"सैफ अली खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
}}
'''सैफ अली खान''' (जन्म: १६ ऑगस्ट १९७०) हा [[भारत]]ामधील एक आघाडीचा सिने-[[अभिनेता]] व निर्माता आहे. [[क्रिकेट]]पटू [[मन्सूर अली खान पटौदी]] व [[बॉलिवूड]] अभिनेत्री [[शर्मिला टागोर]] ह्यांचा मुलगा असलेल्या सैफने १९९२ सालच्या [[परंपरा (हिंदी चित्रपट)|परंपरा]] ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला ६ [[फिल्मफेअर पुरस्कार]], १ [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]] इत्यादी अनेक [[पुरस्कार]] मिळाले आहेत. २०१० साली सैफचा [[भारत सरकार]]ने [[पद्मश्री पुरस्कार]] देऊन गौरव केला. आजच्या घडीला सैफ खान भारतामधील एक आघाडीचा व यशस्वी अभिनेता मानला जातो.
 
==पद्मश्री परत घेणार?==
काही वर्षांपूर्वी ताज हॉटेलमध्ये एका एनआरआय उद्योजकाचे नाक फोडणारा बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानकडून प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. सैफच्या मारहाण प्रकरणाचा अहवाल केंद्रानं मुंबई पोलिसांकडून मागवला असून त्यावरच आता 'छोट्या नवाबां'ची 'इज्जत' अवलंबून आहे.
 
फेब्रुवारी २०१२ मध्ये सैफ अलीचे मारहाण प्रकरण चांगलेच गाजले होते. आपली गर्लफ्रेंड करीना कपूर, तिची बहीण करिश्मा आणि अन्य मित्रांसोबत 'ताज'मध्ये दक्षिण आफ्रिकेतील इक्बाल शर्मा या उद्योजकाशी त्यानं हाणामारी केली होती. त्यावरून त्याला अटक करण्यात आली होती आणि मुंबईतील किल्ला कोर्टात त्याच्यावरील आरोप निश्चितही झाले होते. त्यानंतर, माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी, सैफला देण्यात आलेला पद्मश्री सन्मान परत घेण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. त्याची दखल घेऊन, २० ऑगस्ट २०१४ ला केंद्रीय गृहखात्यानं मुंबई पोलिसांना एक पत्र पाठवले. सैफच्या हाणामारी प्रकरणाचे काय झाले आहे, खटला कुठवर आला आहे, याबाबत त्यांनी विचारणा केली होती. परंतु अजून त्याचे उत्तर आलेले नाही. त्यामुळे लवकरात लवकर अहवाल देण्याची सूचना केंद्रानं पोलिसांना केली आहे.
 
सैफ अली खान याच्यावर आणखीही गुन्हेगारी प्रकरणे सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. राजस्थानातील चिंकारा शिकार प्रकराणातही सैफ अली आरोपी आहे. मुंबईतील एका रेस्टॉरन्टमध्येही त्याने मारामारी केली होती.
 
'पद्मश्री'साठी सैफच्या नावाची शिफारस करणार्‍या सदस्याच्या नावाचा कुठेच उल्लेख नसल्याची बाब सुभाष अग्रवाल यांनी निदर्शनास आणली आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशय अधिकच वाढला आहे. त्यामुळेच सैफचा पद्म पुरस्कार परत घेण्याबाबत ते आग्रही आहेत. किंबहुना, कुठलाही आरोप असलेल्या वादग्रस्त व्यक्तींकडून असे सन्मान परत घेण्याची विनंतीवजा सूचना त्यांनी केंद्राला केली आहे. त्यामुळे, सैफसोबतच अरुण फिरोदियांच्या 'पद्मश्री'वरही टांगती तलवारच आली आहे.
 
==चित्रपट यादी==