वळवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे.

  ?वळवली

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर पनवेल
जिल्हा रायगड जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

भौगोलिक स्थान संपादन

वळवली गाव पनवेल तालुक्यातील एक गांव आहे.जिल्हा रायगड आहे व इथे आगरी-कोळी जातीचा समाज भरपूर मोठ्या प्रमाणात आहे तसेच बौद्ध व आदिवासी समाज थोड्या प्रमाणात आहे. गावाची एकजुटीचा प्रतिक "गावदेवी मंदिर" गावाची शान आहे. व वळवली-पनवेल रोडला "स्वयंभू शिवमंदिर" पनवेल तालुक्यातील फेमस पेक्षनिय स्थळ आहे. तसेच गावाचा शेजारी टेंभोंडे, नेवाली, नवीन पनवेल सेक्टर ६ ही गावे आहेत व पुवेंस तळोजा एमआयडीसी विभाग पडघे, कोळवाडी ही गावे आहेत. भौगोलिक दृष्ट्या या गावात ५०० ते ५५० घर आहेत. व लोकसंख्या १४०० ईतकी आहे. या गावात सागवाडी, बौद्धवाडी ही गावे सुद्धा समाविष्ट आहेत. या गावाला जोडलेला रस्ता हा नवीन पनवेल सेक्टर ६ आहेत. येथुनच सर्व लोक खरेदीसाठी सामान घेण्यासाठी पनवेल बाजारपेठला जात असतात. या गावाला लागूनच कळंबोली रेल्वे स्थानक आहे. आगरी-कोळी-कराडी-कुणबी कुळदैवत "एकविरा आई"कालाॆ डोंगर व मातंडॆ मल्हारी जेजुरी ही येथील कुळदैवत आहेत. प्रकल्पग्रस्तचे आधारस्तंभ दि.बा. पाटील हे सुद्धा येथील लोकांचे 'दैवत' बनले आहेत.

हवामान संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. तसेच इथली जमीन १९७० साली सिडको संपादीत झाली. मोबादला म्हणून सिडको न शासनाने १२.५% विकसित जमीन कामोठे-नवी मुंबई या नोड दिली. परंतु ८.६७% परतावा मिळाला परंतु ३.८३% टक्के जमीन परतावा शिल्लक बाकी आहे म्हणून आजुन सिडको व शासना विरुद्ध लढा न्यायप्रविष्ट आहे. व टेंभोडे-वळवली प्रकल्पग्रस्त संस्था कित्येक वर्षे आंदोलन करत आहे. दि बा पाटील यांच्यामुले येथील लोकना जमीनचा परतावा मिळाला, हे येथील प्रकल्पग्रस्तचे दैवत आहेत.

लोकजीवन संपादन

वळवली गावाचे लोकजीवन सुखसमृद्धी आहे. येथील मुले व लोक जवळच्या तळोजा एमआयडीसी काम करतात. तर काही लोक कामधंदा करतात. आता रिक्षा व इको मिनिडोअर ४ चाकी वाहन सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे तेचावरच तेचा उदरनिर्वाह चालवतात. बहुतेक मुले मोठी डीग्री घेऊन मोठ्या जागेवर काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. तसेच काही किराणा दुकान धंदा करून आपली उपजीविका भागवतात. काही बाहेर राज्यतुन पंरप्रातीय लोक सुद्धा ईथे थोड्या प्रमाणात राहतात. तेचा भाडा पनवेल तालुक्यात एकच गांव आसेल वळवली की एकदम कमी प्रमाणात १००० रुपये एवढ्या भाड्यावर राहतात व ते भाड्यावर येथील लोक पोटपाणी व उदरनिर्वाह चालवतात. तसेच येथे १ ते ७वी शाळा आसुन दोन बालवाडी.आगंनवाडी आहे.

प्रेक्षणीय स्थळे संपादन

वळवली गावात प्रेक्षणीय स्थळे भरपूर प्रमाणात आहेत. गावात प्रवेश करत वेळी हनुमान मंदिर,विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर ही मंदिरे आहेत. तसेच वळवली-पनवेल रोडवर शिवमंदिर हे नावाजलेले स्वयंभु शंकर मंदिर आहे. तसेच वळवली डोंगर, व वळवली वसंत बंधारा अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. तसेच गावाची एकजुटीचा प्रतीक "गावदेवी मंदिर" गावाची शान आहे.

नागरी सुविधा संपादन

वळवली गावाची नागरी सुविधा कमकुवत आहे. २०१६ साली पनवेल महानगरपालिका गाव समाविष्ट केले. तिथपासून येथे पाणी, रस्ते,व नियोजन अभाव,तसेच महापालिका मैदान,खेळाचे मैदान असुविधा ईत्यादी सुविधा कमतरता आभाव आहे. सध्या लोकची पनवेल महानगरपालिका सुविधा न देणे परंतु टॅक्स मोठ्या प्रमाणात वाढवणे. म्हणून "पनवेल महानगरपालिका वगळा" व आम्हाला ग्रामपंचायत द्या ही मागणी होत आहे

जवळपासची गावे संपादन

वळवली गांवच्या पुवेंस टेंभोडे,नेवाली,न्यु पनवेल सेक्टर 6,व पश्चिमेस पडघे,कोळवाडी,तळोजा एमआयडीसी विभाग ही गावे व शहर आहेत.संकलन श्री विकास पेटकर

संदर्भ संपादन

  1. व्हिलेजइन्फो.इन
  2. सेन्सस२०११.को.इन
  3. टूरिझम.गव्ह.इन
  4. .https://www.incredibleindia.org/
  5. .https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. मॅप्सऑफइंडिया.कॉम