विकिपीडिया चर्चा:चावडी/इतर चर्चा

Add topic
Active discussions

चर्चेचे स्थानांतरणसंपादन करा

नमस्कार ,

मराठी विकिपीडिया चावडीच्या स्वरूपात संकल्पीत इष्ट बदलांच्या दृष्टीने विकिपीडिया चावडी हे मुख्य पान यापुढे सदस्यांना चर्चापानांबदल मार्गदर्शन करणाऱ्या दालनाच्या स्वरूपात मर्यादीत रहाणार असून यापुढे सर्व मध्यवर्ती चर्चा विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे होतील. दोन चर्चा सभासदांसाठी मदतगार चित्रफिती बनवणे. आणि विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख & उदयोन्मुख लेख चर्चा चालू असताना विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे हलवाववे लागले. ता पुर्वीच्या जुन्याचर्चा विदागारात स्थानातरीत केल्या.


मराठी विकिपीडियावरील सदस्य आणि त्याच प्रमाणात चर्चांची संख्या वाढत आहे.सर्व चर्चांचे एकत्र कडबोळे झाल्यामुळे बऱ्याच चर्चांना पुरेसा न्याय मिळत नाही चर्चांचे स्वरूप विस्कळीत रहाते त्या शिवाय सहाय्यपानांक्की निर्मीती करणाऱ्या सदस्यांकरीता सुद्धा ते गैर सोईचे ठरते. त्यामुळे चर्चांचे सुनियोजीत विकेंद्रीकरण करून प्रत्येक सदस्यांस संब्ंधीतचर्चेत सहभाग सुलभ व्हावा असा दृष्टीकोण आहे. चर्चा आधि मध्यवर्ति चर्चेत आणि मग वीशेष चर्चेत स्थानांतरण असे स्वरूप न ठेवता नवे स्वरूप संब्ंधीत चर्चा विषयात सरळ सहभाग.ज्या विषयांना विशेष चावडी नाही ते विषय इतर चर्चां चावडीपानावर घ्यावेत.

वस्तुत्: हा बदल चावडीतील मागच्या बदलांच्या वेळीच प्रस्तावीत होता पण सर्व चावड्या एकत्रित एकापानावर विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या दाखवण्याच्या पानावरील तांत्रीक अडचणींमुळे तसे करणे पुढे ढकलले होते. वस्तुत्: विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या येथे अद्दापही काही तांत्रीक अडचणी आहेत नाही असे नाही . पण चावडीच्या एकुण नियोजीत एकुण आराखड्यात अधिक विलंब होऊ देणे उचीत नव्हते .तसदी बद्दल मन:पूर्वक् क्षमाप्रार्थी आहे.

चावडीचे स्वरूप कसे असावे या बाबतच्या धोरणात्मक चर्चेत विकिपीडिया:चावडी/ध्येय_आणि_धोरणे#चावडीचे स्वरूप कसे असावे येथे आपले स्वागत आहे.

आपला नम्र

माहितगार (चर्चा) ०४:५७, ३ एप्रिल २०१२ (IST)

संग्रहसंपादन करा

जुन्या चर्चचे संग्रह जुन्या चर्चा चौकट मध्ये आहे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:२६, ११ नोव्हेंबर २०१७ (IST)

Return to the project page "चावडी/इतर चर्चा".