विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण
- हे सुद्धा पहा: विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण - साचे वापरून, विपी:सोपेसा, विपी:संदर्भीकरण, आणि विपी:संदर्भ द्या
विकिवर लेखनाच्या वैधतेस व वाचकांच्या माहितीसाठी संदर्भ हे महत्वाचे आहेत.कोणताही संपादक असंदर्भांकीत मजकूर काढुन टाकु शकतो;व अश्या बिनामहत्वाच्या लेखांचा शेवट वगळण्यात होतो.जेंव्हा लेखात काही जोडल्या जाते,तेंव्हा ते कुठुन आले हे दर्शविण्यास, त्यात संदर्भाचा अंतर्भाव करण्याचा महत्वाचा सल्ला देण्यात येतो.संदर्भ देणे अवघड वाटु शकते पण ते अत्यंत सोपे आहे.सुरुवात करण्यास मार्गदर्शक येथे आहे -
योग्य संदर्भ
संपादनसंदर्भ हा सत्य असावा तसेच संदर्भित विधानाची सत्यता पटवणारा असावा. सदाशिव पाटील अरबी समुद्र पोहून गेला. या विधानाला संदर्भ देण्यासाठी नुसता अरबी समुद्राविषयीचा संदर्भ देउन उपयोग नाही. जर त्या संदर्भात सदाशिव समुद्र पोहून गेल्याचा उल्लेख असेल तरच हा संदर्भ योग्य ठरतो. तसेच नुसता सदाशिव पाटीलबद्दलचे पुस्तक, लेख किंवा दुवा संदर्भ म्हणून देउनही उपयोग नाही. जर त्या पुस्तकात, लेखात किंवा दुव्यावरील पानावर सदाशिव पाटील अरबी समुद्र पोहून गेल्याचा उल्लेख असेल तर तो संदर्भ योग्य ठरतो. हे संदर्भ देताना ते विश्वासार्ह असावेत. याची काही उदाहरणे म्हणजे प्रकाशित पुस्तके, बातमीपत्रे, अधिकृत संकेतस्थळे. सहसा ब्लॉग, यूट्यूब, फेसबूक, इ. संकेतस्थळांवरील माहिती ग्राह्य धरली जात नाही. जर अशा ठिकाणची माहिती उद्धृत करायची झाली तर ती देताना असे मानले जाते की... किंवा असाही एक समज आहे की... अशी पुस्ती त्या विधानास जोडावी. स्वतः केलेले संशोधनही योग्य संदर्भ म्हणून ग्राह्य नाही. असे संशोधन समसमीक्षित (peer-reviewed) असले तर ते जरुर ग्राह्य आहे. विकिपीडियावरचेच दुसरे पान हे योग्य संदर्भ नाही. विकिपीडियावरील इतर पानावरच्या माहितीचा संदर्भ दिल्यास मूळ पानावरील संदर्भ या लेखातही उद्धृत करावे.
संदर्भ कसा घालावा
संपादनविकिपीडियावर लेख लिहिताना संदर्भ देण्यासाठी काही संकेत आहेत. यात केलेल्या विधानाची विश्वासार्हता पटवण्यासाठीची लेखकाला माहिती पुरवता यावी हा मूळ उद्देश आहे. यासाठी तळटीपा, कौंसात घातलेली माहिती तसेच दुव्यांचा उपयोग करता येतो. या पानावर तळटीपा घालून संदर्भ कसे देता येतात हे दाखवले आहे:
असे संदर्भ देण्यासाठी सर्वप्रथम तळटीपा जेथे दिसतील असा विभाग करणे आवश्यक आहे. सहसा हा विभाग लेखाच्या शेवटी (पण वर्गवारीच्या आधी) तयार केला जातो. आधीपासून असलेल्या लेखात हा विभाग असण्याची शक्यता आहे. तरी हा विभाग तयार करण्याआधी हा आधीच अस्तित्त्वात नाही ना याची खात्री करुन घ्यावी.
योग्य ठिकाणी
==संदर्भ आणि नोंदी==
असे लिहून त्याखाली- <references/> किंवा {{संदर्भयादी}}या दोनपैकी काहीही एक टाका.
किंवा नुसते -
{{संदर्भनोंदी}}
असे लिहिल्यास,
==संदर्भ आणि नोंदी==
हा विभाग तयार होतो.
आता लेखात कोठेही संदर्भ देण्यास तुम्ही मोकळे आहात. एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (पूर्णविरामानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर.</ref>
क्वचित वाक्याच्या मध्यातही असा संदर्भ देता येतो.
आता हा मजकूर जतन केला असता संदर्भ मजकूर आधी तयार केलेल्या संदर्भ विभागात दिसायला लागतो.
प्रयोग करुन पहा
संपादनतुमच्या चर्चा पानावर प्रयोग करुन पहा. या दुव्यावर टिचकी देउन घालील मजकूर घाला आणि पान जतन करा:
==संदर्भ प्रयोग==
- या विधानाला मी संदर्भ देत आहे.<ref>संदर्भ (दुवा, पुस्तक, इ.)</ref>
{{संदर्भनोंदी}}
(येथपर्यंत कॉपी करा)
पान जतन केल्यावर असे दिसेल:
- संदर्भ प्रयोग
- या विधानाला मी संदर्भ देत आहे.[१]
- संदर्भ आणि नोंदी
- १. ^संदर्भ (दुवा, पुस्तक, इ.)
हा प्रयोग तुम्ही विकिपीडिया:धूळपाटी येथेही करू शकता.
आंतरजालावर नसलेले संदर्भ
संपादनविकिपीडियावर संदर्भ देताना ते आंतरजालावरच असले पाहिजेत असे नाही. एखाद्या पुस्तक, लेख किंवा बातमीपत्रातील माहितीसुद्धा संदर्भस्रोत म्हणून वापरता येते. उदाहरणादाखल सकाळमध्ये प्रकाशित झालेल्या एखाद्य बातमीचा संदर्भ असा देता येतो:
एप्रिल, २०११मध्ये अंमळनेर उपविभागात १३६ गावांमध्ये पोलिसपाटील नव्हते<ref>''[[अमळनेर]] उपविभागातील १३६ गावांना पोलिसपाटलाची प्रतीक्षा'', ''[[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]]'', [[पुणे]], [[एप्रिल २०]], [[इ.स. २०११|२०११]].</ref>
हा संदर्भ असा दिसेल:
पुस्तकातील संदर्भ असा द्यावा:
<ref>चार्मली, जॉन (२००६). ''द प्रिन्सेस अँड द पॉलिटिशियन'', पृ. ६०. [[पेंग्विन बुक्स]], [[लंडन]]. आयएसबीएन ०१४०२८९७१२.</ref>
हा संदर्भ असा दिसेल:
चार्मली, जॉन (२००६). द प्रिन्सेस अँड द पॉलिटिशियन, पृ. ६०. पेंग्विन बुक्स, लंडन. आयएसबीएन ०१४०२८९७१२.
वर्तमानपत्रातील बातमी किंवा पुस्तकाच्या नावे ('' '' मध्ये घालून) तिरकी लिहावी.
तारीख लिहिण्याचे प्रकार
संपादनसंदर्भांमध्ये तारीख देताना खालीलपैकी एक प्रकार वापरावा:
- [[२७ जानेवारी]], [[इ.स. २००७]] किंवा [[२७ जानेवारी]], [[इ.स. २००७|२००७]]
- [[जानेवारी २७]], [[इ.स. २००७]] किंवा [[जानेवारी २७]], [[इ.स. २००७|२००७]]
- २००७-०१-२७
पैकी शेवटचा प्रकार आयएसओ ८६०१ या आंतरराष्ट्रीय प्रमाणास धरुन आहे.
संदर्भ साचे
संपादनसंदर्भ देताना साचे वापरुन तुमचे काम अधिक सोपे होऊ शकते. यासाठी विकिपीडिया साच्यांशी तुमची तोंडओळख असणे हितावह आहे. यासाठी ref टॅग्सच्या मध्ये पाहिजे तो साचा घालून त्यात आवश्यक माहिती भरली की संदर्भ दिसू लागतो.
अधिक माहितीसाठी विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण - साचे वापरुन हे पान पहा.
तसेच साचा:संकेतस्थळ स्रोत साचा:पुस्तक स्रोत, इ साचे पहा. अधिक साचे वर्ग:संदर्भ साचे येथे आहेत.
एकच संदर्भ अनेकदा कसा वापरावा
संपादनएकाच लेखात वेगवेगळ्या ठिकाणी एकच संदर्भ देण्यासाठी त्या संदर्भाला नाव द्यावे:
- <ref name="सकाळ">संदर्भ (दुवा, पुस्तक, इ,)</ref>
त्यानंतर पुन्हा तोच संदर्भ देण्यासाठी नुसते नाव देणे पुरेसे आहे:
- <ref name="सकाळ" />
वरील प्रकारे पाहिजे तितक्यांदा एकच संदर्भ वापरता येतो.
इतर पद्धती
संपादनयेथे नमूद केलेल्या संदर्भ देण्याच्या सोप्या पद्धती आहेत. यात संदर्भ आणि नोंदी एकाच विभागात दिल्या जातात. मोठ्या लेखांत तसेच मोठ्या प्रमाणात संदर्भ आणि नोंदी असल्यास दोन्हीसाठी वेगवेगळे विभाग करता येतात. वेगळ्या नोंदी करण्यासाठी [हॅरियेट आर्बथनॉट] हा लेख पहा. विस्तृत नोंदींचे उदाहरण [ब्राउन डॉग अफेर] लेखात आहे.
हे सुद्धा पहा
संपादन
बाह्य दुवे
संपादन- सायटेशन जनरेटर संदर्भ तयार करण्यासाठीचे संयंत्र