रोहिणी उपग्रह

भारतीय उपग्रहांची मालिका

रोहिणी ही भारत देशाच्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अवकाशात सोडलेल्या उपग्रहांची मालिका आहे.

रोहिणी उपग्रह
निर्मिती संस्था इस्रो
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक स्थान सतीश धवन अंतराळ केंद्र
प्रक्षेपक देश भारत
निर्मिती माहिती
आकार ३६०
निर्मिती स्थळ/देश भारत
अधिक माहिती
कार्यकाळ ६ वर्षे

या मालिके अंतर्गत ४ उपग्रह अवकाशात सोडले गेले. या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी उपग्रह प्रक्षेपण यानचा वापर करण्यात आला. या मालिके अंतर्गत प्रक्षेपण करण्यात आलेले उपग्रह मुख्यत्वे प्रायोगिक तत्त्वावर काम करणारे होते.

मालिकेतील उपग्रह

संपादन

रोहिणी टेकनॉलॉजि पेलोड (आर टी पी )

संपादन

या उपग्रहाचे प्रक्षेपण १० ऑगस्ट १९७९ मध्ये करण्यात आले. प्रक्षेपण स्थळ सतीश धवन अंतराळ केंद्र होते. याचे वजन ३५ किलो व ३ वॅट ऊर्जेचा वापर केल्या गेला होता. उपग्रहाचे प्रक्षेपण करनारे वाहक रॉकेट अंशतः यशस्वी झाल्यामुळे हा आपल्या निर्धारित कक्षे पर्यंत पोहोचू शकला नाही.

आर एस -१

संपादन

उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण १८ जुलै १९८०ला सतीश धवन अंतराळ केंद्रावरून करण्यात आले होते. स्वदेशी बनावटीचे प्रक्षेपक वाहक एस एल व्ही वापरून यशस्वी प्रक्षेपण केलेला हा पहिला उपग्रह आहे.याचे पण वजन आर टी पी प्रमाणे ३५ किलो परंतु ऊर्जा १६ वॅट वापरण्यात आली.या उपग्रहाचा कार्यकाळ हा १.२ वर्षाचा होता.

आर एस- डि १

संपादन

३८ किलो वजन व १६ वॅट ऊर्जेचा वापर करण्यात या उपग्रहासाठी करण्यात आला होता आणि याचे प्रक्षेपण ३१ मे १९८१ मध्ये करण्यात आले होते.

हा उपग्रह त्याच्या निर्धारित कक्षेमध्ये केवळ ९ दिवशी टिकू शकला कारण उपग्रहाला प्रक्षेपित करणारे एस एल व्ही यान अंशतः यशस्वी झाले होते.

आर एस- डि २

संपादन

याचे वजन ४१.५ किलो व १६ वॅट ऊर्जेचा वापर करण्यात आला होता. प्रक्षेपण १७ एप्रिल १९८३ मध्ये झाले.या उपग्रहाचा कार्यकाळ हा १७ महिन्यांचा होता.या कार्यकाळामध्ये उपग्रहाने २५०० दृश्य टिपले. ७ वर्षाच्या परिभ्रमण काळानंतर हा उपग्रह १९ एप्रिल १९९० मध्ये पृथ्वीच्या कक्षेमध्ये पुनरागमन झाले होते.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन

[]

  1. ^ "Rohini Satellite (RS-1) Series (Launched by Indian Rocket)". 2016-06-28. रोजी मूळ पानापासून संग्रहित2016-06-28. 2018-04-16 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)