रणजी ट्रॉफी, २०१९-२० भारतामधील रणजी करंडकातील ८६वी स्पर्धा असणार आहे. डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० दरम्यान ही स्पर्धा खेळविण्यात येईल.[१][२] विदर्भ मागील स्पर्धेतील विजेता आहे.[३][४]
रणजी ट्रॉफी, २०१९-२० |
---|
व्यवस्थापक |
बीसीसीआय |
---|
क्रिकेट प्रकार |
प्रथम श्रेणी |
---|
स्पर्धा प्रकार |
साखळी फेरी व बाद फेरी |
---|
यजमान |
भारत |
---|
सहभाग |
३७ |
---|
सामने |
१६० |
---|
|
या स्पर्धेत प्रथमच डिआरएस प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे.
सर्व संघ ४ गटात बिभागले आहेत:
- गट अ - ९ संघ (अव्वल २ बाद फेरीसाठी पात्र)
- गट ब - ९ संघ (अव्वल ३ बाद फेरीसाठी पात्र)
- गट क - १० संघ (अव्वल २ बाद फेरीसाठी पात्र)
- प्लेट गट - ९ संघ (अव्वल संघ बाद फेरीसाठी पात्र)