राजन गवस

अत्याळ
(राजन गावस या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. राजन गणपती गवस यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ या गावी २१ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. गवस हे मराठीतील नामवंत लेखक आहेत. त्यांच्या 'तणकट' या कादंबरीला २००१ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[]

राजन गवस
जन्म नाव राजन गणपती गवस
जन्म नोव्हेंबर २१, इ.स. १९५९
अत्याळ, ता. गडहिग्लज कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र प्रोफेसर
साहित्य प्रकार कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, ललितगद्य
विषय सामाजिक, राजकीय, वैचारिक, सांस्कृतिक
चळवळ देवदासी चळवळ
प्रसिद्ध साहित्यकृती चौंडकं
भंडारभोग
धिंगाणा
तणकट
ब- बळीचा
पत्नी अलका
अपत्ये संहिता, सहर्ष
पुरस्कार
  • ह.ना. आपटे पुरस्कार, महाराष्ट्र शासन - १९८५
  • 'भंडारभोग' या कादंबरीला 'वि.स.खांडेकर पुरस्कार', महाराष्ट्र शासन -१९८९
  • 'भंडारभोग' या कादंबरीला 'संस्कृती पुरस्कार' - संस्कृती प्रतिष्ठान, नवी दिल्ली. -१९९२
  • उत्कृष्ट कादंबरी लेखन पुरस्कार, महाराष्ट्र शासन -१९९४
  • विखे पाटील पुरस्कार - १९९६
  • शंकर पाटील पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे -१९९७
  • 'भंडारभोग' या कादंबरीला 'ग.ल. ठोकळ पुरस्कार', महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे -१९९९
  • भैरूरतन दमाणी पुरस्कार -१९९९
  • महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार- २०००
  • साहित्य अकादमी पुरस्कार २००१ - तणकट पुस्तकासाठी.
  • अनंत लाभसेटवार पुरस्कार, डॉ. लाभसेटवार प्रतिष्ठान, अमेरिका -२००८
  • आनंदीबाई शिर्के पुरस्कार, महाराष्ट्र शासन - २००८

राजन गवस यांचे रविवारच्या 'सकाळ'च्या 'सप्तरंग' पुरवणीतले शब्दांची कुळकथा हे साप्ताहिक सदर वाचक आवर्जून वाचत. राजन गवस यांची 'चौंडकं' ही कादंबरी खूप गाजली. ते मुक्त लेखक आहेत. 'लोकसत्ता'च्या शनिवारच्या 'चतुरंग' या पुरवणीत 'सुत्तडगुत्तड' या सदरात ते लेखन करीत असत.

शिक्षण आणि नोकरी

संपादन

राजन गवस हे एम.ए., एम.एड., पीएच.डी. आहेत. त्यांनी भाऊ पाध्ये यांचे साहित्य अभ्यासून त्यावर पीएच.डी मिळवली. ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून दोन वर्षे काम करत होते. गारगाेटी या गावी असणाऱ्या कर्मवीर हिरे कॉलेजात जवळपास २८ वर्षे मराठीचे प्राध्यापक म्हणून सेवा केल्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. १ जून २०१९ रोजी ते सेवानिवृत्त झाले.[]

राजन गवस हे मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील करंबळीचे. महाविद्यालयीन काळातच कविता,कथा लिहिणारे राजन गवस यांची 'दैनिक पुढारी' मध्ये १९७८ साली पहिली कथा प्रकाशित झाली. पुढे १९८२ मध्ये 'उचकी' ही कथा सत्यकथेतून प्रकाशित झाली. त्याच वेळी 'हुंदका' हा कविता संग्रह प्रकाशित झाला. मात्र पुढचा प्रवास हा मुख्यतः कादंबरी लेखनाचा झाला. 'चौंडकं', 'भंडारभोग', ' कळप' या कादंबऱ्यांनी विषयाचे वेगळेपण जपले. उपेक्षितांच्या जीवनासंबंधी असणारी तळमळ राजन गवस यांच्या लेखनातून उत्कटपणे व्यक्त होते.[ संदर्भ हवा ]

प्रकाशित साहित्य

संपादन

अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, जातीयता, देवदासी, दारिद्ऱ्य ह्या सामाजिक प्रश्नांकडे राजन गवस ह्यांच्या लिखाणाचा ओढा दिसतो. गवसांनी लिहिलेल्या 'चौंडकं' आणि 'भंडारभोग' या दोन कादंबऱ्या अनुक्रमे देवदासींच्या व जोगत्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या आहेत. त्यांच्या दोन कादंबऱ्यांचे आणि 'रिवणावायली मुंगी' या कथासंग्रहाचे कन्नड भाषेत अनुवाद झाले आहेत.[ संदर्भ हवा ]

कविता संग्रह

संपादन
  • हुंदका (१९८२)

कथासंग्रह

संपादन
  • रिवणावायली मुंगी (२००१)
  • आपण माणसात जमा नाही ( २००८)

कादंबऱ्या

संपादन
  • चौंडकं (१९८५)
  • भंडारभोग (१९८७)
  • धिंगाणा (१९९१)
  • तणकट (१९९९)
  • कळप (१९९२)
  • ब-बळीचा (२०१३)

ललित लेखसंग्रह

संपादन
  • काचाकवड्या (२००६)
  • कैफियत (२०१०)
  • लोकल ते ग्लोबल (२०१९)

समीक्षा ग्रंथ

संपादन
  • तृतीय पंथीयांची बोली (मानसशास्त्रीय)
  • भाऊ पाध्ये यांची कथा (समीक्षा ग्रंथ -२०१०)
  • भाऊ पाध्ये यांची कादंबरी (समीक्षा ग्रंथ -२००६)
  • भाऊ पाध्ये (समीक्षा ग्रंथ)
  • रोकडे पाझर

संपादित

संपादन
  • तिरकसपणातील सरळता (संपादित -१९८५)
  • चांगदेव चतुष्टयासंबंधी (संपादित -२०००)
  • ढव्ह आणि लख्ख ऊन : निवडक राजन गवस (ललित लेख, संपादक -रणधीर शिंदे -२०१०)
  • भाषिक सर्जन आणि उपयोजन (संदर्भ ग्रंथ, सहलेखक -अरुण शिंदे आणि गोमटेश्वर पाटील)
  • अव्यक्त मांणसांच्या कथा (उत्तम कांबळे यांच्या निवडक कथांचे संकलन. - संपादक राजन गवस)

इंग्रजी पुस्तके

संपादन
  • ‘Content Cum Methodology of Marathi’, Mehta Publishing House, Pune- First Edition (1995)(संशोधन ग्रंथ)
  • ‘Seema Bhagatil Marathi Boli’, Darya Prakashan, Pune- Fist Edition (2010)(संशोधन ग्रंथ)
  • ‘Psycho- Linguistic study of Marathi Sexual Folk Stories’(संशोधन ग्रंथ)
  • ‘Trutiya Panthiyanchi Boli’, Darya Publication – First Edition (2008) (संशोधन ग्रंथ)
  • ‘Language Creativity And Application’(संशोधन ग्रंथ)

संशोधन

संपादन
  • Colloquial Language of Labours In Construction
  • Objectives and Syllabus at Graduate and Post-Graduate Level
  • Study of the Colloquial Language In Border of Maharashtra and Karnataka
  • A Study of Linguistics of Superstition
  • Maharashtrache Vangamay Maharshi Krushnarao Arjun Keluskar Samgra Vangmay
  • Culture Practices, the Folklore and Dialects of Generic Trading Communities and Balutedars of Kolhapur

अन्य भाषांत अनुवादित ग्रंथ

संपादन

राजन गवस यांची अनेक पुस्तके अन्य भाषांत अनुवादित झाली आहेत.

  • कानडी भाषेत राजन गवस यांच्या १३ कथा अनुवादित झाल्या आहेत.
  • इंग्लिश भाषेत राजन गवस यांच्या सहा कथा अनुवादित झाल्या आहेत.
  • 'ब-बळीचा' ही कादंबरी इंग्लिश भाषेत अनुवादित झाली आहे.
  • 'भंडारभोग' ही कादंबरी इंग्लिश भाषेत अनुवादित झाली आहे.
  • चौंडकं (कानडी भाषेत)
  • तणकट (आसामी, कानडी,इंग्रजी, गुजराती, हिंदी भाषांत)
  • भंडारभोग (कानडी, हिंदी आणि इंग्रजी)
  • रिवणावायली मुंगी (कथासंग्रह, कानडी भाषा)

राजन गवस यांच्यावरील पुस्तके

संपादन
  • कादंबरीकार राजन गवस (अनिल बोपचे)
  • राजन गवस यांचे कथात्म साहित्य : एक चिकित्सक अभ्यास (प्रबंध; लेखक गोविंद सखाराम काजरेकर, मार्गदर्शक-वासुदेव सावंत)
  • 'ब-बळीच्या विषयी'-संपा. शरयू असोलकर, दर्या प्रकाशन, पुणे -२०१५
  • 'राजन गवस यांचे साहित्य : आशय आणि आकलन', सूर्यमुद्रा प्रकाशन, नांदेड -२०१७

पुरस्कार

संपादन
  • अनंत लाभसेटवार पुरस्कार, डॉ. लाभसेटवार प्रतिष्ठान, अमेरिका -२००८
  • आनंदीबाई शिर्के पुरस्कार, महाराष्ट्र शासन - २००८
  • उत्कृष्ट कादंबरी लेखन पुरस्कार, महाराष्ट्र शासन - १९९४
  • 'भंडारभोग' या कादंबरीला 'ग.ल. ठोकळ पुरस्कार', महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे - १९९९
  • 'भंडारभोग' या कादंबरीला 'वि.स.खांडेकर पुरस्कार', महाराष्ट्र शासन - १९८९
  • 'भंडारभोग' या कादंबरीला 'संस्कृती पुरस्कार' - संस्कृती प्रतिष्ठान, नवी दिल्ली. - १९९२
  • भैरूरतन दमाणी पुरस्कार -१९९९
  • महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार- २०००
  • महेश निकम उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार (सोलापूर)
  • विखे पाटील पुरस्कार - १९९६
  • शंकर पाटील पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे -१९९७
  • साहित्य अकादमी पुरस्कार २००१ - तणकट पुस्तकासाठी.
  • ह.ना. आपटे पुरस्कार, महाराष्ट्र शासन - १९८५
  • नव्वदीत्तर नाटक कार्यशाळा - साहित्य अकादमी- प्रमुख वक्ते.

स्थळ - पुस्तकवारी, श्रीरामपूर.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "राजन गवस". Maharashtra Times. 2020-01-06 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ Patil, Parashuram. "राजन गवस : लेखनापलीकडला माणूस". तरुण भारत (इंग्रजी भाषेत). 2020-01-06 रोजी पाहिले.