बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥


श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी महाराष्ट्रावर रचलेल्या या गीतात शुभेच्छा व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे मराठी विकिपीडिआ जो की मराठी भाषिकांनी निर्वाहलेला मुक्त ज्ञानकोश आहे, हे ज्ञानभांडार अधिक मोठे, उत्तमोत्तम बनत जावे आणि मराठी लोकांचे सक्षम प्रतिनिधित्व विकिपीडिआ प्रकल्पामध्ये व्हावे यासाठी सर्व मराठी भाषिकांना शुभेच्छा आणि धन्यवाद.

महाराष्ट्र - भारतातील राज्य
महाराष्ट्र - भारतातील राज्य

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे स्फूर्तीस्थान आहे. तीनशे वर्षांपेक्षाही पूर्वी त्यांनी स्थापन केलेले राज्य आजही अभिमानाने स्वराज्य आणि सुराज्य म्हणून सर्वत्र गौरविले जाते. महाराष्ट्राच्या आणि जगाचा इतिहासातील एका उत्कृष्ट राज्यशासनाची घडी त्यांनी नेटकेपणाने बसविली. स्वकीय/मित्रांना सोबत घेऊन तसेच स्वराज्य मजबूत करित, शत्रूवर विजय मिळवित, वचक बसवित, त्यांनी जाणता राजा हे लोकप्रदान बिरूद सार्थकी ठरविले.

जाणता राजा 'छत्रपती शिवाजी'
जाणता राजा 'छत्रपती शिवाजी'

चित्र:Matsya 2.jpg
मत्स्यावतार - दशावतारातील पहिला अवतार

हिंदु मिथकशास्त्रानुसार, विष्णु हे पृथ्वीचे पालनकर्ते आहेत आणि पृथ्वीवर त्यांचे अनेक अवतार झाले आहेत. अवतारांची संख्या मात्र दहापासून ते तीसपर्यंत बदलती आहे. विष्णुचे अवतार हा लेख या बाबींवर अधिक माहिती

मागील अंक - ९ मे


अल्बर्ट आईन्स्टाईन

अल्बर्ट आईन्स्टाईन हे नाव सार्‍या जगाला ठाऊक आहे. बरोबर शंभर वर्षांपूर्वी या विज्ञान-तपस्वीने एक सिद्धांत मांडला ज्याने या विश्वाचे रूप आणि मांडणी अधिक प्रगल्भतेने सांगितली. काळ आणि अवकाश हे एकमेकांना सापेक्ष असून सर आयझॅक न्यूटन यांनी सांगितल्या प्रमाणे निरपेक्ष नाहीत असे त्यांनी या सिद्धांताद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला. तरीही या क्रांतिकारक सिद्धांताला त्याच्या कसोटीनंतरच मान्यता मिळाली आणि त्यासाठी तब्बल दहा वर्षे वाट पहावी लागली. याचे एक कारण कदाचीत हे असावे की तत्कालीन प्रस्थापित शास्त्रज्ञ वर्गाला अल्बर्ट आईन्स्टाईन यांना नेमके काय सांगायचे आहे तेच लवकर उमगले नाही. इ.स. १९१५ साली एका ग्रहणाच्या वेळी घेतलेल्या निरक्षणांवरून अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या सिद्धांताची यशस्वी पडताळणी झाली आणि "अवकाशाला वाकविणार्‍या आणि काळाच्या गतिला बदलविणार्‍या" शास्त्रज्ञास रातोरात प्रसिद्धीने आपलेसे केले. अल्बर्ट आईन्स्टाईन एवढी प्रसिद्धी कोणत्याही शास्त्रज्ञास ना त्यापूर्वी मिळाली आणि ना त्यानंतर आजपर्यंत.

जून ३० इ.स. १९०५ या दिवशी त्यांनी सापेक्षतेचा सिद्धांत सांगितला आणि कित्येक जुने सिद्धांत कोसळून पडले आणि कित्येक नवीन सिद्धांतांनी त्यांची जागा घेतली. या सिद्धांताला आणि त्याच्या जनकाला अभिवादन करण्यासाठी इ.स. २००५ हे आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.

"झालेत बहु होतील बहु, परि या सम हाच!" - असे सार्थ वचन त्यांना लागू पडते.

मागील अंक - मे ९ - मे १६