विजयेंद्र घाटगे हे हिंदी चित्रपट आणि भारतीय दूरचित्रवाणी अभिनेते आहेत. डीडी नॅशनलवर प्रसारित १९८६ मधील टीव्ही मालिका बुनियाद मधील लाला ब्रिजभानच्या भूमिकेमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले.[] याशिवाय चितचोर, प्रेमरोग, दामिनी, देवदास (२००२)[] आणि झंकार बीट्स या चित्रपटांमधील भूमिकांसाठी देखील ते ओळखले जातात.

घाटगे हे कागलच्या राजघराण्याचे सदस्य आहेत आणि इंदूर आणि कोल्हापूरच्या इतर मराठा राजघराण्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यांची आई 'सीता राजे घाटगे' ह्या इंदूरचे महाराजा 'तुकोजीराव होळकर-तृतीय' यांची मुलगी आहे.[][]

इंदूरच्या डेली कॉलेजमध्ये त्यांनी आपले शिक्षण घेतले. या कॉलेज मध्ये राष्ट्रीय छात्र सेनेत ते स्वोर्ड ऑफ ऑनर (फ्लाइट सार्जंट एअरिंग एनसीसी)चे हेड प्रीफेक्ट आणि धारक होते. सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्यांनी बी.कॉम ऑनर्स (मॅनेजमेंट) पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे येथून अभिनयाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण केला.

विजयेंद्र घाटगे यांच्या वडिलांचे नाव फतेहसिंह राव दत्ताजी राजे घाटगे होते, ते कागलचे वस्सल, मराठा साम्राज्याचे जहागीर आणि आई सीतादेवी, इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर आणि महाराणी शर्मिष्ठा देवी बाई यांची मुलगी होती. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सागरिका घाटगेचे ते काका आहेत परंतु काहीवेळेस नामसाधर्म्यामुळे त्यांना चुकीने सगरिकाचे वडील समजले जाते.[]

अभिनयाची कारकीर्द

संपादन

विजयेंद्र घाटगे यांनी इस १९७६ मधील राजश्री प्रॉडक्शनच्या चितचोर या हिंदी चित्रपटात सहाय्यक भूमिकेतून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. बासू चॅटर्जी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.[] त्यानंतर, त्यांनी कस्मे वादे(१९७८), तेरे प्यार में, प्रेम रोग (१९८२) आणि रझिया सुलतान (१९८३) सारख्या चित्रपटांमध्ये विविध सहाय्यक भूमिका केल्या. १९८० च्या दशकाच्या मध्यात घाटगे दूरचित्रवाणी मालिकांमध्ये दिसू लागले. १९८६-८७ च्या क्लासिक सीरियल बुनियादमध्ये साकारलेल्या लाला वृषभानच्या भूमिकेने त्यांचे नाव घराघरात पोहोचवले.[]

इ.स. २००२ मध्ये संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपट देवदासमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय सोबत त्यांनी काम केले. यात 'पारो' उर्फ 'पार्वती'चे पात्र निभावणाऱ्या ऐश्वर्या रायच्या वृद्ध पती 'भुवन चौधरी'ची भूमिका त्यांच्या वाट्याला आली होती.[]

अभिनय सूची

संपादन

चित्रपट

संपादन
वर्ष चित्रपट भूमिका नोंद
1976 चितचोर सुनील किशन
1977 अगर... इफ विजय सोहनी
1978 अनपढ मुकेश
1978 यथीमा सुंदरी वहिद
1978 कसमे वादे कुंदन घनश्यामदास
1978 तेरे प्यार में
१९७९ सुनयना डॉ इंद्रजीत
१९७९ शायद
1980 नजराना प्यार का किशोर
1980 आखरी इंसाफ
1980 एहसान आप का
1980 गेस्ट हाऊस सुरज
1981 धनवान
1981 पाच कैदी
1981 हम से बढकर कौन बल्लू/डीएसपी विजय
1981 ज्योती निरंजन प्रताप सिंग
1982 प्रेम रोग कुंवर नरेंद्र प्रताप सिंग
1982 सत्ता पे सत्ता शेखर
1982 जीओ और जीने दो
1982 मौत का साया
1982 वक्त वक्त की बात
1983 रझिया सुलतान अमिल अल्तुनिया
1984 राम की गंगा अरुण 'सूरज' वर्मा
1984 राम तेरा देश प्रेमकुमार सक्सेना
1984 वक्त की पुकार राजा
1984 डायव्होर्स अजय ओसवाल/श्याम
1984 हसते खेलते
1985 मेरा घर माझे बच्चे डॉ श्रीकांत भार्गव
1985 पौर्णमी राविल मल्याळम 3D चित्रपट
1985 मेहक
1985 काली बस्ती इन्स्पेक्टर रघुवंशी
1986 शीशा ऍड अशोक कुमार
1986 लॉकेट विजय
1986 त्रिकोण का चौथा कोन
1986 दहलीज अहमद अली
1987 मुकद्दर का फैसला पोलीस निरीक्षक शेखर
1988 मोहब्बत के दुश्मन समशेर
1988 वीराणा समीर प्रताप
1988 शहेनशहा मोहम्मद सलीम
1988 यतीम वरिष्ठ पोलीस अधिकारी
1989 बटवारा देवन
1989 त्रिदेव रमेश तेजानी
1989 सौतन की बेटी ऍड नरेंद्र
1989 अजीब इतेफाक अपर्णाचा प्रियकर
1989 गुरू इन्स्पेक्टर शिवशंकर श्रीवास्तव
1989 नकाब नवाब सज्जत अली खान
१९९० बंद दरवाजा ठाकूर प्रताप सिंग
१९९० लेकिन... राजा परम सिंह
1991 इंद्रजीत इन्स्पेक्टर सुधीर
1991 आखरी चीख
1991 सनम बेवफा सज्जन ठाकूर
1991 एक डॉक्टर की मौत डॉ अरिजीत
1992 अपराधी अनाथाश्रमाबाहेरचा माणूस
1992 बेखुदी राधिकाचे वडील
1992 खेल रवी
1993 दामिनी इन्स्पेक्टर कदम
1993 क्षत्रिय राजा दवेंद्र प्रताप सिंह
1993 अंत ऍड विकास सक्सेना
1994 माझं सौभाग्य अहंत अभ्यंकर मराठी चित्रपट
1994 वादे इरादे प्राचार्य त्रिपाठी
1994 बेटा हो तो ऐसा वनाधिकारी आनंद
1995 गुड्डू रेहमान
1996 राजकुमार
1997 आखरी संघर्ष अर्जुन
1998 करिब दिवाण वीरेंद्रनाथ
१९९९ लव्ह यू हमेशा
2000 सियानी टीव्ही चित्रपट
2001 शिर्डी साई बाबा (2001)
2002 जीना सिरफ मेरे लिए पूजाचे बाबा
2002 दिवानगी अश्विन मेहता
2002 देवदास भुवन चौधरी
2002 कभी तुम कभी हम श्रीवास्तव
2003 झंकार बीट्स कपूर साहेब
2003 तुझे मेरी कसम
2004 वजह सिंघानिया
2004 गर्व मुख्यमंत्री
2005 चांद सा रोशन चेहरा
2006 शादी से पहले भल्ला
2007 मारीगोल्ड राजपूत
2008 कर्म रणवीर सिंग
2010 फॉगी ख्रिसमस सायमन
2010 लाईफ एक्सप्रेस तन्वीचा बॉस
2011 आझान गृहमंत्री

दूरदर्शन

संपादन
वर्ष मालिका भूमिका चॅनल नोट्स
१९८५ सिंहासन बत्तीसी राजा विक्रमादित्य डीडी नॅशनल
१९८५ विक्रम और बेताल गुणकर डीडी नॅशनल भाग: गुनकरची अयशस्वी तपश्चर्या
१९८६ कथा सागर डीडी नॅशनल
१९८६ बुनियाद लाला वृषभान डीडी नॅशनल
१९९२ मिशन डी'अमोर मानसिंग
१९९२ तलाश सुधीर डीडी नॅशनल
१९९४ जुनून नील भाटिया डीडी नॅशनल

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "The Buniyaad folks, 18 years later". Rediff.com. Feb 2006. 24 February 2012 रोजी पाहिले.
  2. ^ a b Arti R (11 July 2002). "What does it take to be Ash's husband?". Rediff.com. 24 February 2012 रोजी पाहिले.
  3. ^ "Supreme Court Judgement". 24 April 2008. 2016-03-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 February 2012 रोजी पाहिले.
  4. ^ "Indore: Palace Intrigue". India Today. 15 September 1997. 24 February 2012 रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. ^ "Mistaken identity for Sagarika Ghatge". The Times of India. 27 April 2017. 2 June 2018 रोजी पाहिले.
  6. ^ "Box office 1976". Boxofficeindia.com. 20 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 February 2012 रोजी पाहिले.