राही सरनोबत
राही जीवन सरनोबत (इंग्रजी:Rahi Sarnobat) (३० ऑक्टोबर, १९९०, कोल्हापूर) ही २५ मीटर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत भाग घेणारी एक भारतीय महिला खेळाडू आहे.[१] [२]राही महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे राहते.
राही सरनोबत अर्जुन पुरस्कार स्वीकारताना | |||||||||||||||
वैयक्तिक माहिती | |||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
पूर्ण नाव | राही जीवन सरनोबत | ||||||||||||||
राष्ट्रीयत्व | भारतीय | ||||||||||||||
निवासस्थान | भारत | ||||||||||||||
जन्मदिनांक | ३० ऑक्टोबर, १९९० | ||||||||||||||
जन्मस्थान | कोल्हापूर, महाराष्ट्र | ||||||||||||||
खेळ | |||||||||||||||
देश | भारत | ||||||||||||||
खेळ | नेमबाजी | ||||||||||||||
खेळांतर्गत प्रकार | २५ मीटर पिस्तूल | ||||||||||||||
|
सुरुवातीचे दिवस
संपादन५० मीटर रायफल प्रोन प्रकारातील विश्व विजेती नेमबाज तेजस्विनी सावंतकडून राहीने नेमबाजीची प्रेरणा घेतली. [३]
कारकीर्द
संपादन२००८ मध्ये राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत तिने पहिले सुवर्ण पदक मिळविले.आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. [४]
तिने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल नेमबाजीसाठी २०१८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत जकार्ता पालेबांग येथे सुवर्णपदक जिंकले. तसेच तिने २०१० च्या नवी दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली होती.
विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली पिस्तुल नेमबाज ठरली. चॅंगवॉन येथे झालेल्या आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये तिने २५ मीटर पिस्तूल स्पर्धा जिंकली.[५]
ग्लासगो येथे २०१४ च्या राष्ट्रकुल खेळात,तिने महिलांच्या २५ मीटर पिस्तूलमध्ये सुवर्ण जिंकले.[६] त्याच वर्षी तिने इंचीऑन येथे २०१४ मध्ये आशियाई स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक जिंकले. जिथे ती,अनीसा सय्यद आणि हीना सिद्धू या तिघी विजेत्या ठरल्या.[७] राहीने विश्वचषक २०११ मध्ये कांस्यपदक जिंकले आणि २०१२ मध्ये लंडन ऑलिंपिकसाठी तिची निवड झाली.[८]
२२ ऑगस्ट २०१८ रोजी, २५ मीटर पिस्तूल प्रकारात ३४ गुण मिळवून आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली.तिने थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याला सुवर्ण पदकाच्या शर्यतीत मागे टाकून हा विजय मिळविला.[९]
मार्च २०२१ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत राहीने २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत रजत पदक पटकावले.[१०] याच स्पर्धेत चिंकी यादव आणि मनू भाकर यांच्यासह तिने २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.[११]
जून २०२१ मध्ये क्रोएशिया येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत राहीने २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले.[१२] याबरोबरच तिने २५ मीटर पिस्तूल प्रकारात जगात पहिले रॅँकिंग मिळवले.[१३]
पुरस्कार
संपादन२०१८ साली राहीला भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार देण्यात आला.[१४]
संदर्भ व नोंदी
संपादन- ^ "Jitu Rai recommended for Arjuna Awards by NRAI - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. २२-८-२०१८ रोजी पाहिले.
|access-date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "ISSF - International Shooting Sport Federation - issf-sports.org". www.issf-sports.org. 2021-03-27 रोजी पाहिले.
- ^ "Women shooters break into the male bastion". India Today (इंग्रजी भाषेत). २२-८-२०१८ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Administrator. "Golden Girl - Rahi Sarnobat | 2008 Pune Youth Games". www.thesportscampus.com (इंग्रजी-जीबी भाषेत). २२-८-२०१८ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "Sarnobat wins gold in shooting WC". The Hindu (इंग्रजी-भारत भाषेत). 2013-04-05. ISSN 0971-751X. २२-८-२०१८ रोजी पाहिले.
|access-date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "Rahi becomes first Indian woman shooter to win Asiad gold". ESPN (इंग्रजी भाषेत). २२-८-२०१८ रोजी पाहिले.
|access-date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ info@biharprabha.com, Bihar Reporter :. "Pistol shooter Rahi Sarnobat wins gold, Anisa Sayyed silver". The Biharprabha News (इंग्रजी-यूएस भाषेत). २२-८-२०१८ रोजी पाहिले.
|access-date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: unrecognized language (link) - ^ Mishra, Rashmi (2014-09-22). "Shooters Heena Sidhu, Rahi Sarnobat and Anisa Sayyed win 4th bronze for India in Asian Games 2014". India.com (इंग्रजी भाषेत). २२-८-२०१८ रोजी पाहिले.
|access-date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Jitu Rai recommended for Arjuna Awards by NRAI - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. २२-८-२०१८ रोजी पाहिले.
|access-date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "ISSF World Cup: Chinki Yadav Wins Gold As India Sweep Medals In 25m Pistol Event | Shooting News". NDTVSports.com (इंग्रजी भाषेत). 2021-03-27 रोजी पाहिले.
- ^ Srinivasan, Kamesh (2021-03-25). "The Hindu" (इंग्रजी भाषेत). New Delhi. ISSN 0971-751X.
- ^ "राही सरनोबतची सुवर्ण पदकाला गवसणी! | पुढारी". pudhari.news. 2021-07-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-07-06 रोजी पाहिले.
- ^ Damodar, Hrishikesh (2021-07-01). "List of Indian shooters who will enter the Tokyo Olympics 2020 ranked World No.1". www.sportskeeda.com (इंग्रजी भाषेत). 2021-07-06 रोजी पाहिले.
- ^ "कोल्हापूर : [[दादू चौगुले]] - ध्यानचंद, राही, स्मृती यांना अर्जुन पुरस्कार---[[दादू चौगुले]], राही, स्मृतीच्या पुरस्काराने क्रीडानगरीत आनंदाची लाट". Lokmat. 2018-09-20. 2018-09-26 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)