वणी विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

वणी विधानसभा मतदारसंघ - ७६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, वणी मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. मारेगांव, २. झरी जामणी आणि ३. वणी या तालुक्यांचा समावेश होतो. वणी हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय जनता पक्षाचे संजिवरेड्डी बापुराव बोदकुरवार हे वणी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

संपादन

वणी विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • मारेगांव तालुका
  • झरी जामणी तालुका
  • वणी तालुका

वणी मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

संपादन
वर्ष आमदार पक्ष
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५६)
१९५२ डॉ. देवराव यशवंत गोहोकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बॉम्बे राज्य (१९५६-१९६०)
१९५७[n १] भुजंग किर्तीमंतराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
श्रीधर नाथोबाजी जवाडे
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६२ विठ्ठल यशवंत गोहोकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७
१९७२ सिताराम नांदेकर अपक्ष
१९७८ बापूराव हर्बाजी पंघाटे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८०
१९८५ नामदेव नारायण काळे भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१९९० वामनराव बापूराव कासावार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९९५
१९९९ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००४ विश्वास रामचंद्र नांदेकर शिवसेना
२००९ वामनराव बापूराव कासावार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ संजीवरेड्डी बापुराव बोदकुरवार भारतीय जनता पक्ष
२०१९
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर वणी विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.

नोंदी

संपादन
  1. ^ द्विसदस्यीय जागा.
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).