राष्ट्रीय महामार्ग ३६१


राष्ट्रीय महामार्ग ३६१ हा महाराष्ट्रातील महामार्ग आहे. हा महामार्ग तुळजापूर पासून बुटीबोरी(नागपूर) पर्यंत आहे.या महामार्गाची एकूण लांबी ५४८ कि.मी. आहे.हा महाराष्ट्रातील अनुक्रमे उस्मानाबाद,लातूर,नांदेड,यवतमाळ,वर्धा आणि नागपूर या ६ जिल्ह्यांतून जातो.हा मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागातून जातो.या महामार्गावरील शहरे तुळजापूर,औसा,लातूर,चाकुर,अहमदपूर, लोहा,कारेगाव,नांदेड,उमरखेड,पुसद,यवतमाळ,वर्धा आणि बुटीबोरी हे आहेत.

भारत  राष्ट्रीय महामार्ग ३६१
लांबी ५४८ किमी
सुरुवात तुळजापूर
मुख्य शहरे औसा - लातूर - चाकुर - अहमदपूर - लोहा - कारेगाव - नांदेड - अर्धापूर - उमरखेड - पुसद -दिग्रस - यवतमाळ - वर्धा
शेवट बुटीबोरी
राज्ये महाराष्ट्र
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.