राइट्स लिमिटेड
रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस' (इंग्लिश: Rail India Technical and Economic Service; संक्षेप: राइट्स) ही भारतीय रेल्वेची एक सहकंपनी आहे. १९७४ साली स्थापन करण्यात आलेल्या राइट्सचे मूळ उद्दिष्ट भारतातील व भारताबाहेरील रेल्वे विकसकांना रेल्वे वाहतुकीची आखणी व त्याबाबत सल्ला देणे हे होते. सध्या राइट्स कंपनीचा विमानतळ, बंदरे, महामार्ग इत्यादींच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये सहभाग असतो.
आजवर राइट्सने ६२हून अधिक देशांमधील रेल्वे व इतर वाहतुकीच्या प्रकल्पांमध्ये साहाय्य केले आहे. २००२ साली राइट्सला मिनिरत्नाचा दर्जा देण्यात आला.