रेवती लेले
रेवती लेले (२३ जानेवारी, १९९५ - ) एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री आणि कथक नृत्यांगना आहे. तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झी युवावरील गुलमोहर नावाच्या मालिकेने केली. नंतर तिने विठू माऊली, वर्तुळ आणि ललित 205 इत्यादी मराठी मालिकांमध्ये काम केले.
रेवती लेले | |
---|---|
जन्म |
रेवती जयंत लेले २३ जानेवारी १९९५ जळगांव, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
शिक्षण | नृत्य विशारद (कथक), एम् बी ए (मानव संसाधन) |
पेशा | नटी आणि कथक नृत्यांगना |
ख्याती | कलर्स मराठी च्या स्वामींनी मालिकेत रमाबाई पेशवे ची भूमिका |
२०२० मध्ये तिने कलर्स मराठीच्या दूरचित्रवाणी मालिका स्वामिनी मध्ये रमाबाई पेशव्यांची भूमिका साकारली.[१] 2021 मध्ये, तिने स्टारप्लसवरील "आपकी नज़रों ने समझा" या मालिकेद्वारे हिंदी दूरचित्रवाणी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला, ज्यामध्ये तिने बांसुरीची भूमिका साकारली.[२]
लेले या कथक नृत्यांगना देखील आहेत. त्यांनी मार्गदर्शक टीना तांबे यांचा बरोबर आणि भारत आणि परदेशातील अनेक नृत्य महोत्सवांमध्ये नृत्याविष्कार सादर केले आहे. फिरोज अब्बास खान दिग्दर्शित मुघल-ए-आझम (म्युझिकल) या ब्रॉडवे शैलीचा अविष्काराचा त्या एक भाग होत्या.
व्यक्तिगत जीवन
संपादनलेले यांचा जन्म महाराष्ट्रातील जळगाव येथे झाला. नंतर त्या मुंबईत राहिल्या. त्यांनी भवन्स कॉलेज, मुंबई येथून पदवी आणि सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमधून मानव संसाधन मध्ये एमबीए पूर्ण केले. रेवती यांनी नृत्य तज्ज्ञ टीना तांबे यांच्याकडून शिकत असताना अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून कथ्थक डिप्लोमा नृत्य विशारद केला आहे.
कारकीर्द
संपादनवर्ष | मालिका | चरित्र | दूरचित्रवाणी वाहिनी | संदर्भ |
---|---|---|---|---|
२०१८ | गुलमोहर (मराठी) | रूचि | झी युवा | |
२०१८ | विठू माउली (मराठी) | मन्दाकिनी | स्टार प्रवाह | |
२०१८ | वर्तुळ (मराठी) | श्वेता | झी युवा | |
२०२० | स्वामिनी (मराठी) | रमा बाई | कलर्स मराठी | [३] |
२०२१ | आपकी नज़रों ने समझा | बांसुरी | स्टार प्लस | [४] |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Actress Revati Lele to feature in popular TV show Swamini as Ramabai Peshwe - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-08-17 रोजी पाहिले.
- ^ Team, Tellychakkar. "EXCLUSIVE! Revati Lele aka Bansuri of Aapki Nazron Ne Samjha shares interesting trivia on how she bagged the show, reveals she is closest to Richa". Tellychakkar.com (इंग्रजी भाषेत). 2021-08-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-17 रोजी पाहिले.
- ^ "Revati loves a challenge!". Tribune India.
- ^ "REVATI LELE: I AM INSTINCTIVE IN DECIDING IF I WANT TO DO A PROJECT OR NOT, I USUALLY GO FOR CHARACTERS THAT I FIND CHALLENGING AND HAS DEPTH". Just Showbiz.