राजू केंद्रे हे महाराष्ट्रातील तरुण सामाजिक कार्यकर्ते आहेत.[] ते मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. ग्रामीण आदिवासी भागातील पहिल्या पिढीतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी ते काम करत आहेत. त्यांनी या कामासाठी 'एकलव्य' ही शैक्षणिक चळवळ सुरू केली आहे.[] फोर्ब्स इंडिया[] व हिंदुस्तान टाइम्सच्या सामाजिक श्रेत्र या विभागामध्ये भारतातील तिशीच्या आतील तीस ‘प्रभावी तरुण व्यक्तिमत्त्वांच्या’[] यादीत त्यांचा समावेश केला आहे.[]

राजू केंद्रे
जन्म १९९३
बुलढाणा
निवासस्थान

पिंप्री खंदारे, लोणार

बुलडाणा
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण

युनिव्हर्सिटी ऑफ लंडन

टाटा सामाजिक विज्ञान संस्था
पेशा सामाजिक कार्यकर्ते
पदवी हुद्दा मुख्य कार्यकारी अधिकारी, एकलव्य

बालपण आणि शिक्षण

संपादन

राजू यांचा जन्म महाराष्ट्राच्या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील[] पिंप्री खंदारे या छोट्याश्या खेड्यातील भटक्या समाजातील कुटुंबामध्ये झाला.[] राजू यांच्या आई-वडिलांनी आपलं प्राथमिक शिक्षणही पूर्ण झालेलं नाही. राजू यांचं शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं. पुढे उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात गेले पण आर्थिक आणि सामाजिक अडचणीमुळे अवघ्या काही महिन्यात राजू यांना पुणे सोडावं लागलं. पुढे त्यांनी आपण महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पूर्ण केलं. याचं काळात त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. पुढे त्यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले[][] आणि ग्रामविकास चळवळीला सुरुवात केली.

उच्च शिक्षण

संपादन

राजु यांनी SOAS, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे ब्रिटिश सरकारच्या चेवनिंग स्कॉलरशिप[] वर एमएससी डेव्हलपमेंट स्टडीज पूर्ण केले.[१०] राजू केंद्रे स्वीडिश इन्स्टिट्यूट (स्वीडन) येथील फेलो सुद्धा आहेत. ग्लोबल गव्हर्नन्स मध्ये ग्लोबल अकॅडमी, बॉन (जर्मनी) कडून लीडरशिप फेलोशिप देखील देण्यात आली आहे. याशिवाय त्यांनी सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ येथे त्यांनी दोन वर्ष सहाय्यक प्राध्यापक म्हणून पण काम केले आहे, समाजकार्य विषयात ते नेट सेट आहे.

सामाजिक काम

संपादन

मेळघाट

संपादन

मुक्त विद्यापीठात शिकत असताना राजू यांना मेळघाट या आदिवासी भागात जाण्याची संधी मिळाली. मेळघाट मित्रच्या गटासोबत दोन वर्ष पूर्णवेळ काम राजू यांनी केले.[११] आदिवासी भागातील त्यावेळेसचे प्रश्न आणि अडचणी पाहून अस्वस्थ व्हायचे. त्यामुळेच शेवटी आजचे प्रश्न समजून घेऊन आधी त्यावर उत्तर शोधायचं राजू यांनी ठरवले.

ग्रामीण विकास फेलोशीप

संपादन

राजू यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप[१२] मध्येही काम केलेले आहे, त्या काळात त्यांनी पारधी समाजासाठी विकासकामे केली. त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली. ज्ञानाच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने आणि ग्रामीण भागात पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी पुणे, ठाणे, औरंगाबाद, यवतमाळ, अमरावती, मुंबई येथून ३० हजारांहून अधिक पुस्तके गोळा केली आणि ती ग्रामीण भागात ग्रंथालय उभी राहण्यासाठी वितरीत केली.[१३]

एकलव्य चळवळ

संपादन

ग्रामीण आदिवासी भागातील पहिल्या पिढीतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी ते काम करत आहेत. त्यांनी या कामासाठी 'एकलव्य इंडिया' ही शैक्षणिक चळवळ सुरू केली आहे.[] एकलव्यच्या माध्यमातून त्यांनी आजवर ७०० हून अधिक युवकांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळवून दिली आहे.[१४] सोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात २०००० हजार विद्यार्थ्यांपर्यंत एकलव्य उच्च शिक्षणाच्या संधी घेऊन गेले आहे. नुकतंच कारगिल मध्ये पण त्यांनी काम हाती घेतलं आहे.[१५]

ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅम

संपादन

जागतिक दर्जाच्या स्कॉलरशिपमध्ये वंचित घटकातील प्रतिनिधित्व कमी असल्याचं अनुभवल्याने त्यांनी लंडन मध्ये असताना ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅम सुरू केला आहे, त्या माध्यमातून ते शंभर पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना वर्षभराची ट्रेनिंग देण्यात येते. पुढच्या एका दशकात किमान २००० जागतिक ग्लोबल स्कॉलर्स घडवण्याचं त्यांचं ध्येय आहे.[१६]

सन्मान आणि नामांकने

संपादन
  • फोर्ब्स इंडिया ३० अंडर ३० मध्ये निवड[१७][]
  • सीएनएन-न्यूझ१८ इंडियन ऑफ द इयर पुरस्कारासाठी देखील नामांकन[१८]
  • हिंदुस्तान टाइम्स यंग अचिव्हर ३० अंडर ३० यादीत समावेश
  • लिंक्डइनच्या टॉप व्हॉइसेस लिस्टमध्ये (सामाजिक प्रभाव) समावेश[१९]
  • ब्रिटिश कॉन्सिल - ७५ यंग अचिव्हर्स

याशिवाय राजू यांना TedTalk, Oxford University IIT, IIM, TISS, Enactus, YMCA लंडन, SOAS युनिव्हर्सिटी ऑफ लंडन आणि विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर बोलण्यासाठी आमंत्रित.

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Farmer's Son Helps 125 Marginalized Students Access Higher Education & Fellowships". The Better India (इंग्रजी भाषेत). 2021-07-13. 2022-12-18 रोजी पाहिले.
  2. ^ "'फोर्ब्ज'च्या प्रतिष्ठित यादीत झळकला बुलडाण्याचा 'एकलव्य'; सोशल आंत्रप्रेन्योरशिपसाठी शेतकरी कुटुंबातील राजू केंद्रेंची नोंद". अकोला: दिव्य मराठी.
  3. ^ "I Want To Establish An Interdisciplinary Institution For Grassroots Leadership: Raju Kendre—Forbes India 30 Under 30 2022". Forbes India (इंग्रजी भाषेत). 2022-12-18 रोजी पाहिले.
  4. ^ "Raju Kendre: Empowering First Generation Learners". Forbes India (इंग्रजी भाषेत). 2022-12-18 रोजी पाहिले.
  5. ^ a b c d "शेतकऱ्याच्या लेकाची उत्तुंग भरारी; बुलडाण्याचा राजू केंद्रे झळकला फोर्ब्सच्या यादीत". महाराष्ट्र टाइम्स. 2022-12-18 रोजी पाहिले.
  6. ^ "Buldhana man's initiative to help students from marginalised background earns him a spot in Forbes list". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2022-02-10. 2022-12-18 रोजी पाहिले.
  7. ^ "शेतकऱ्याच्या पोरानं केली कमाल; बुलडाण्याचा राजू केंद्रे झळकला फोर्ब्सच्या यादीत". न्यूझ१८ लोकमत. 2022-02-08. 2022-12-18 रोजी पाहिले.
  8. ^ "From Buldhana to UK: 'Eklavya' Kendre wins Chevening scholarship - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-12-18 रोजी पाहिले.
  9. ^ "प्रा. राजू केंद्रे यांना मिळाली 'चेवेनिंग' शिष्यवृत्ती; आत्मविश्‍वास जागवला". सकाळ. 2022-12-18 रोजी पाहिले.
  10. ^ "लोणारचा राजू केंद्रे लंडनला जाणार, प्रसिद्ध शिवेनिंग शिष्यवृत्तीसाठी निवड; बुलडाण्याचं नाव सातासमुद्रापार". टीव्ही९ मराठी. 2021-07-04. 2022-12-18 रोजी पाहिले.
  11. ^ "उच्च शिक्षणाच्या माध्यमातून तळागाळातील नेतृत्त्व उभं राहावं हा प्रयत्न - चेवनिंग स्कॉलर राजू केंद्रेंसोबत संवाद". ETV Bharat News. 2022-12-18 रोजी पाहिले.
  12. ^ "राजू केंद्रे यांचा खासदारांच्याहस्ते सत्कार". लोकमत. 2021-07-07. 2022-12-18 रोजी पाहिले.
  13. ^ "Book collection drive takes libraries to villages in Marathwada, Vidarbha". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-11-03. 2022-12-18 रोजी पाहिले.
  14. ^ "परदेशात शिक्षण घ्यायचंय? काळजी कसली करता, एकलव्य आहे ना...!". महाराष्ट्र टाइम्स. 2022-12-18 रोजी पाहिले.
  15. ^ "After JNU, IIT, tribal students at Yavatmal's Eklavya now dream global—Chevening to DAAD". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2022-09-04. 2022-12-18 रोजी पाहिले.
  16. ^ "Eklavya's study abroad initiative will 'create leaders with empathy': Raju Kendre". news.careers360.com (इंग्रजी भाषेत). 2022-12-18 रोजी पाहिले.
  17. ^ "Raju Kendre: Empowering First Generation Learners". Forbes India (इंग्रजी भाषेत). 2022-12-18 रोजी पाहिले.
  18. ^ "CNN-News18 Indian of the Year 2022 Awards to be Announced Across Five Categories Today". News18 (इंग्रजी भाषेत). 2022-10-12. 2022-12-18 रोजी पाहिले.
  19. ^ "LinkedIn Top Voices in Social Impact: 15 creators to follow in India". Linkedin (इंग्रजी भाषेत). 2022-12-18 रोजी पाहिले.