वाल्डो कॅन्यन वणवा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात लागलेला वणवा होता. जून २३, इ.स. २०१२ रोजी लागलेली ही आग १० जुलै रोजी आटोक्यात आली.

वाल्डो कॅन्यन वणवा डोंगर उतरत असताना. खाली मध्यात असलेल्या फुटबॉल स्टेडियमवरून डोंगर व आगीचा आकार लक्षात येतो.

ही आग कॉलोराडो स्प्रिंग्जच्या वायव्येस १६ किमी अंतरावर पाइक राष्ट्रीय अरण्यात सुरू झाली आणि १८,०७३ एकर भागात पसरली.[१]या आगीमुळे कॉलोराडो स्प्रिंग्ज, वूडलँड पार्क, एरफोर्स अकॅडेमी आणि हायवे २४ च्या आसपासच्या अंदाजे ३६,००० व्यक्तींना घर सोडावे लागले.[२][३] या आगीत एकूण ३४७ घरे जळाली.[४] या आगीमुळे हायवे २४ हा रॉकीझ पर्वतरांगेतील पूर्व-पश्चिम जाणारा महत्त्वाचा मार्ग बंद करण्यात आला होता.[५] या आगीत दोन व्यक्ती मृत्युमुखी पडल्या तर अंदाजे १० व्यक्ती जखमी झाल्या. वाल्डो कॅन्यन वणवा कॉलोराडोच्या इतिहासातील ब्लॅक फॉरेस्ट वणव्यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात खर्चिक वणवा होता. यात जळीत झालेल्या घरांची किंमत अंदाजे ३ कोटी ५३ अमेरिकन डॉलर (१९ अब्ज ५० कोटी रुपये) करण्यात आली आहे.[६] याव्यतिरिक्त नैसर्गिक संपत्ती, मानवनिर्मित सोय-व्यवस्था, निर्वासित व्यक्तींवरील खर्च यांची गणती जुलै २०१२पर्यंत चालू होती.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "वाल्डो कॅन्यन फायर अपडेट ६-३०-१२ दुपार". InciWeb (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2012-07-06. जुलै १, २०१२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "Waldo Canyon fire forces 11,000 people from their homes" (इंग्लिश भाषेत). 2012-06-24 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "Colorado wildfire: Waldo Canyon fire now at 18,500 acres" (इंग्लिश भाषेत). 2012-06-28 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "Colorado Springs Mayor: Fire Has Destroyed '346 Homes'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ 600 Personnel Working To Contain 4,500 Acre Waldo Canyon Fire Archived 2012-06-26 at the Wayback Machine., KKTV, Mon 9:01 PM Jun 25, 2012[मृत दुवा]
  6. ^ UPDATE 2-Colorado Springs fire ranks as state's most destructive on record, Reuters, Thu 7:12 PM EDT Jun 28, 2012