ्या मारण्याने) नायकाच्या अंथरुणावर कसे डाग पडले आहेत, वीर्याच्या त्या डागातून त्याला पृथ्वीवरील सर्व देशांचे आकार कसे दिसतात हे या गंभीर विषयाची तोडमोड करून टाकणारे आहे.
 
==नाटकातील नायकाच्या कुचंबणेचे चित्रण==
शेजारच्या खोलीतील माळ्यावर असलेल्या नवविवाहित जोडप्याचे प्रणयप्रसंगातील आवाजावरून नायकाच्या मनाची घालमेल, सुशिक्षित असून बेरोजगार आणि त्यामुळे समाजात आणि घरात होत असलेली कुचंबणा, अंगभूत असलेल्या इतर कलागुणांची उपेक्षा, प्रेम प्रकरणात आलेले नैराश्य आणि एकंदर आयुष्याकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी संभाजी भगत यांनी चांगली रंगवली आहे. वडिलांच्या तंबाखू खाण्यामुळे कर्करोग होऊन खंगून झालेला मृत्यू आणि बहिणीचा नवर्‍याच्या दारूमुळे उद्ध्वस्त झालेला संसार हे प्रसंग पाहताना अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी येते. अशा प्रसंगात वापरण्यात आलेले ध्वनी संयोजन आणि प्रकाश योजना अफलातून आहेत.
 
==नाटकातील जमेच्या गोष्टी==
बॉम्बे-१७ या नाटकात बर्‍याच गोष्टी आक्षेपार्ह असल्या तरी नाटकात एकूणच संहितेला साजेसे असे नेपथ्य आणि प्रकाश संयोजन असून, सुनील तांबट यांचा बेरकी आणि सशक्त अभिनय अप्रतिम आणि देखणा आहे. झोपडपट्टीमधील एका छोट्या पत्रावजा घरातील पोटमाळा आणि त्यावरील एकंदर सामानाची अडगळ दाखवण्यात यश आले आहे त्यात सुनील तांबट यांचा मुद्राभिनय आणि देहबोली त्याच्या संवादाला आणखीनच गडद करते.
 
==नाटकाबद्दल सेन्सॉरचे मत==
महाराष्ट्र सेन्सॉर बोर्डाने या नाटकाला तब्बल २३ कट सुचवून, काही आशयांवर, शब्दांवर आक्षेप घेतला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या या जमान्यात नाटकाला सेन्सॉरने सांगितलेले कट आवश्यक आहेत असे समीक्षकांचे मत आहे. काही ठिकाणी विषय उगाच वाढवलेला किंवा ताणलेला वाटतो, असे ते म्हणतात.
 
==निर्मात्यांचा विरोध==
सदर नाटकावर नाट्य-परिषदेने घेतलेल्या आक्षेपांवर अद्वैत थिएटरचे संचालक आणि नाटकाचे निर्माते राहुल भंडारे यांनी तीव्र विरोध केला आहे. नाटकाच्या प्रयोगावेळी संपूर्ण टीमने काळी फीत लावून निषेधसुद्धा केला होता. लेखक संभाजी भागात यांनीही परिषदेच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच यासाठी लढा देऊ असे त्यांचे म्हणणे होते. परंतु,
 
==आक्षेप दूर केल्यानंतरचे सुधारित बॉम्बे-१७==.
पूर्वीच्या नाटकात असलेले बरेचसे संवाद या सुधारित नाटकात काढून टाकले आहेत. हस्तमैथुन हा विषय आधीच्या नाटकात अत्यंत बटबटीतपणे मांडला होता, तो या सुधारित प्रयोगात संपूर्णपणे गाळला आहे.
 
==बुद्धसंदेश==
नायक राहुल बनसोडे हा डाव्या विचारसरणीचा आणि लढा व क्रांतीची भाषा करणारा कम्युनिस्ट विचारसरणीचा आहे पण तो त्याच्या मित्राला-नाथाला ’स्वयंप्रकाशित व्हा’, असे सांगून बुद्धाचा संदेश देऊन कुठलेसे पुस्तक देतो. हे पुस्तक वाचून नाथा रक्तरंजित आणि सशस्त्र क्रांती सोडून बुद्धाच्या मार्गाने आणि कायदेशीर मार्गाने जगतो, हा गोंधळात टाकणारा मुळच्या नाटकातला शेवट सुधारित नाटकात तसाच ठेवला आहे.