रवींद्र महाजनी (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी अभिनेता आहे. त्याने प्रामुख्याने मराठी व काही हिंदी, गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. व्ही. शांताराम-दिग्दर्शित झुंज या इ.स. १९७५ सालच्या मराठी चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले[१]. त्याने भूमिका साकारलेले लक्ष्मी (इ.स. १९७८), दुनिया करी सलाम (इ.स. १९७९), गोंधळात गोंधळ (इ.स. १९८१), मुंबईचा फौजदार (इ.स. १९८५) हे चित्रपट विशेष गाजले.

रवींद्र महाजनी
जन्म रवींद्र महाजनी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
प्रमुख चित्रपट देवता

महाजनीने चित्रपट दिग्दर्शक व निर्माता म्हणूनही काम केले आहे. त्याने इ.स. १९९७ सालच्या सत्तेसाठी काहीही या चित्रपटाची दिग्दर्शन व निर्मिती केली[१].

संदर्भसंपादन करा

  1. ^ a b धनेश पाटील. "रवींद्र महाजनींचा कमबॅक". १८ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवेसंपादन करा