"गीता साने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ १८:
==हिंगण्याचे शिक्षण==
१९२० साली गीताच्या वडिलांनी गीता-सीताला हिंगण्यास ठेवण्याचे ठरवले. प्रवास वेळखाऊ व त्रासदायक होता. वाशीम ते अकोला बस; पुढे मुुंबईची आगगाडी व कल्याणला उतरून पुणे व पुढे टांग्याने हिंगणे. गीता-सीताला प्रत्येकी दोन परकर, एक पोलके व एक गाठीची चोळी त्यांच्या आईने हाताने शिवून दिली. जमेल तेव्हा आणखी एकेक पोलके शिवायचे कबूल केले. रात्री पोलके धुवून वाळत घालायचे व चोळी वापरायची, सकाळी पुन्हा तेच पोलके घालायचे. सहा महिन्यांनी गोदावरीबाई आणखी एकेक पोलके शिवू शकल्या. तोवर पहिली विरली होती. हिंगण्याला एक वेगळेच विश्व गीताला दिसले. तिथल्या मोकळया वातावरणाची छाप कायम तिच्या मनावर बसली.
 
हिंगण्याला काही मुली शिक्षिका होऊन बाहेर पडत होत्या. काही नर्सिंगला जात होत्या. वेगवेगळे विचार, ध्येये कानांवरून जात असत. स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतलेली उत्तुंग व्यक्तिमत्त्वे नजरेेस पडत. ह्या सर्वांचा कायम परिणाम गीता साने यांच्या मनावर झाला. त्यांच्याबरोबर [[बाळूताई खरे]] (नंतरच्या [[मालती बेडेकर]]) होत्या. वेणूताई नामजोशी या त्यांच्या मेट्रन होत्या.
आश्रमाचा परिसर खूप मोठा होता. मुक्त वातावरणात मुली वाढत.
 
गीता सानेंनाला [[वा.म. जोशी]] यांच्यासारखे शिक्षक लाभले. वा. मं.च्या कादंबर्‍याही गीताने तेव्हा व पुढे वाचल्या. स्त्री-पुरुष यांच्यात निखळ-निर्मळ मैत्री असू शकते हे तिच्या मनावर बिंबविण्यात या कादंबर्‍यांचा हातभार होता.
 
हिंगण्याला गीता-सीता साने फक्त एक वर्ष होत्या. त्यांना व सीताला तिथे मलेरिया होऊ लागल्याने वडील त्यांना परत वाशीमला घेऊन आले.
 
हिंगण्याचे वातावरण गीता साने यांना एवढे आवडले होते की पुढे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलींना १९४८ साली, धनबाद ते हिंगणे हा १२०० मैलांचा प्रवास करून शिक्षणासाठी हिंगण्याला आणले. "संसारात पडलेली चौदा वर्षांची मुलगी बाई असते आणि हिंगण्याच्या पटांगणावर वाढलेली अठरा वर्षांची मुलगी, मुलगी असते’ असे गीता साने म्हणत.
 
==अमरावतीची शाळा==
वाशीमला आल्यावर पुन्हा त्याच गावाबाहेरच्या मिशनर्‍यांच्या शाळेत जायचे होते. पण नव्या मुख्याध्यापिकांनी नवा नियम सांगितला, की फक्त ख्रिश्चन मुलींनाच प्रवेश मिळेल. बहुसंख्य मुलींचे शिक्षण बंद पडले.
 
गीता साने यांचे वडील मुलींना मुलांच्या सरकारी शाळेत घेऊन गेले. मुलींना तिथे घेण्यासाठी भाऊंनी नागपूरहून शिक्षण खात्याची परवानगी आणली. शिक्षणाधिकार्‍याची परवानगी हेडमास्तरांची तयारी असल्यास मुलींना प्रवेश द्यावा, या अटीवर होती. १९२१ साली हेडमास्तरांनी मुली घेतल्या. पुढच्या वर्षी त्यांची बदली
झाली. नव्या हेड मास्तरांनी साफ नकार दिला. ते म्हणाले, मुली सांभाळायला त्रास होतो. ज्या थोड्या मुली मुलांच्या शाळेत आल्या असतील त्याही घरी बसल्या. गीताच्या वडिलांनी मुली अमरावतीला ठेवण्याचे ठरविले. त्याप्रमाणे ११ वर्षांची सीता व ८ वर्षांची तिसरी कन्या शांता हिला १९३२ साली अमरावतीला होस्टेलवर ठेवले. गीताला घरी ठेवायचे दिवस आले होते.
 
गीताने लग्न करायला ठाम नकार दिला. आई व आजी ऐकेनात. तेव्हा तिने अबोला धरला. आपल्या वाट्याची कामे करायची पण घरात बोलायचे नाही. भाऊंचा मूक पाठिंबा होताच. भरीस ते चार दिवस बाहेर बसायलाही तिचा नकार होताच. दिवाळीपर्यंत आई व आजीने ताणून धरून पाहिले, पण व्यर्थ. शेवटी दिवाळीनंतर गीताला भाऊ अमरावतीच्या शाळेत दाखल करून आले. तिला इंग्रजी तिसरीत बसवले. ती बोर्डाची परीक्षा असे. सहा महिन्यांनी परीक्षा झाली. गीताला पहिला वर्ग, गणिताचे पदक व शिष्यवृत्ती मिळाली. ती गणितात मुला-मुलींत पहिली आली होती. त्यानंतर तिच्या लग्नाचा विषय घरात निघालाच नाही.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गीता_साने" पासून हुडकले