युसफ रझा गिलानी
युसफ रझा गिलानी (देवनागरी लेखनभेद: युसूफ रझा गिलानी; उर्दू: مخدوم سیّد یوسف رضا گیلانی ; रोमन लिपी: Yousaf Raza Gillani ;) (जून ९, इ.स. १९५२ - हयात) हा पाकिस्तानातील राजकारणी असून २५ मार्च, इ.स. २००८ ते १९ जून, इ.स. २०१२ या कालखंडादरम्यान पाकिस्तानाचा १६ वा पंतप्रधान होता. पकिस्तानी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दलच्या चौकशीचे न्यायालयीन आदेश डावलल्यामुळे न्यायालय-अवमानाच्या कारणावरून पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने २६ एप्रिल, इ.स. २०१२ रोजी यास दोषी ठरवले व राष्ट्रीय विधिमंडळातील याचे सदस्यत्व अवैध ठरवले[१]. विधिमंडळाचे सदस्यत्व गेल्यामुळे याला १९ जून, इ.स. २०१२ रोजी पंतप्रधानपद सोडावे लागले. सध्या हा पाकिस्तान पीपल्स पार्टीचा उपाध्यक्ष आहे. याआधी इ.स. १९९३ ते इ.स. १९९७ या कालखंडादरम्यान हा राष्ट्रीय विधिमंडळाचा सभापती होता.
राजकीय कारकीर्द
संपादन२२ मार्च, इ.स. २००८ रोजी पाकिस्तान पीपल्स पार्टीने पंतप्रधानपदासाठी त्याचे नाव जाहीर केले. पाकिस्तान पीपल्स पार्टीसोबत राजकीय आघाडीत भागीदार असलेल्या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ गट), अवामी नॅशनल पार्टी, जमियत उलेमा-ए-इस्लाम व मुत्ताहीदा कौमी मूव्हमेंट इत्यादी पक्षांनी या नामांकनास पाठिंबा दिला. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याकडून गिलानी याने पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
संदर्भ व नोंदी
संपादन- ^ "युसूफ रझा गिलानी पंतप्रधान म्हणून अपात्र[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". २६ जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)
बाह्य दुवे
संपादन- डॉन वृत्तपत्राच्या संकेतस्थळावरील युसफ रझा गिलानी यांची प्रोफाइल (इंग्लिश मजकूर)