मेक्सिकोचा पहिला मॅक्सिमिलियन

मॅक्सिमिलियन (६ जुलै, इ.स. १८३२:व्हियेना, ऑस्ट्रिया - १९ जून, इ.स. १८६७:सांतियागो दि केरेतारो, मेक्सिको) हा मेक्सिकोच्या दुसऱ्या साम्राज्याचा एकमेव सम्राट होता. ऑस्ट्रियाच्या सम्राट फ्रांझ जोसेफ पहिल्याचा लहान भाऊ असलेला मॅक्सिमिलियनने फ्रांसच्या नेपोलियन तिसऱ्याच्या सांगण्यावरून मेक्सिकोवर शासन करण्याचे कबूल केले. १० एप्रिल, इ.स. १८६४ रोजी मॅक्सिमिलियनने स्वतःला मेक्सिकोचा सम्राट घोषित केले. हा तीन वर्षे फ्रेंच सैन्याच्या मदतीने सत्तेवर होता. या काळात मेक्सिकोच्या नामधारी राष्ट्राध्यक्ष बेनितो हुआरेझ व इतर सेनापतींनी त्याच्या सत्तेस आव्हान चालू ठेवले होते. १९६६मध्ये फ्रांसने मेक्सिकोतून माघार घेतल्यावर हुआरेझच्या सैन्याने मॅक्सिमिलियनला पकडले व त्याला दोन सरदारांसह मृत्युदंड दिला गेला.