वनिता मथिल
वनिता माथिल याचा अर्थ महिलांची भिंत असा आहे. १ जानेवारी २०१९ रोजी भारतातील केरळ राज्यात लैंगिक समानता आणि लिंगभेदाच्या विरोध करण्यासाठी तयार केलेली ही एक मानवी साखळी होती. ही मानवी भिंत पूर्णपणे महिलांनी भाग घेऊन बनवली होती. ही सुमारे ६२० किलोमीटर (३९० मैल) लांबीची होती. ही कासरगोड पासून तिरुवनंतपुरम पर्यंत होती. [१] [२] [३] या कार्यक्रमात सुमारे तीन ते पाच लाख महिलांनी सहभाग घेतला होता. [४] [५]
कोल्लम येथील महिलांची भिंत | |
तारीख | १ जानेवारी २०१९ |
---|---|
स्थान | केरळ, भारत |
प्रकार | मानवी साखळी |
हेतू | लिंग समानता कायम ठेवण्यासाठी आणि सबरीमाला येथे प्रवेश नियमांमध्ये होणाऱ्या लिंग भेदभावाच्या विरोधात |
आयोजक | केरळ सरकार |
सहभागी | ५० लाख महिला |
पार्श्वभूमी
संपादनकेरळमध्ये, सबरीमाला येथील हिंदू मंदिराने परंपरेनुसार १० ते ५० वयोगटातील महिलांना अयप्पाच्या पूजेसाठी प्रवेश करण्यास मनाई केली आहे. काही लोकांनी दावा केला की स्त्रियांना मासिक पाळी अशुद्ध असल्यामुळे प्रतिबंधित आहे, परंतु काही भक्तांनी दावा केला की देवतेच्या ब्रह्मचारी स्वभावामुळे त्यांना परवानगी नाही. [६] [७] सप्टेंबर २०१८ मध्ये, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने, एका ऐतिहासिक निकालात असे नमूद केले की सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी असायला पाहिजे. जैविक फरकांवर आधारित कोणताही भेदभाव स्पष्टपणे असंवैधानिक आहे. [८] राज्य डाव्या लोकशाही आघाडीच्या सत्ताधारी आघाडीने या निर्णयाचे स्वागत केले, तर भारतीय जनता पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेससारख्या विरोधी पक्षांनी या निर्णयाला विरोध करत निदर्शने केली. [९] अनेक हिंदू गटांनी या निर्णयाचा आणि राज्य सरकारच्या अंमलबजावणीच्या निर्णयाचा निषेध केला. [१०]
भिंत
संपादन१५ डिसेंबर २०१८ रोजी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी १७६ सामाजिक आणि राजकीय संघटनांशी बैठक केल्यानंतर घोषणा केली की, राज्याच्या नवनिर्मिती मूल्यांचे रक्षण करण्यासाठी नवीन वर्षाच्या दिवशी महिलांची भिंत आयोजित केली जाईल. [११] [१२] प्रभा वर्मा यांच्या कार्यक्रमाचे थीम साँग रिलीज करण्यात आले. [१३]
१ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ४:०० वाजता ६२० किलोमीटर (३९० मैल) लांबीची मानवी भिंत तीस ते पन्नास लाख महिलांनी मिळून भिंत तयार केली. [१४] केरळचे आरोग्य आणि सामाजिक न्याय मंत्री के.के. शैलजा यांनी कासारगोडमध्ये राज्याच्या उत्तर टोकाला भिंत सुरू केली आणि दक्षिणेतील तिरुअनथपुरममध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा कारत यांच्यासोबत संपली. [१] राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कासारगोडमधील भिंतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. [१५]
त्याच दिवशी, केरळमधील कार्यक्रमाच्या समर्थनार्थ, नवी दिल्ली, [१६] मुंबई, [१७] आणि चेन्नईसह इतर भारतीय शहरांमध्ये वनिता माथिल यांच्यासोबत एकता म्हणून महिलांच्या भिंती आयोजित करण्यात आल्या. [१८]
केरळमधील महिलांची भिंत ही जगातील चौथी सर्वात मोठी मानवी साखळी बनली आहे आणि सर्वात मोठी फक्त महिलांनी बनवलेली साखळी बनली आहे. [१९]
संदर्भ
संपादन- ^ a b "Women's Wall highlights: Massive turnout in Kerala for equal rights". द टाइम्स ऑफ इंडिया. 1 January 2019. 1 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "Sabarimala row: Lakhs to form 'women's wall' in Kerala". द इकोनॉमिक टाइम्स. 1 January 2019. 1 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "Women's wall in Kerala HIGHLIGHTS: Lakhs of women line up for 'Vanitha Mathil' across state". द इंडियन एक्सप्रेस. 1 January 2019. 1 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "Lakhs Of Women Join Hands To Form 620-Km "Human Wall For Equality" In Kerala". NDTV. 1 January 2019. 2 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "Kerala wall: 50 lakh women form 620-km Vanitha Mathil, take pledge to uphold gender equality". India Today. 1 January 2019. 3 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "India's top court strikes down ban on 'menstruating' women entering Hindu holy site". The Independent. 28 September 2018.
- ^ "Celibate nature of Lord Ayyappa of Sabarimala temple protected by Constitution, SC told". Times of India. 25 July 2018. 11 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "Sabarimala temple: India's top court revokes ban on women". BBC. 28 September 2018. 5 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "Women have the same right to worship as men: Pinarayi Vijayan on Sabarimala issue". India Today. 17 October 2018. 21 November 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "Sabarimala women entry: Hindu outfits to intensify stir". Times of India. 11 October 2018. 12 October 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "Kerala gears up for massive Women's Wall event: All you need to know". The News Minute. 31 December 2018. 3 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "It's official: 'Women's wall' is a state govt programme". Times of India. 6 December 2018.
- ^ "Slew of spirited musical expression for women's wall". United News of India. 29 December 2018. 3 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "Sabarimala temple: Indian women form '620km human chain' for equality". BBC News. BBC. January 2019. 2 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "Suspected RSS-BJP workers attack women's wall at Kasargod's Chettukund; journalists assaulted". The New Indian Express. 2 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "Sabarimala row HIGHLIGHTS: Delhi women support 'Women's wall' campaign, demonstrate outside Kerala House". हिंदुस्तान टाइम्स. 2 January 2019.
- ^ "Women form human chain in Mumbai to support Kerala 'Women's Wall'". द इकोनॉमिक टाइम्स. 2 January 2019.
- ^ "Chennai women form Vanitha Mathil in solidarity with Kerala Women's Wall". The New Indian Express. 1 January 2019. 6 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "In case you haven't noticed yet, the women's wall in Kerala was the fourth largest human chain ever". News 18. 3 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 January 2019 रोजी पाहिले.
]