यादों की बारात

(यादों की बारात (१९७३ हिंदी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)

यादों की बारात हा १९७३ साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात ७० च्या दशकाला सुवर्ण दशक असे संबोधण्यात येते. ह्या सुवर्ण काळामध्ये ज्या अनेक चित्रपटांनी इतिहास रचला त्यामध्ये यादों की बारात हा एक प्रमुख चित्रपट होय. निर्माता निर्देशक नासिर हुसेन यांची ही उत्तम संगीत कलाकृती संगीतकार राहुल देव बर्मन ह्याचे सुमधुर संगीताने अतिशय लोकप्रिय झाली. ह्या चित्रपटाला उत्कृष्ट संगीतमय चित्रपट असेही संबोधतात. या चित्रपटातील झीनत अमान वर चित्रित केलेले "चूरा लिया है " हे गीत (स्वर आशा भोसले आणि मोहम्मद रफी) नेहेमीकरिता स्मरणात राहिले.

यादों की बारात
दिग्दर्शन नासिर हुसेन
निर्मिती नासिर हुसेन
कथा सलीम -जावेद
पटकथा सलीम -जावेद, नासिर हुसेन
प्रमुख कलाकार धर्मेंद्र,तारिक,झीनत अमान, विजय अरोरा, अजित
संवाद नासिर हुसेन
संकलन बाबू लवांडे, गुरूदत्त शिरली
छाया मुनीर खान
गीते मजरूह सुलतानपुरी
संगीत राहुल देव बर्मन
ध्वनी कौशिक, बंसली
पार्श्वगायन लता मंगेशकर, मोहम्मद रफी,आशा भोसले ,किशोर कुमार,राहुल देव बर्मन
नृत्यदिग्दर्शन अरुणा आणि अक्षय खान
वेशभूषा श्री गोपाल
साहस दृष्ये शेट्टी
विशेष दृक्परिणाम गोर्धन भाई
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १९७३
अवधी १६५ मिनिटे


ह्या चित्रपटाची तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये पण पुनर्निर्मिती करण्यात आली, तेलुगू चित्रपटात एमजीआर आणि लता ह्यांनी भूमिका केल्या होत्या. हे चित्रपट पण तिकीट खिडकीवर अतिशय यशस्वी राहिले. ह्या चित्रपटाला दोन फिल्मफेयर नामांकन प्राप्त झाले होते.


पार्श्वभूमी

संपादन

कथानक

संपादन

उल्लेखनीय

संपादन

बाह्य दुवे

संपादन