विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १/आरंभबिंदू

ऑकलंड, न्यूझीलंड वेळेनुसार संपादनेथॉन सुरू झाली आहे.

पळा! :)

महाराजा, तेथे अजून २६ तारीख आहे :-)
तरीही पळा :-))
अभय नातू १९:२६, २५ फेब्रुवारी २०११ (UTC)

किरितिमाती येथे रविवार, फेब्रुवारी २७ पहाटेचे ००:०१ वाजले आणि आता संपादनेथॉन खरोखरच सुरू झाली आहे. संकल्पचे शब्द वापरुन म्हणतो -- पळा, पळा!!

अभय नातू १०:००, २६ फेब्रुवारी २०११ (UTC)


आरंभबिंदूला काही परिमाणे अशा प्रकारे --

  • लेखसंख्या - ३२,६७९
  • एकूण पाने - ८४,३८५
  • एकूण संपादने - ७,०२,०००
  • आशयघनता - २०.८२६४७
  • नोंदणीकृत सदस्य - १५,०५५
  • गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य - १४०
  • सगळ्यात लहान १०% लेखांचा आकार (२५ तारखेचे आकडे) - १७४ बाइट
  • सगळ्यात मोठ्या १०% लेखांचा आकार (२५ तारखेचे आकडे) - ५,५६४ बाइट

दुरुस्ती

संपादन

संपादनेथॉनाच्या पानावर विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १#वेळ व ठिकाण येथे नोंदवल्याप्रमाणे संपादनेथॉन २६ व २७ नोव्हेंबर अशी दोन दिवस ठरली आहे ना ?

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:११, २६ फेब्रुवारी २०११ (UTC)

बरोबर, संपादनेथॉन फेब्रुवारी २६ आणि २७ (स्थानिक वेळेनुसार) असेल. असे करण्यामागचे कारण म्हणजे किरितीमातीत २७ तारीख उजाडलेली असता (अजून उजाडले नाही म्हणा) जगात इतर ठिकाणी फेब्रुवारी २६ (किंवा २५ही) असेल. त्याच प्रमाणे किरितीमातीच्या किंचित पूर्वेला २७/२८ तारखेची मध्यरात्र होत असता इतर ठिकाणी २८/२९ तारीखही असू शकेल. तरी जगात फेब्रुवारी २७ तारीख एका तरी ठिकाणी असल्या पासून २७ तारीख असेपर्यंत असे या कालखंडाची व्याख्या करता येईल.
असे केल्याने तारखेचे महत्व राखले जाईल.
अभय नातू १०:१६, २६ फेब्रुवारी २०११ (UTC)
औचित्याखातर नोंद म्हणून ही वेळ या पानावर नोंदवणे ठीक आहे. पण नंतर संपादनेथॉनेतील संपादने, लेखसंख्या इत्यादी आकडेवारीसाठी २६ फेब्रुवारी, इ.स. २०११ जगात सर्वांत प्रथम सुरू होण्याचा कालविभाग (बहुतकरून ऑकलंड, न्यूझीलंड असावा.) आरंभबिंदू मानणे अधिक सयुक्तिक ठरेल. तसेच समारोपबिंदू जगात सर्वांत अखेरीस २७ फेब्रुवारी, इ.स. २०११ जिथे संपेल, तेथील वेळेनुसार संपादनेथॉन संपली असे धरावे. या दोन बिंदूंमधील अवधी ४८ तासांहून अधिक असणार, हे उघड पण पृथ्वी सपाट नसल्यामुळे अवधीचे कालमापनही सपाट राखून चालू नये. :) या दोन बिंदूमध्ये १२ तास (ग्रीप्रवे २६ फेब्रु.आधी न्यूझीलंड कालविभागाची आघाडी) + ४८ तास (संपादनेथॉनेचे ग्री.प्रवे २ दिवस) + १२ तास (ग्रीप्रवे २७ फेब्रु.नंतर प्रशांत महासागर कालविभागाची पिछाडी) = ७२ तास होतील. परंतु नंतर एकूण आकडेवारी दोन दिवसांवर नॉर्मलाइझ करूनदेखील आकडेवारीचा एक संच जाहीर करता येईल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:३७, २६ फेब्रुवारी २०११ (UTC)

ठीक. मी फक्त २७ तारीख वेळ समजून चालत होतो. त्यानुसार २४ तास elapsed time अधिक २४ तास time-difference असे ४८ तास झाले असते.
किरितिमाती येथील वेळ हा जगातील सर्व"प्रथम" कालविभाग समजला जातो, त्यानुसार सुरू करून तेथेच संपवला तर वेळ मोजण्यात uniformity राहील असे वाटते.
अभय नातू १०:४१, २६ फेब्रुवारी २०११ (UTC)
जरूर. किरितिमातीचा कालविभाग संदर्भ म्हणून आरंभ आणि समारोपासाठी वापरू या.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:५८, २६ फेब्रुवारी २०११ (UTC)

अठरा तास

संपादन

अठरा तासांच्या धावेनंतरची परिमाणे --

  • लेखसंख्या - ३२,६९०
  • एकूण पाने - ८४,४३७
  • एकूण संपादने - ७,०२,५००
  • आशयघनता - २०.८४७५०
  • नोंदणीकृत सदस्य - १५,०६९
  • गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य - १४०
  • सगळ्यात लहान १०% लेखांचा आकार (२५ तारखेचे आकडे) - १७४ बाइट
  • सगळ्यात मोठ्या १०% लेखांचा आकार (२५ तारखेचे आकडे) - ५,५६४ बाइट

अभय नातू ०४:०४, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)

चाळीस तास

संपादन

चाळीस तासांच्या धावेनंतरची परिमाणे --

  • लेखसंख्या - ३२,७२२
  • एकूण पाने - ८४,५१३
  • एकूण संपादने - ७,०३,३४८
  • आशयघनता - २०.८४८५४
  • नोंदणीकृत सदस्य - १५,०९०
  • गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य - १४०
  • सगळ्यात लहान १०% लेखांचा आकार (२५ तारखेचे आकडे) - १७४ बाइट
  • सगळ्यात मोठ्या १०% लेखांचा आकार (२५ तारखेचे आकडे) - ५,५६० बाइट

शेवटचे आठ तास राहिले आहेत....एक दौड मारुयात.

अभय नातू ०२:०२, २८ फेब्रुवारी २०११ (UTC)

अठ्ठेचाळीस तास

संपादन

किरितिमातीच्या पूर्वेस फेब्रुवारी २७/२८ची मध्यरात्र झाल्याक्षणी सदस्य J यांनी बाळकृष्ण भगवंत बोरकर‎ या लेखात केलेल्या संपादनासह मराठी विकिपीडियावरील संपादनेथॉन संपली.

यात भाग घेणार्‍या सगळ्या सदस्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. त्यावेळची सांख्यिकी व इतर माहितीचा अभ्यास करून विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १/समारोप येथे दिलेली आहे.

अशी संपादनेथॉन दर वर्षी आयोजित करण्याचा संकल्प आहे. मराठी भाषा दिवस शिवाय इतरही वेळी करता आले तर उत्तमच.

अभय नातू १७:१४, २८ फेब्रुवारी २०११ (UTC)