विकिपीडिया:दिनविशेष/सप्टेंबर २९
- १२२७ - क्रुसेडमध्ये भाग न घेतल्याबद्दल पोप ग्रेगोरी नवव्याने पवित्र रोमन सम्राट फ्रेडरिक दुसऱ्याला (चित्रित) वाळीत टाकले.
- १९९२ - ब्राझीलचे अध्यक्ष फर्नांडो कोलोर डी मेलो यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला.
- २०१६ - उरी हल्ल्याच्या अकरा दिवसांनंतर, भारतीय लष्कराने पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमध्ये संशयित अतिरेक्यांवर "सर्जिकल स्ट्राइक" केले.
जन्म:
- १७८६ - ग्वादालुपे व्हिक्टोरिया, मेक्सिकोचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९५१ - मिशेल बाशेलेट, चिले देशाची पहिली स्त्री राष्ट्राध्यक्ष.
- १९५६ - सेबास्टियन को, इंग्लिश धावपटू.
मृत्यू:
- १९८७ - हेन्री फोर्ड दुसरा, अमेरिकन उद्योगपती.
- २००१ - न्विन व्हान थ्यु, दक्षिण व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष.
- २००६ - वॉल्टर हॅडली, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
मागील दिनविशेष: सप्टेंबर २८ - सप्टेंबर २७ - सप्टेंबर २६