मुहम्मदू बुहारी
नायजेरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष
मुहम्मदू बुहारी ( १७ डिसेंबर १९४२) हा आफ्रिकेतील नायजेरिया देशाचा नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आहे. मार्च २०१५ मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये बुहारीने विद्यमान अध्यक्ष गुडलक जॉनाथनचा २५ लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव केला. बुहारी २९ मे २०१५ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेईल.
मुहम्मदू बुहारी | |
नायजेरियाचा राष्ट्राध्यक्ष
| |
विद्यमान | |
पदग्रहण २९ मे २०१५ | |
मागील | गुडलक जॉनाथन |
---|---|
नायजेरियाचा राष्ट्रप्रमुख
| |
कार्यकाळ ३१ डिसेंबर १९८३ – २७ ऑगस्ट १९८५ | |
जन्म | १७ डिसेंबर, १९४२ दौरा, ब्रिटिश नायजेरिया |
धर्म | इस्लाम |
नायजेरियाचा लष्करी अधिकारी असलेल्या बुहारीने डिसेंबर १९८३ मध्ये एका लष्करी बंडाद्वारे नायजेरियाची सत्ता बळकावली होती. ऑगस्ट १९८५ मध्ये बुहारीला सत्तेवरून हटवून १९८८ पर्यंत बेनिन सिटीमध्ये तुरुंगात डांबण्यात आले. २०३ सालापासून अध्यक्षीय निवडणुका लढवणारा बुहारी अखेर २०१५ साली अध्यक्षपदी निवडून आला.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- वैयक्तिक संकेतस्थळ Archived 2015-04-02 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत