सहाय्य:साचा

(विकिपीडिया:साचे नामविश्व या पानावरून पुनर्निर्देशित)

साचा (इंग्लिश: Template, टेंप्लेट) म्हणजे विकिपीडियावरील अन्य पानांमध्ये अंतर्भूत करता येण्याजोगे एखादे पान होय. अनेक पानांवर एकच एक मजकूर किंवा संदेश दाखवण्यासाठी लागणारा आशय साच्यांमध्ये लिहिला जातो. साचा प्रकारातील पाने इतर पानांत वापरता येत असल्यामुळे साच्यांतील माहितीचे इतर एक किंवा अनेक पानांत एकाच वेळी जणू प्रतिबिंब उमटते. विकिपीडियावर नेहमी वापरले जाणारे सार्वजनिक संदेश, इशारे, नोटिसा, माहितीचौकटी, मार्गक्रमण चौकटी इत्यादींसाठी साधारणपणे साचे वापरले जातात.

साच्यांचे वैशिष्ट्य व महत्त्व लक्षात घेता, साचा म्हणून वापरल्या जाणार्‍या पानांसाठी साचा असे विकिपीडिया:नामविश्व बनवण्यात आले आहे. त्यामुळे सर्व साच्यांच्या पानांची शीर्षके साचा:XXXX अश्या स्वरूपाची असतात.

साच्याच्या वापराची प्राथमिक उदाहरणे

संपादन

नमुन्यादाखल साचा:नाव हा साचा आणि त्या साच्याचा वापर केलेला विकिपीडिया:धूळपाटी/भाषांतर हा लेख पाहा. साचा:नाव या साच्यामध्ये नाव बदलून विकिपीडिया:धूळपाटी/भाषांतर या लेखात काय बदल घडतात ते अभ्यासा. अर्थात वर दिलेल्या साच्याचा वाक्यातील उपयोग उदाहरणादाखल केलेला आहे. शक्यतोवर वाक्यांमध्ये साचाचा वापर करू नये, कारण साचा अचानक कुणी बदलाला तर वाक्यातील 'अर्थाचा अनर्थ' होण्याची भीती असते.

नेहमी लागणारे साचे या पानावर उपलब्ध आहेत.सध्या मराठी विकिपीडियावर उपलब्ध असलेले सर्व साचे वर्ग:साचे येथे एकत्रित केले आहेत.

सध्या उपलब्ध असलेले साचे

संपादन

सध्या विकिपीडियावर उपलब्ध असलेले सर्व साचे वर्ग:साचे या वर्गात गोळा केले आहेत.

साचा कसा वापरावा?

संपादन

साचा कसा वापरावा? याचे प्रात्यक्षिक संबंधित दुव्यावर पाहता येईल. येथे माहितीचौकट - पुस्तक साचा वापरून दाखविला आहे.

साचे सुसूत्रीकरण प्रकल्प

संपादन

विकिपीडिया सदस्यांना परस्परसहयोगाने साच्यांवर काम करता यावे, म्हणून विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. इच्छुक सदस्य या प्रकल्पात सहभागी होऊन परस्परसहयोगाने प्रकल्पाची कामे करू शकतात.

हेही पाहा

संपादन