विली ब्रांट
विली ब्रांट (जर्मन: Willy Brandt; १८ डिसेंबर १९१३ - ८ ऑक्टोबर १९९२) हा १९६९ ते १९७४ ह्या काळादरम्यान पश्चिम जर्मनीचा चान्सेलर होता. शीत युद्धादरम्यान सोव्हिएत संघ व त्याचे कम्युनिस्ट सहकारी देश ह्यांच्यासोबत पश्चिम जर्मनीचे संबंध सुधारावेत ह्या साठी ब्रांटने केलेल्या प्रयत्नांसाठी १९७१ साली त्याला नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले.
विली ब्रांट | |
जर्मनीचा चान्सेलर
| |
कार्यकाळ २१ ऑक्टोबर १९६९ – ७ मे १९७४ | |
मागील | कुर्ट गेओर्ग कीसिंगेर |
---|---|
पुढील | हेल्मुट श्मिट |
जन्म | १८ डिसेंबर १९१३ ल्युबेक, जर्मन साम्राज्य |
मृत्यू | ८ ऑक्टोबर, १९९२ (वय ७८) उंकेल, ऱ्हाइनलांड-फाल्त्स |
राजकीय पक्ष | जर्मनीचा सामाजिक लोकशाहीवादी पक्ष |
सही |
१९७४ साली ब्रांटचा विशासू सहाय्यक ग्युंटर ग्विलॉमे हा पूर्व जर्मनीचा गुप्तहेर असल्याचे उघडकीस आल्यानंतर ब्रांटने चान्सेलरपदाचा राजीनामा दिला.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत व्यक्तिचित्र Archived 2012-03-22 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |