राष्ट्रीय सागर संशोधन संस्था
राष्ट्रीय सागर संशोधन संस्था ही १ जानेवारी १९६६ रोजी पणजी, गोवा येथे स्थापना झालेली भारत सरकारची संस्था आहे.
उद्दिष्टे
संपादन- सागराच्या अंतरगातील जैविक संपत्तीचा शोध घेणे. त्याचा अभ्यास करणे. मच्छिमारीसाठी नवनवीन अशा योग्य जागा शोधणे. जीवशास्त्रीय माहितीचा उपयोग करून सागरी उत्पादनात कशी वाढ करता येईल हे पाहणे.
- सागरी भुगर्भातील संशोधन करून खनिज द्रव्याचा शोध घेणे. व ती सागराबाहेर काढण्याचे तंत्रज्ञान विकसित करून त्याचे उत्पादन करणे.
- सागराच्या पोटात असणारे प्राणि आणि वनस्पती यांचे संशोधन करून त्यांच्यापासून रासायनिक द्रव्य मिळविणे.
- भरती ओहोटीच्या लाटात प्रचंड उर्जा असते. तिच्यापासून विजनिर्मिती करण्याचे तंत्र विकसित करणे.
- सागरी प्रदेशाच्या होणाऱ्या धुपेची शास्त्रीय पाहणी करणे व त्यावर योग्य तो उपाय शोधुन काढणे.
- सागराचे होणारे प्रदुषण थांबविणे व त्यावर उपाययोजना शोधुन काढणे.
- सागरी संशोधनाची विविध उपकरणे तयार करणे, सागरी हवामानाचे संशोधन करणे जागतिक पातळीवर सागरी भुगर्भ संशोधन प्रकल्पांना सहकार्य करणे.
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |