विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट २०
- १७७५ - स्पेनने तुसॉन, अॅरिझोना येथे किल्ला बांधून शहर स्थापले.
- १९०० - जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.
- १९१४ - पहिले महायुद्ध - जर्मनीने ब्रसेल्स काबीज केले.
- १९६८ - २ लाख सैनिक व ५,००० रणगाड्यांसह सोवियेत संघ व इतर राष्ट्रांनी चेकोस्लोव्हेकियावर चढाई केली.
- २००८ - स्पानएर फ्लाइट ५०२२ हे माद्रिद पासून ग्रान केनेरियाला निघालेले विमान माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर धावपट्टीवरुन घसरले. १५३ ठार. १८ बचावले.
जन्म:
- १७७९ - जोन्स जेकब बर्झेलियस, स्विस रसायनशास्त्रज्ञ.
- १८३३ - बेंजामिन हॅरिसन, अमेरिकेचा २३वा राष्ट्राध्यक्ष.
- १९४४ - राजीव गांधी, भारतीय पंतप्रधान.
- १९४६ - एन.आर. नारायण मुर्ती, (चित्रीत) भारतीय उद्योगपती.
मृत्यू:
- १९८४ - पॉल डिरॅक, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १९९७ - प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक.