लोहारी (गुरुमुखी: ਲੋਹੜੀ,शाहमुखी: لوہڑی) हा पंजाब प्रांतात साजरा होणारा हिवाळ्यातील सुगीचा उत्सव आहे.[][] उत्तर हिंदुस्थानातील शीख आणि हिंदू नागरिक हा उत्सव साजरा करतात.[] १३ जानेवारी रोजी हा उत्सव साजरा केला जातो.[] या उत्सवाशी संबंधित कथा आणि आख्यायिका पंजाब प्रांतात प्रचलित आहेत.[]

लोहारी

स्वरूप

संपादन
  • लोहारी हा सूर्याच्या उत्तरायण संक्रमणाशी माघ महिन्यात येणारा उत्सव आहे.[][] हिवाळा ऋतूला निरोप देणे असा या उत्सवाचा हेतू असतो.सामान्यत: मकरसंक्रांत सणाच्या आदल्या दिवशी लोहारी साजरा केला जातो.[]

उत्तर भारतातील दिल्ली , पंजाब, हरियाणा या प्रांतात या दिवशी विशेष सुट्टी दिली जाते.[][]

  • अग्नीपूजा हा या उत्सवातील महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. हिवाळा ऋतू असल्याने शेकोटी पेटविणे याला पारंपरिक महत्त्व मिळाले आहे.[] गूळ,गजक, उसाचा रस यांचा समावेश या दिवशी खाण्यात आवर्जून समावेश केला जातो.[१०]

गावाच्या मध्यभागी सूर्यास्ताला संध्याकाळी शेकोटी पेटविली जाते. लोक त्यामध्ये तीळ, गूळ वाहतात. त्याभोवती बसून लोकगीते गातात आणि पारंपरिक नृत्य करतात. शेतातील ताजी मक्याची कणसे भाजून खाणे हा एक विशेष कार्यक्रम असतो. शेतात आलेला लाल मुळा हा सुद्धा या दिवशी जेवणात समाविष्ट केला जातो. मोहरीच्या पानांची भाजी, मक्याची पोळी, किंवा भाकरी ही या उत्सवाची महत्त्वाची मेजवानी असते.[११] तीळ घालून केलेला भात या दिवशी जेवणात समाविष्ट असतो. याला त्रिचोली म्हणले जाते.

  • पंजाबच्या काही प्रांतात लोहारी या देवतेची स्थापना केली जाते. गायीच्या शेणापासून ही मूर्ती तयार करून तिची सजावट केली जाते.[१२]
 
पंजाबात वापरला जाणारा गूळ

पूर्वतयारी

संपादन

लोहारी सणाच्या आधी सुमारे पंधरा दिवस तरुण सदस्य लोहारीच्या शेकोटीसाठी लाकडे गोळा करायला फिरू लागतात. त्याजोडीने धान्य आणि गूळ विक्रीचा उपक्रम सुद्धा असे गट करतात.

महत्त्व

संपादन
 
लोहारी निमित्त सजलेली पंजाबी महिला

सुगीच्या काळातील हाती येणा-या शेतातील पिकाचा आनंद साजरा करणे असे या सणाचे महत्त्व आहे.[१३] सूर्याचे उत्तरायण सुरू होवून दिवस मोठा आहोत असल्याने सूर्याची पूजा आणि स्तुती ही सुद्धा या उत्सवात केली जाते. दुल्ला भट्टी हा पंजाब प्रांतात एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून ओळखला जातो. अकबराच्या काळात हिंदू युवतीना पळवून नेले जात असे. त्या मुलींचे रक्षण करणारा म्हणून दुल्ला भट्टी विशेष प्रसिद्ध आहे आणि त्याला समाजात मानाचे स्थान आहे.[][१४] त्याने वाचविलेल्या सुंदरी आणि मुन्दरी या दोन युवती पंजाबी लोककथांमधे अजरामर झाल्या आहेत.[१५] या उत्सवाच्या निमित्ताने लहान मुले आसपास जाऊन लोकगीते म्हणतात त्यात याच्या नावाचा उल्लेख येतो. या लोकगीत गायनाच्या कार्यक्रमानंतर घरोघरी लहान मुलांना खाऊ आणि पैसे दिले जातात.

संत कबीर यांच्या पत्नी लोई यांच्या निमित्ताने हा उत्सव सुरू झाला अशीही एक मान्यता आहे.[१४][१६] लोई म्हणजे अग्नीतील तेज आणि उर्जा होय. होलिका आणि लोई या दोघी बहिणी असल्याचे काही ठिकाणी मानले जाते. सिंधी समुदायात लोई या नावाने हा सण साजरा केला जातो.[१७]

हे ही पहा

संपादन

बैसाखी

मकरसंक्रांत

पंजाब

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c Dhillon, Parveen Kaur (2015-03-03). Lohri: The Bonfire Festival (इंग्रजी भाषेत). MASCOT BOOKS. ISBN 978-1-63177-071-5.
  2. ^ Singh, Pashaura; Fenech, Louis E. (2014-03-27). The Oxford Handbook of Sikh Studies (इंग्रजी भाषेत). OUP Oxford. ISBN 978-0-19-100411-7.
  3. ^ Kapura, Navaratna (1978). Lohari, samanvayatmaka loka parva (हिंदी भाषेत). Jivana Santa Pablisara.
  4. ^ Warrier, Shrikala; Walshe, John G. (2001). Dates and Meanings of Religious and Other Multi-Ethnic Festivals, 2002-2005 (इंग्रजी भाषेत). Foulsham Educational. ISBN 978-0-572-02659-2.
  5. ^ a b Purewal, Navtej K. (2010-04-15). Son Preference: Sex Selection, Gender and Culture in South Asia (इंग्रजी भाषेत). Berg. ISBN 978-1-84520-468-6.
  6. ^ Sharma, Yash Karan. Encyclopedia of Astrological Remedies (इंग्रजी भाषेत). All India Federation of Astrologers' Societies.
  7. ^ Ph.D, James G. Lochtefeld (2001-12-15). The Illustrated Encyclopedia of Hinduism, Volume 1 (इंग्रजी भाषेत). The Rosen Publishing Group, Inc. ISBN 978-0-8239-3179-8.
  8. ^ Mehra, Komal (2001-07). Festivals of India (इंग्रजी भाषेत). Sterling Publishers Pvt. Ltd. ISBN 978-81-7181-755-9. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  9. ^ Gopal, Dr Krishna; Girota, Phal S. (2003). Fairs and Festivals of India: Chandigarh, Delhi, Haryana, Himachal Pradesh, Jammu and Kashmir, Punjab, Rajasthan, Uttaranchal, Uttar Pradesh (इंग्रजी भाषेत). Gyan Pub. House.
  10. ^ Kapoor, Subodh (2002). The Indian Encyclopaedia: La Behmen-Maheya (इंग्रजी भाषेत). Cosmo Publications. ISBN 978-81-7755-271-3.
  11. ^ Bhanoo, Suman. Community Participation in Conservation of Great Himalayan National Park, India (इंग्रजी भाषेत). Notion Press. ISBN 978-93-5206-118-1.
  12. ^ Tiwari, Rajiv. Delhi A Travel Guide (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books Pvt Ltd. ISBN 9798128819703.
  13. ^ Harvest Celebrations (इंग्रजी भाषेत). World Book. 2002-10-01. ISBN 978-0-7166-5007-2.
  14. ^ a b Singh, Sardar Harjeet (2009). Faith & Philosophy of Sikhism (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 978-81-7835-721-8.
  15. ^ "कानपुर में दिखा पंजाब सा नजारा". livehindustan. 13.1.2020. 19.1.2020 रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  16. ^ Prasoon, Prof Shrikant (2009-07-03). Knowing Sant Kabir (इंग्रजी भाषेत). Pustak Mahal. ISBN 978-81-223-1055-9.
  17. ^ "Lohri Aaye Rey". dailyexcelsior. 13.1.2016. 19.1. 2020 रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)