मॅगी स्मिथ
डेम मार्गारेट नॅटली स्मिथ[१] [२] (२८ डिसेंबर १९३४ - २७ सप्टेंबर २०२४) एक इंग्रजी अभिनेत्री होती जी मॅगी स्मिथ म्हणून ओळखली जाते. विनोदी भूमिकांमध्ये तिच्या थट्टेखोर अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या, तिने सात दशकांहून अधिक काळ रंगमंचावर आणि पडद्यावर विस्तृत कारकीर्द केली. ती ब्रिटनमधील सर्वात ओळखण्यायोग्य आणि विपुल अभिनेत्रींपैकी एक होती.[३] तिला दोन ऑस्कर पुरस्कार, पाच बाफ्टा पुरस्कार, चार एमी पुरस्कार, तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार, आणि एक टोनी पुरस्कार यासह अनेक इतर पुरस्कार मिळाले होते. ती अभिनयाचा तिहेरी मुकुट मिळणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक आहे.
British actress (1934–2024) | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
जन्म तारीख | डिसेंबर २८, इ.स. १९३४ Ilford Margaret Natalie Smith |
---|---|
मृत्यू तारीख | सप्टेंबर २७, इ.स. २०२४ (८९) Chelsea and Westminster Hospital (लंडन) |
मृत्युची पद्धत |
|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
|
कार्य कालावधी (अंत) |
|
नागरिकत्व | |
निवासस्थान |
|
शिक्षण घेतलेली संस्था |
|
व्यवसाय |
|
कार्यक्षेत्र | |
मातृभाषा |
|
उत्कृष्ट पदवी |
|
अपत्य |
|
वैवाहिक जोडीदार |
|
कर्मस्थळ | |
पुरस्कार |
|
स्मिथने १९५२ मध्ये ऑक्सफर्ड प्लेहाऊसमध्ये काम करून विद्यार्थी म्हणून तिच्या नाटकाच्या कारकीर्दीची सुरुवात केली आणि १९५६ मध्ये ब्रॉडवेवर व्यावसायिक पदार्पण केले. पुढील दशकांमध्ये, स्मिथने नॅशनल थिएटर आणि रॉयल शेक्सपियर कंपनीसाठी काम करत, जुडी डेंचसोबत सर्वात लक्षणीय ब्रिटिश थिएटर कलाकार म्हणून स्वतःची स्थापना केली. ब्रॉडवेवर, तिला नोएल कॉवर्डच्या प्रायव्हेट लाइव्ह्स (१९७५) आणि डेव्हिड हेअरच्या नाईट अँड डे (१९७९) साठी टोनी पुरस्कार नामांकन मिळाले आणि लेटीस अँड लोव्हेज (१९९०) च्या नाटकामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार जिंकला.
स्मिथने १९५८ मध्ये नोव्हेअर टू गो या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.[३] १९६९ मध्ये द प्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडीच्या शीर्षक भूमिकेतील तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला आणि तिने कॅलिफोर्निया सूट (१९७८) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देखील जिंकला.[४][५] ऑथेलो (१९६५), ट्रॅव्हल्स विथ माय आंट (१९७२), ए रूम विथ अ व्यू (१९८५), आणि गॉस्फोर्ड पार्क (२००१) मधील तिच्या भूमिकांसाठी तिची इतर ऑस्कर नामांकनं होती.[६] इतर उल्लेखनीय चित्रपटांमध्ये डेथ ऑन द नाईल (१९७८), हुक (१९९१), सिस्टर ऍक्ट (१९९२), [७] द सीक्रेट गार्डन (१९९३), हॅरी पॉटर शृंखला (२००१-२०११), द बेस्ट एक्सोटिक मॅरीगोल्ड हॉटेल (२०१२) आणि द लेडी इन द व्हॅन (२०१५) यांचा समावेश होतो.
स्मिथ तिच्या संपूर्ण कारकिर्दीत टेलिव्हिजनवर तुरळकपणे दिसली आणि ब्रिटिश एतिहासीक काळातील डाउन्टन ॲबी (२०१०-२०१५) मधील तिच्या व्हायोलेट क्रॉलीच्या भूमिकेसाठी तिने प्रेक्षकांचे खास लक्ष आणि आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली. या भूमिकेमुळे तिला तीन प्राइमटाइम एमी पुरस्कार मिळाले. यापूर्वी माय हाऊस इन उम्ब्रिया (२००३) या एचबीओच्या चित्रपटासाठी पण तिने हा पुरस्कार जिंकला होता.[८][९]
तिच्या कारकिर्दीत, स्मिथला १९९३ मध्ये ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट फेलोशिप, १९९६ मध्ये बाफ्टा फेलोशिप आणि २०१० मध्ये सोसायटी ऑफ लंडन थिएटर स्पेशल अवॉर्ड यासह असंख्य मानद पुरस्कारांनी मान्यता मिळाली.[१०][११][६] स्मिथला १९९० मध्ये राणी दुसरी एलिझाबेथने तिच्या कलेतील योगदानासाठी डेम पद दिले,[१२] आणि नाटकातील सेवांसाठी २०१४ मध्ये ऑर्डर ऑफ द कंपेनियन्स ऑफ ऑनरचे सदस्यपद दिले.
वैयक्तिक जीवन
संपादनमार्गारेट स्मिथ यांचा जन्म २८ डिसेंबर १९३४ रोजी इलफोर्ड, एसेक्स येथे झाला.[१३][१४][१५][१६] तिची आई, मार्गारेट हटन (१८९६-१९७७), ग्लासगो येथील स्कॉटिश सचिव होत्या आणि तिचे वडील, नॅथॅनियल स्मिथ (१९०२-१९९१), न्यूकॅसल अपॉन टाईन येथील सार्वजनिक-आरोग्य पॅथॉलॉजिस्ट होते, ज्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात काम केले.[१४][१७][१८] तिला मोठे जुळे भाऊ होते; ॲलिस्टर (मृत्यू १९८१) आणि इयान. इयान ने आर्किटेक्चर शाळेत प्रवेश घेतला. स्मिथचे शिक्षण वयाच्या सोळा वर्षां पर्यंत ऑक्सफर्ड हायस्कूलमध्ये झाले, व नंतर ती ऑक्सफर्ड प्लेहाऊसमध्ये अभिनय शिकण्यासाठी गेली.[१९]
स्मिथने २९ जून १९६७ रोजी अभिनेता रॉबर्ट स्टीफन्सशी लग्न केले. त्यांना दोन मुलगे, अभिनेता ख्रिस लार्किन (जन्म. १९६७) आणि टोबी स्टीफन्स (जन्म. १९६९) होते.[२०] ६ एप्रिल १९७५ रोजी त्यांनी घटस्फोट घेतला.[२१] स्मिथने २३ जून १९७५ रोजी गिल्डफोर्ड रजिस्टर ऑफिसमध्ये नाटककार ॲलन बेव्हरली क्रॉसशी लग्न केले,[२१] आणि २० मार्च १९९८ रोजी त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांचे लग्न राहिले.[२२] स्मिथला पाच नातवंडे आहेत.[२३][२४][२५]
२००७ मध्ये, द संडे टेलिग्राफने खुलासा केला की स्मिथला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. २००९ मध्ये, ती पूर्ण बरी झाल्याची नोंद झाली.[२६] २७ सप्टेंबर २०२४ रोजी, वयाच्या ८९ वर्षी, तिचा लंडनच्या चेल्सी आणि वेस्टमिन्स्टर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.[२७]
संदर्भ
संपादन- ^ "Maggie Smith | British actress". Encyclopædia Britannica. 15 July 2023.
Maggie Smith, in full Dame Margaret Natalie Smith
- ^ "Maggie Smith". Biography.com. 29 June 2020.
Maggie Smith was born Margaret Natalie Smith in Ilford, Essex, England
- ^ a b "Maggie Smith | Biography, Movies, & Facts | Britannica". www.britannica.com (इंग्रजी भाषेत). 2023-09-07. 2023-10-04 रोजी पाहिले.
- ^ "Academy Awards Best Actress". Filmsite.org. 7 August 2013 रोजी पाहिले.
- ^ "ACADEMY AWARDS ACCEPTANCE SPEECH: Maggie Smith". Oscars.org. May 8, 2023 रोजी पाहिले.
- ^ a b "Maggie Smith BAFTA Awards". British Academy of Film and Television Arts. 10 July 2019 रोजी पाहिले.
- ^ "Sister Act: Where are they now?". EW.com (इंग्रजी भाषेत). 2024-01-21 रोजी पाहिले.
- ^ "What do Al Pacino and Maggie Smith have in common?". 9 July 2010. 27 September 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 August 2013 रोजी पाहिले.
- ^ Croggon, Alison (10 June 2009). "Jewel in the triple crown". News.com.au. 14 August 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 January 2014 रोजी पाहिले.
- ^ "BAFTA Awards Search | BAFTA Awards". awards.bafta.org. 2023-10-04 रोजी पाहिले.
- ^ "Dame Maggie Smith's BAFTA Special Award Acceptance Speech in 1993". Youtube. May 8, 2023 रोजी पाहिले.
- ^ Spears, W. (30 December 1989). "Queen Honors Naipaul, Maggie Smith". The Philadelphia Inquirer. 4 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 January 2014 रोजी पाहिले.
- ^ "Orders and decorations conferred by the crown". Debrett's. 29 January 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 January 2015 रोजी पाहिले.
- ^ a b Mackenzie, Suzie (20 November 2004). "You have to laugh". The Guardian. UK. 10 December 2007 रोजी पाहिले.
- ^ "Person Details for Margaret N. Smith, "England and Wales Birth Registration Index, 1837–2008"". FamilySearch.org.
- ^ Enfield, Laura (18 November 2015). "Ilford born Maggie Smith talks about starring in The Lady in the Van". The Tottenham Independent. 16 June 2016 रोजी पाहिले.
- ^ "Maggie Smith profile". Yahoo! Movies. 21 April 2014 रोजी पाहिले.
- ^ "Maggie Smith biography". tiscali.co.uk. 5 November 2001 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 April 2014 रोजी पाहिले.
- ^ "Maggie Smith biography and filmography". Tribute.ca. 10 July 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 August 2013 रोजी पाहिले.
- ^ Pryer, Emma (13 February 2016). "Downton Abbey's Maggie Smith and how she became the dame who shuns fame". The Mirror. 30 June 2022 रोजी पाहिले.
- ^ a b Coveney, Michael (September 1992). Maggie Smith: A Bright Particular Star. Victor Gollancz Ltd. ISBN 978-0-575-05188-1.
- ^ Vincent, Alice (19 February 2013). "Dame Maggie Smith has no plans to retire from Downton Abbey". The Daily Telegraph. 10 January 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 August 2013 रोजी पाहिले.
- ^ Howard, Pat. "60 Minutes: Dame Maggie Smith Retirement & Downton Abbey Season 4". Recapo. 14 September 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 August 2014 रोजी पाहिले.
- ^ Coveney, Michael (3 February 2007). "I'm Very Scared of Being Back on Stage". thisislondon.co.uk. 19 January 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ Lawson, Mark (31 May 2007). "Prodigal Son". The Guardian. London. 8 November 2011 रोजी पाहिले.
- ^ "Maggie Smith discusses cancer treatment struggle". The Daily Telegraph. 5 October 2009. 10 January 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 April 2014 रोजी पाहिले.
- ^ "Actress Dame Maggie Smith dies at 89". BBC News. 27 September 2024. 27 September 2024 रोजी पाहिले.