युगोस्लाव्हियाचे राजतंत्र
युगोस्लाव्हियाचे राजतंत्र हा १९१८ ते १९४३ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व युगोस्लाव्हियन देश आहे. हे राजतंत्र दोन महायुद्धांच्या दरम्यानच्या काळात पश्चिम बाल्कन प्रदेशापासून मध्य युरोपापर्यंत पसरले होते.
|
||||
|
||||
ब्रीदवाक्य: Један народ, један краљ, једна држава (एक राष्ट्र, एक राजा, एक देश) |
||||
राजधानी | बेलग्रेड (१९१८-१९४१) लंडन (१९४१-४३) |
|||
अधिकृत भाषा | सर्बो-क्रोएशियन | |||
क्षेत्रफळ | २,४७,५४२ चौरस किमी | |||
लोकसंख्या | १,३९,३४,०३८ (इ.स. १९३१) | |||
–घनता | ५६.३ प्रती चौरस किमी |
दुसऱ्या महायुद्धादरम्यान १७ एप्रिल १९४१ रोजी नाझी जर्मनीने युगोस्लाव्हियावर कब्जा मिळवला व युगोस्लाव्हियाच्या राजाने युनायटेड किंग्डममध्ये स्थलांतर केले व पुढील दोन वर्षे तेथूनच राज्यकारभार चालवला. युद्ध संपल्यानंतर योसिफ ब्रोझ तितोच्या नेतृत्वाखाली युगोस्लाव्हिया राजतंत्र बरखास्त करून नवा युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक हा कम्युनिस्ट देश स्थापन करण्यात आला.
हे सुद्धा पहा
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत