"तुकाराम भाऊराव साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो 203.88.23.38 (चर्चा) यांनी केलेले बदल ज यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. |
No edit summary |
||
ओळ ५४:
}}
'''तुकाराम भाऊराव साठे''' ऊर्फ '''अण्णा भाऊ साठे''' ([[ऑगस्ट १]], [[इ.स. १९२०]] - [[जुलै १८]], [[इ.स. १९६९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक व समाजसुधारक होते. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला 'लोकनाट्य` हे बिरुद शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दिले {{संदर्भ हवा}}. अण्णा भाऊंनी [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत]] लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी
अण्णा भाऊ साठे यांनी ३३ कादंबर्या, ३ नाटके, एक प्रवासवर्णन, १३ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, १० प्रसिद्ध पोवाडे व १२ उपहासात्मक लेख लिहिले.
बंगालचा दुष्काळ, तेलंगण संग्राम, पंजाब-दिल्लीचा पोवाडा, अंमळनेरचे हुतात्मे, काळ्या बाजाराचा पोवाडा, ’माझी मैना’ हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील छक्कड, कामगार चळवळीवरील ‘एकजुटीचा नेता’ ते हिटलरच्या फॅसिझम विरोधात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, चिनी क्रांतीवरील ‘चिनी जनांची मुक्तिसेना’ हे गौरवगान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले ‘जग बदल घालुनी घाव-सांगुनी गेले भीमराव’ हे गाणे, अशी अनेक गाणी, कवने, पोवाडे अण्णा भाऊ साठे यांनी रचले. त्यांनी आपल्या गाण्यांतून, पोवाड्यांतून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले आहे.
|