युएफा यूरो २०१२ स्पर्धेसाठी मानांकन माहिती येथे देण्यात आलेली आहे. स्पर्धेचा ड्रॉ २ डिसेंबर २०११ रोजी किव, युक्रेन येथे घोषित करण्यात आले.[१]
पॉट युएफा राष्ट्रीय संघ गुणका नुसार ठरवण्यात आले.[२] प्रत्येक संघाचा गुणक खालील प्रकारे ठरवण्यात आला:
- ४०% सरासरी मानांकन गुण २०१० फिफा विश्वचषक पात्रता (युएफा) सामने व स्पर्धे दरम्यान.
- ४०% सरासरी मानांकन गुण २०१२ युएफा युरो पात्रता सामन्या दरम्यान.
- २०% सरासरी मानांकन गुण २००८ युएफा युरो पात्रता सामने व स्पर्धे दरम्यान.
युक्रेन आणि पोलंड संघाला सर्वात कमी मानांकन असून देखिल, स्पर्धेचे यजमान असल्यामुळे पॉट १ मध्ये स्थान देण्यात आले. २००८ युरो स्पर्धेच्या वेळेस देखिल यजमान स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया संघाला असेच पहिल्या पॉट मध्ये स्थान मिळाले होते. गत विजेत्या स्पेन संघाला देखिल पहिल्या पॉट मध्ये स्थान देण्यात आले.
1 यजमान देश.
2 गतविजेता.