"महिला साहित्य संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
 
==नागपूर शहरातील संस्था==
 
=== अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था===
अभिव्यक्ती ही विदर्भातील एक अतिशय सजग आणि अग्रगणी लेखिका संस्था होय. राम शेवाळकरांनी ही संस्था १९७६ साली स्थापन केली. संस्थेने यमुना शेवडे अध्यक्षा असताना पहिले विदर्भ लेखिका संमेलन भरविले.
Line १७ ⟶ १८:
 
* जिजामाता वाचनालय (बजाजनगर) (अध्यक्ष अध्यक्ष दुर्गाताई कानगो)
 
* रामनगर===टिळकनगर महिला मंडळ===
 
’टिळकनगर महिला मंडळा’ची स्थापना सुमतीबाई पांगारकरांनी १९६३साली केली. अनेक भगिनींना साहित्यक्षेत्रात पुढे आणण्यात हे मंडळ कारणीभूत आहे. नागपूरच्या नाट्यक्षेत्रात सुप्रसिद्ध असलेल्या सुनंदा साठे याच मंडळातून पुढे आल्या. सतत पाच-सहा वर्षे राज्य नाट्यस्पर्धेत त्यांनी लिहिलेल्या आणि बसविलेल्या नाटकांना बक्षिसे मिळत आहेत. त्यांनी नुकताच आपला सुवर्णमहोत्सव साजरा केला. संस्थेच्या २०१३सालच्या माधवी कुळकर्णी आहेत, तर नाट्यतरंग विभागप्रमुख सुनंदा साठे आहेत.
 
* नावीन्य कला अकादमी (अध्यक्ष माधुरी आशिरगडे)
 
== पद्मगंधा प्रतिष्ठान==
‘पद्मगंधा प्रतिष्ठान’ ही पश्‍चिम नागपुरातील एक तडफदार अशी संस्था आहे. साहित्यांत अनेकांना मानाचे स्थान प्राप्त करून देण्यात ही संस्था अग्रेसर आहे. मुख्य म्हणजे या संस्थेच्या स्थापनेपासून म्हणजे १९९४ पासून, स्थापनेला वीस वर्षे पूर्ण व्हायच्या आत अनेक लेखक व अनेक लेखिकांना वाङ्‌मयप्रकारात लिखाणाची, काव्य करण्याची, नाटकांत लेखिका, दिग्दर्शक व रंगकर्मी म्हणून नाव कमावण्याची संधी दिली. ही संस्था पुरुष आणि स्त्रिया सर्वांसाठी खुली आहे. संस्था रजिस्टर्ड असली, तरी कुठलीही शासकीय मदत संस्थेला नाही. सुप्रसिद्ध लेखिका शुभांगी भडभडे या संस्थेच्या अध्यक्ष(इ.स. २०१३) आहेत.
Line २७ ⟶ ३४:
या प्रतिष्ठानच्या २०१३सालच्या उपाध्यक्ष- विजया ब्राह्मणकर , विजया मारोतकर, कार्याध्यक्ष- संध्या कुळकर्णी, कोषाध्यक्ष- परिणिता कवळेकर, सचिव- वीणा कुळकर्णी, सहसचिव- स्मृती देशपांडे, नाट्यसमिती प्रमुख- प्रतिभा कुळकर्णी, माला केकतपुरे, संध्या कुळकर्णी, श्यामकांत कुळकर्णी, वसुधा पांडे, छाया कावळे आणि सुचित्रा कातरकर आहेत. शिवाय इतर अनेक साहाय्यक आहेत. प्रत्येक जण आपला आपला विभाग उत्तम रीतीने सांभाळतो. रमेश मेंडुले, देवीदास इंदापवार, वसंतराव दहासहस्र या सर्वांची मदत आहेच. संस्थेचे मराठी साहित्य संमेलन २००६ मध्ये व बालसाहित्य संमेलन २००८ मध्ये भरले होते. ‘पद्मगंधा प्रतिष्ठान’ ही संस्था साहित्यक्षेत्रात अनेक स्त्रियांना मार्गदर्शन करणारी ठरली, यात शंका नाही. परंतु, ही संस्था फक्त स्त्रियांसाठी नाही, तर पुरुषांनाही अनेक विषयांत मार्गदर्शन करणारी ठरली आहे, साहित्यक्षेत्रात वाव देते आहे.
 
*=== भगिनी मंडळ-वाचनालय (पश्चिमी नागपूर)===
पश्चिमी नागपूरमधील बर्डी भागातल्या ’भगिनी मंडळा’चे वाचनालय विनाशुल्क आहे. वाचनालयाच्या आणि ’भगिनी मंडळा’च्या काही स्त्री-सभासद साहित्यावर लिहितात, आणि लिहिलेले वाचून दाखवितात. बऱ्याच वर्षांपासून ’भगिनी मंडळा’त एकांकिका स्पर्धा चालू आहेत. अनेक भगिनी त्यांत भाग घेतात. बॅडमिंटन कोर्टही चालू असते. ही संस्था बरीच जुनी आहे. सध्या(इ.स. २०१३) जयश्री कानेटकर या संस्थेच्या अध्यक्ष आहेत.
* रामनगर महिला मंडळ
 
* लक्ष्मीनगर महिला मंडळ
===रामनगर महिला मंडळ===
’रामनगर महिला मंडळा’ची स्थापना १९५८ साली झाली. सांस्कृतिक कार्यक्रमांत संस्थेच्या सदस्यांचा सतत सहभाग असतो. धार्मिक, समाजोपयोगी वगैरे अनेक प्रकारचे कार्यक्रम ही संस्था आखत असते. अनेक वर्षांपासून नाटके लिहून ती बसवून सादर करण्यात ही संस्था आघाडीवर आहे. म्हणजेच भगिनींच्या लिखाणाला त्यामुळे चालना मिळते. मुलांकरिता संस्कारवर्गही चालवतात. संस्थेच्या ‘जागरिया’ या नाटकाला राज्यनाट्य स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळालेले आहे. अनेक वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या संस्थेच्या डॉ. विमल फणशीकर या प्रेरणास्थान होत्या. त्यांची कन्या- आकाशवाणीच्या प्रभा देऊस्कर- याही संस्थेच्या नियमित होणाऱ्या उत्सवांत सक्रिय असतात. रामनगर महिला मंडळाच्या पहिल्या अध्यक्ष सरलाताई सुळे व आताच्या(२०१३सालच्या) अध्यक्ष आहेत अनुराधा कुऱ्हेकर. महिलांना एक उत्तम व्यासपीठ या समाजाने दिले आहे.
 
*=== लक्ष्मीनगर महिला मंडळ===
असेच कार्यक्रम लक्ष्मीनगर महिला मंडळात चालू असतात. यातील लेखिका ’अंकुर’ हे हस्तालिखित काढतात. नाटकाच्या स्पर्धेतही भाग घेतात. लक्ष्मीनगरमध्ये बऱ्याच लेखिका आहेत. स्मृती देशपांडे, वीणा कुळकर्णी, प्रतिभा कुळकर्णी, वगैरे. तर शंकरनगरमध्ये संध्या कुळकर्णी, सौ. केळकर इत्यादी. ज्या लेखिका नाहीत त्या अनेक उद्योग करीत असतात. आता स्त्री उद्योगशील झाली आहे. डॉ. सुनंदा देशपांडे या नाट्यशास्त्राच्या अभ्यासक आहेत. ऊर्मिला देशपांडे या नाटके लिहितात व बसवितात. विजया मारोतकर कविता करतात.
 
== साहित्यविहार==
साहित्यविहार ही संस्था स्त्री-पुरुष- दोघांचीही साहित्यिक संस्था आहे. तिच्या २०१३सालच्या अध्यक्ष या ज्येष्ठ कवयित्री, गझलकार आशा पांडे आहेत.
Line ४६ ⟶ ५९:
 
आता सध्या वृंदा घरोटे या समाजाच्या अध्यक्ष आहेत. त्या व त्यांची कार्यकारिणी सर्वच लेखिका, कवयित्री उद्योगशील आहेत. अशा वाचनालयामुळे स्त्रिया घरातून बाहेर पडल्या व त्यांची प्रगती झाली. त्या लिहित्या, वाचत्या झाल्या. चांगले जीवन जगण्याची, मुक्तपणे गप्पागोष्टी करण्याची संधी त्यांना मिळाली. यातील काही लेखिका आता मोठ्या लेखिका म्हणून गाजताहेत. २००६ साली ’हर्णे महिला समाज’चा सुवर्णमहोत्सव पार पडला.
 
===नागपूरमधील महिला संस्थांमधून पुढे आलेल्या साहित्यिक महिला===
पश्‍चिम नागपुरातील महिला संस्थांमधून ५०-६० वर्षांत अनेक लेखिका पुढे आल्या. सुनिती आफळे, वर्षा रेगे, कै. सुलभा हेर्लेकर, कै. [[ज्योती लांजेवार]], जयश्री रुईकर, प्रज्ञा आपटे, विजया ब्राह्मणकर, ज्योती पुजारी, आशा पांडे, आरती कुलकर्णी, [[आशा बगे]], माला केकतपुरे, प्रतिभा कुळकर्णी, [[शुभांगी भडभडे]]वगैरे. आणि तारा सावंगीकर, मालती निमखेडकर, मंगला दिघे, कै. [[शैलजा काळे]] अरुणा देशमुख, छाया नाईक, [[आशा सावदेकर]], [[जया द्वादशीवार]] इत्यादी.
 
[[वर्ग:महाराष्ट्रातील संस्था]]