लक्ष्मणराव सरदेसाई

मराठी लेखक

लक्ष्मणराव सरदेसाई हे कोंकणीमराठी भाषेतील एक लेखक होते.


लक्ष्मणराव सरदेसाई
जन्म नाव लक्ष्मणराव श्रीपादराव सरदेसाई
जन्म १८ मार्च, इ.स. १९०४[१]
सावई-वेरे, फोंडा, गोवा
मृत्यू ४ फेब्रुवारी, इ.स. १९८६
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी, कोंकणी
साहित्य प्रकार कथासंग्रह,समीक्षा
प्रसिद्ध साहित्यकृती गोव्याकडची माणसं,
त्यांचे खबरी काय कर्म्यांच्यो, काय कर्म्यांच्यो
अपत्ये मनोहरराव सरदेसाई
शशिकांत देसाई
पुरस्कार साहित्य अकादमी

जीवन संपादन

लक्ष्मणराव सरदेसाई यांचा जन्म गोवा राज्यातील फोंडा येथील सावई-वेरे या गावात झाला. त्यांचे शिक्षण पणजी येथे झाले. त्यांनंतर त्यांनी म्हापसा येथे ‘कुर्लेजियु इन्दियानु’ नावाची खाजगी शिक्षणसंस्था स्थापन केली व तेथे त्यांनी पाच वर्षे काम केले. गोव्याच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापकांपैकी लक्ष्मणराव एक होते.[२]

पोर्तुगीज राजवटीतील गोव्यातील लोकजीवन त्यांनी आपल्या कथांमधून मांडले आहे.

लक्ष्मणराव देसाई यांची ग्रंथसंपदा संपादन

  • कल्पवृक्षाच्या छायेत
  • सागराच्या लाटा
  • वादळातील दीपस्तंभ
  • ढासळलेले बुरुज
  • अनितेचे दिव्य
  • संसारातील अमृत
  • सोनेरी ऊन
  • निवारा
  • मांडवी! तू आटलीस का?
  • लक्ष्मणरेषा
  • गोव्याकडची माणसं
  • जगावेगळा (L'etrange या फ्रेंच कादंबरीचे मराठी भाषांतर)
  • ब्राह्मण (उश बामनीश या पोर्तुगिज कादंबरीचे मराठी )
  • कथाशिल्प (समीक्षाग्रंथ)
  • रामग्याली वागाभोवंडी (कोंकणी)
  • पापडम कव्याली (कोंकणी)
  • त्यांचे खबरी काय कर्म्यांच्यो, काय कर्म्यांच्यो (आत्मकथन)

संदर्भ संपादन


संदर्भसूची संपादन

  • सरदेसाई, लक्ष्मणराव. गोव्याकडची माणसं.