विमल जोशी
विमल गजानन जोशी (इ.स. १९३१ - १८ मे, इ.स. २०१५) या एक नाट्यअभिनेत्री होत्या.
विमल जोशी यांनी आकाशवाणीवरील कामगार सभा, वनिता मंडळ या लोकप्रिय कार्यक्रमांचे सादरीकरण केले. आकाशवाणीवर ३५ वर्षे नोकरी करून, कामगार आणि स्त्रियांसाठीच्या कार्यक्रमांतून अनेक कलावंतांनाही रेडिओवर येण्याची संधी त्यांनी मिळवून दिली.
विमलताईंच्या आवाजात मार्दव होते, आपलेपणाची लय होती. शब्दोच्चार स्वच्छ आणि अस्सल मराठी वळणाचे होते. त्यांच्याकडे कणखर, मजबूत जीवननिष्ठा असल्याने आणि जगाकडे, परिस्थितीकडे तिरकसपणे पाहण्याच्चा त्यांचा स्वभाव असल्याने, विमल जोशींची कार्यक्रमांचे सादरीकरण करतानाची एकूण निरीक्षणे मार्मिक आणि मजेशीर असत.[ दुजोरा हवा]
हिंदीतील इप्टा थिएटरमधील नाटकांतूनही यांनी अभिनय केला. बलराज सहानी, संजीव कुमार अशा अनेक कलावंतासोबत त्यांनी हिंदी नाटकांतून कामे केली होती. चाकरमानी या मराठी नाटकात त्यांनी अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांच्या आईची भूमिका साकारली होती.
अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ, आणि डॉ. मीनल परांजपे या विमल जोशींच्या मुली असून, अभिनेते अशोक सराफ आणि डॉ. सुनील परांजपे हे जावई आहेत.
विमल जोशी याची भूमिका असलेली मराठी नाटके
संपादन- कस्तुरीमृग
- चाकरमानी
- जास्वंदी
- नटसम्राट