रथसप्तमी
रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो.[१][२] या सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हणले जाते.[३][४] आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी,माघी सप्तमी अशीही या दिवसाला अन्य नावे आहेत.[५]
स्वरूप
संपादनहिंदू धर्मीयांच्या मते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे.[६]भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो[७] अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते.[३] या दिवशी भक्त सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करतो.. लाल फुले, चंदन, कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य देतो. अशा पूजने समृद्धी प्राप्त होते असा संकेत रूढ आहे.[३] सात घोडे (उच्चैःश्रवा) आणि सारथी अरुण (गरूडाचा मोठा भाऊ) यांसह सूर्याची पूजा करताना सूर्याची सोन्याची प्रतिमा रथात ठेवतात.[८]तुळशी वृंदावनाच्या समोर रथ आणि सूर्य यांची रांगोळी काढतात. या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या बोळक्यात दूध ठेवून ते उकळवून आटवतात व सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखवतात. [९]या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्व असल्याने या दिवशी उपवासही केला जातो.[१०] [११] महाराष्ट्रात मकरसंक्रातीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदीकुंकवाचे दैनंदिन समारंभ रथसप्तमीच्या दिवशी संपतात. रथसप्तमी ही वसंत पंचमीनंतर दोन/तीन दिवसांनी येते.
या दिवशी दिलेले दान विशेष लाभदायी मानले जाते.[१२]
भारताच्या विविध प्रांतांत
संपादन- कोणार्क -
कोणार्क येथील सूर्य मंदिरात या दिवशी सूर्य नारायणाचा जन्मोत्सव साजरा होतो. मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर आणि प्रशासन यांच्यातर्फे व्यवस्था उपलब्ध करून दिल्या जातात.[१३]
- दक्षिण भारत- वसंत ऋतूच्या आगमनाचा हा सण दक्षिण भारतातही उत्साहाने साजरा केला जातो. संस्कृतीच्या दृष्टीनेही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.[१४] या दिवशी सूर्यपूजन केले जाते.[१५][१६]
मलियप्पा मंदिरात रथयात्रा आयोजित केली जाते. विविध वाहने तयार केली जातात आणि त्यातून देवांची मिरवणूक या दिवशी काढली जाते. या पुण्य पर्वासाठी तीर्थक्षेत्री भाविक गोळा होतात.[१७]
दक्षिण भारतात समुद्राच्या किनारी असलेल्या गावांमध्ये या दिवशी "ब्रह्मोत्सव " साजरा होतो. रथयात्रा काढली जाते.[१८]
तिरुपती येथील बालाजी मंदिरात हा दिवस विशेष उत्साहाने साजरा केला जातो.[१९] या दिवशी तिरुपती येथे सूर्य जयंती उत्सव साजरा करण्याची पद्धती अनेक शतके सुरू आहे असे मानले जाते.[२०] बिहार, झारखंड, ओरिसा अशा भारतातील विविध प्रांतांत हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो.[२१]
वैदिक देवता
संपादनसूर्याची उपासना ही वैदिक साहित्यात दिसून येते.[२२] गायत्री मंत्र म्हणजेच सविता ( सूर्य) या देवतेचा गायत्री छंदातील मंत्र आहे. सूर्य उपासनेचे प्राचीन संदर्भ आपल्याला अशाप्रकारे वैदिक साहित्यात दिसून येतात.[२३]
अन्य महत्त्व
संपादनयाच दिवशी नर्मदा जयंती असते.[२४]यानिमित्ताने अमरकंटक येथे मोठी यात्रा भरते.[२५]
हे ही पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ CHARRAN, SWAMI RAM. SURYA NARAYAN PUJA HANDBOOK (इंग्रजी भाषेत). Lulu.com. ISBN 9781257834938.
- ^ Upādhyāya, Kāśīnātha (1968). Dharmasindhuḥ (हिंदी भाषेत). Caukhambā Saṃskṛta Series Office.
- ^ a b c "Significance and story of Rathasaptami". १७. १०. २०१९ रोजी पाहिले.
|पहिले नाव=
missing|पहिले नाव=
(सहाय्य);|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ मिश्र, यतीन्द्र मोहन प्रताप (2016). Shaharnama faizabad (हिंदी भाषेत). Vani Prakashan. ISBN 978-93-5229-583-8.
- ^ "Rath Saptami 2020: रथ सप्तमी पूजा विधि, शुभ मुहूर्त और पौराणिक कथा". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2021-02-12 रोजी पाहिले.
- ^ Marāṭhī viśvakośa. Mahārāshṭra Rājya Sāhitya Sāskr̥ti Maṇḍaḷa. 1973.
- ^ Dubhashi, Vamana Mangesa (1979). Aryancya sananca pracina va arvacina itihasa. Prajnapathasalamandala.
- ^ Harshananda (Swami.) (2000). Facets of Hinduism (इंग्रजी भाषेत). Ramakrishna Math.
- ^ Bhāratīya sãskrṭikośa: Sampādaka Mahādevaśāstrī Jośī. Sahasampādaka Padmajā Hodạ̄rakara,[Prathamāvrṭti]. Bhāratīya S̃āskr̥tikośa Maṇḍaḷa. 1962.
- ^ Śarmā, Hanūmāna (1969). Vrata-paricaya (हिंदी भाषेत). Gitapresa.
- ^ Pāṇḍeya, Lālatā Prasāda (1971). Sun-Worship in Ancient India (इंग्रजी भाषेत). Motilal Banarasidass.
- ^ Vinay, Dr. Sakandha Purana (हिंदी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 978-81-288-0725-1.
- ^ Reporter, Staff (2021-02-17). "Sun God temple in Srikakulam gears up for Ratha Saptami festival" (इंग्रजी भाषेत). Srikakulam. ISSN 0971-751X.
- ^ Journal of Indian History (इंग्रजी भाषेत). University of Kerala. 1962.
- ^ Guides, Rough (2017-10-05). The Rough Guide to South India and Kerala (इंग्रजी भाषेत). Rough Guides UK. ISBN 9780241332894.
- ^ Circle, Archaeological Survey of India Eastern (1904). Annual Report (इंग्रजी भाषेत).
- ^ "Processions to mark Ratha Saptami festival" (इंग्रजी भाषेत). Special Correspondent. Tirumala. 2021-01-19. ISSN 0971-751X.CS1 maint: others (link)
- ^ Ph.D, Lavanya Vemsani (2016-06-13). Krishna in History, Thought, and Culture: An Encyclopedia of the Hindu Lord of Many Names: An Encyclopedia of the Hindu Lord of Many Names (इंग्रजी भाषेत). ABC-CLIO. ISBN 9781610692113.
- ^ Ph.D, Lavanya Vemsani (2016-06-13). Krishna in History, Thought, and Culture: An Encyclopedia of the Hindu Lord of Many Names: An Encyclopedia of the Hindu Lord of Many Names (इंग्रजी भाषेत). ABC-CLIO. ISBN 9781610692113.
- ^ "Ratha Saptami 2021: Lord Venkateswara Shrine in Tirumala Swamped With Devotees on 'Surya Jayanti'". News18 (इंग्रजी भाषेत). 2021-02-20. 2022-02-01 रोजी पाहिले.
- ^ "ratha saptami in india - Google Search". www.google.co.in. 2019-01-19 रोजी पाहिले.
- ^ Miśra, Vīrendra Kumāra (1990). Krishnayajurved (हिंदी भाषेत). Pratibhā Prakāśana. ISBN 978-81-85268-08-8.
- ^ Vedālaṅkāra, Bhagavad Datta (1981). Savita devata : samagra ka prerana srota : Presentation of the thesis that the Hindu Vedic deity Savitr is distinet from Surya, Hindu deity (हिंदी भाषेत). Sri Sarasvati Sadana.
- ^ Bhāratīya saṃskr̥ti ke sandarbha kosha (हिंदी भाषेत). Āloka Prakāśana. 2000.
- ^ Gajrani, S. (2004). History, Religion and Culture of India (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 9788182050648.