विकिपीडिया:सदर/मे ९
बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥
|
|
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे स्फूर्तीस्थान आहे. तीनशे वर्षांपेक्षाही पूर्वी त्यांनी स्थापन केलेले राज्य आजही अभिमानाने स्वराज्य आणि सुराज्य म्हणून सर्वत्र गौरविले जाते. महाराष्ट्राच्या आणि जगाचा इतिहासातील एका उत्कृष्ट राज्यशासनाची घडी त्यांनी नेटकेपणाने बसविली. स्वकीय/मित्रांना सोबत घेऊन तसेच स्वराज्य मजबूत करित, शत्रूवर विजय मिळवित, वचक बसवित, त्यांनी जाणता राजा हे लोकप्रदान बिरूद सार्थकी ठरविले. |