जर्मनीचा सामाजिक लोकशाहीवादी पक्ष
जर्मनीचा सामाजिक लोकशाहीवादी पक्ष (जर्मन: Sozialdemokratische Partei Deutschlands) हा जर्मनी देशामधील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. १८६३ साली स्थापना झालेला हा जर्मनीमधील सर्वात जुना पक्ष असून मार्क्सवादी विचारसरणीचा तो जगातील सर्वप्रथम राजकीय पक्ष होता. आजच्या घडीला सामाजिक लोकशाहीवादी पक्ष जर्मन बुंडेश्टागमधील सत्ताधारी पक्ष आहे. ह्या पक्षाचे नेते ओलाफ शोल्त्स जर्मनीचे विद्यमान चान्सेलर आहेत.
जर्मनीचा सामाजिक लोकशाहीवादी पक्ष | |
---|---|
Sozialdemokratische Partei Deutschlands | |
संक्षिप्त नाव | SPD |
नेता | साक्सिया एस्केन |
अध्यक्ष | केव्हिन क्युहनर्ट |
चान्सेलर | ओलाफ शोल्त्स |
स्थापना | २७ मे १८७५ |
मुख्यालय | बर्लिन |
सदस्य संख्या | ४,०४,३०५ |
राजकीय विस्तार | सामाजिक लोकशाहीवाद |
रंग |
|
बुंडेश्टाग |
२०६ / ७३६ |
बुंडेश्राट |
२१ / ६९ |
युरोपीय संसद |
१६ / ९६ |
www.spd.de |
१९३० च्या दशकामध्ये नाझी पक्ष व ॲडॉल्फ हिटलर जर्मनीवरील पकड घट्ट करीत असताना सामाजिक लोकशाहीवादी पक्षाने नाझींचा विरोध केला होता. ह्या कारणास्तव १९३३ साली ह्या पक्षावर बंदी घातली गेली व त्याच्या अनेक सदस्यांना तुरूंगात डांबण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर सामाजिक लोकशाहीवादी पक्षाचे कामकाज पुन्हा सुरू झाले. आजच्या घडीला ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन सह सामाजिक लोकशाहीवादी पक्ष जर्मनीमधील प्रमुख पक्ष मानला जातो.
पक्षाचे पदाधिकारी
संपादनजर्मनीचे राष्ट्राध्यक्ष
संपादननाव | कार्यकाळ |
---|---|
गुस्टाफ हाइनेमान | 1969–1974 |
योहानेस राऊ | 1999–2004 |
फ्रांक-वाल्टर श्टाईनमायर | 2017–चालू |
जर्मनीचे चान्सेलर
संपादननाव | कार्यकाळ |
---|---|
विली ब्रांट | 1969–1974 |
हेल्मुट श्मिट | 1974–1982 |
गेऱ्हार्ड श्र्योडर | 1998–2005 |
ओलाफ शोल्त्स | 2021– |