मुळशी
मुळशी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याचे मुख्यालय आहे.
?मुळशी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
तालुक्यातील गावे
संपादनआडगाव (मुळशी) आडमाळ अकोले (मुळशी) आमराळेवाडी अंबरवेत आंबावणे (मुळशी) आंबेगाव (मुळशी) आंदेशे आंदगाव अंधाळे आसडे (मुळशी) बारपे बुद्रुक बावधन बुद्रुक बेलवडे बेंभटमाळ भडास बुद्रुक भालगुडी भांबर्डे (मुळशी) भारे भारेकरवाडी भेगाडेवाडी भोडे भोईणी भोईरवाडी (मुळशी) भुगाव भुकुम बोतारवाडी चाळे (मुळशी) चांदे (मुळशी) चांदिवली (मुळशी) चिखलगाव (मुळशी) चिखली बुद्रुक चिंचवड (मुळशी) डाखणे (मुळशी) दारावळी दासवे दत्तावाडी दत्तवाडी (मुळशी) डावजे देवघर (मुळशी) धाडावळी धामणओहोळ डिसाळी डोंगरगाव (मुळशी) एकोळे गडाळे गावडेवाडी (मुळशी) घेराविटणगड घोटावडे (मुळशी) घुटके गोडांबेवाडी हडशी हिंजवडी (मुळशी) होताळे हुळावळेवाडी जांबे जामगाव (मुळशी) जातेडे जावळ (मुळशी) कलमशेत करमोळी कासरआंबोली कासरसई काशिग कातरखडक काटावाडी केमसेवाडी खांबोळी खारवडे खेचरे खुबावळी कोळवडे (मुळशी) कोळवली (मुळशी) कोळोशी (मुळशी) कोळवण (मुळशी) कोंढावळे (मुळशी) कोंढुर कुळे कुंभोरी लवाळे (मुळशी) लव्हार्डे मादेड महाळुंगे (मुळशी) माजगाव (मुळशी) माळे (मुळशी) मालेगाव (मुळशी) माण (मुळशी) मारणेवाडी मरूंजी मातेरेवाडी मोरेवाडी (मुळशी) मोसेखुर्द मुगाव (मुळशी) मुगावडे मुकाईवाडी मुळखेड मुळशीखुर्द मुठे नांदे नांदगाव (मुळशी) नांदिवली (मुळशी)नाणेगाव (मुळशी) नेरे (मुळशी) निवे (मुळशी) पडाळघर पडाळघरवाडी पळसे पठारशेत पौड पेठशहापूर पिंपलोळी (मुळशी) पिंपरी (मुळशी) पिरंगुट पोमगाव रावडे रिहे साईवखुर्द साखरी (मुळशी) साळतर सांभवे सातेसई सावरगाव (मुळशी) शरे शेडणी शिळेश्वर शिंदेवाडी (मुळशी) शिरवली (मुळशी) सूस तैलबैला ताम्हिणी बुद्रुक टाटातलाव ताव टेमघर (मुळशी) उगावळी उरावडे वडगाव (मुळशी) वाळणे (मुळशी) वांद्रे (मुळशी) वेडे वेगरे विसाखर विठ्ठलवाडी (मुळशी) वडवली (मुळशी) वाजळे वाळेण वारक (मुळशी) वातुंडे
भौगोलिक माहिती
संपादनभौगोलिक स्थान
संपादनमुळशी तालुक्याचे भौगोलिक स्थान १८ अंश २५’ उत्तर ते १८ अंश ४१’ उत्तर अक्षांश आणि ७३ अंश २०' पूर्व ते ७३ अंश ३५' पूर्व रेखांश असे आहे. हा तालुका पुणे जिल्ह्यात, त्याच्या पश्चिमेला येतो. मुळशी तालुक्याची हद्द पूर्वेला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याशी, दक्षिणेला वेल्हा तालुक्याशी, उत्तरेला मावळ तालुक्याशी आणि पश्चिमेला रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्याशी भिडलेली आहे.
भौगोलिक वैशिष्ट्ये
संपादनह्या तालुक्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे तालुक्याच्या पश्चिमेला असलेला सह्याद्री पर्वताचा डोंगराळ भाग. सह्याद्री पर्वताचे पश्चिमेकडे कोंकणात उतरणारे कडे खास आहेत. त्यामानाने पूर्वेकडे मात्र इतक्या तीव्र चढणीचे कडे आढळत नाहीत. मुळशी तालुक्यातील सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून दोन उपरांगा पूर्वेकडे पसरल्या आहेत. ह्या उपरांगांमुळे मुळा आणि निळा ह्या दोन नद्यांची खोरी निर्माण झाली आहेत. सन 1948 पुर्वी वर्तमान मुळशी तालुका हा मुळशी पेटा या नावाने ओळखला जाई.मुळशी पेट्यामधे एकूण 80 गावांचा समावेश होता की ज्यातील काही गावे मुळशी धरणाच्या पाण्यात जलमय होऊन नष्ट झाली.मुळशी पेटा सध्याचे मुठा खोरे,कोळवण खोरे,रिहे -आंधळे खोरे या खोऱ्यातील गावे पुर्वी भोर संस्थानाच्या ताब्यात होती.सुस ते लवळे ही गावे पुर्वीचा हवेली तालुका).1855 पुर्वी मुळशी पेटा हा मावळ तालुक्यामध्ये समाविष्ट होता.1855नंतर तो मावळ तालुक्यामधुन वेगळा करून हवेली तालुक्यामध्ये समाविष्ट करण्यात आला.मुळशी पेटा भागातील गावांची एकूण लोकसंख्या 1921च्या जनगणनेच्या नुसार 25500 होती.मुळशी पेटा ब्रिटिश सरकारचा 100% महसूल भरत असे.1927साली टाटा कंपनीचे मुळशी धरण बांधण्यात आले आणि त्यांनी पेट्यातील शेतकरी देशोधडीला लागला.कारण धरणाच्या जलाशयात त्यांची हजारो एकर नदीकाठाची सुपीक जमीन, गावे-गावठाणे, देवळे श्रद्धास्थाने विनामोबदला गमावली ती कायमची.याच धरणाला विरोध म्हणून शेतकऱ्यांनी एक लढा दिला जो इतिहासात मुळशी सत्याग्रह म्हणुन ओळखला जातो.मुळशीपेटा हा तांदूळ उत्पादनात अग्रेसर होता येथील आंबेमोहोर या जातीच्या वाणास पुण्याच्या बाजारपेठेत प्रचंड प्रमाणात मागणी होत होती. कोरीगड (समुद्र सपाटीपासूनची उंची ३२५० फ़ूट) हे तालुक्यातील सर्वात उंच ठिकाण आहे.मुळशी तालुक्यामध्ये कोरीगड, घनगड, कैलासगड, तैलबैल, तिकोणा किल्ला , ताम्हिणी घाट, अंधारबन,मुळशी धरण इ. ऐतिहासिक किल्ले आणि निसर्गाने सौंदर्य स्थळे आहेत.सहारा लेक सिटी व लवासा हिल गिरिस्थाने व हिंजवडी आयटी पार्क देखील मुळशी तालुक्यात येतात.बार्पे बुद्रुक ते मुळशी खुर्द हा धरण परिसर तर मुळशी तालुक्यास लाभलेली निसर्गाची एक देणगीच आहे.
पर्ज्यन्यमान
संपादनमुळशी तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४५०० मिलिमीटर आहे.
मृदा
संपादनपर्यावरण
संपादनसामाजिक माहिती
संपादनऐतिहासिक माहिती
संपादनमुळशी तालुक्यातील किल्ले पुढीलप्रमाणे आहेत.
१ कैलासगड. २ घनगड. ३ तैलबैला. ४ कोराईगड.
शिवकालीन सरदार घराणी आणी त्यांचे ऐतिहासिक वाडे पुढीलप्रमाणे आहेत.
राजे मारणे देशमुख (गंभीरराव) सरदार (आंदगाव)
सरदार पोतनीस (उरवडे)
गोळे सरदार (पिरंगुट)
राजे ढमाले देशमुख (राऊतराव) सरदार (बेलावडे)
बलकवडे सरदार (दारवली)
सरदार घारे (शिक्केकरी)(जवळ-रिहे खोरे)
रायगडावरील परमपवित्र भगवा ध्वज सरदार पोतनीस घराणे आजही मुळशी तालुक्यात उरवडे या गावी अभिमानाने फडकत आहे. राजधानी रायगडावर हल्ला झाला असता मावळ्यांनी भगवं निशाण पळवलं अंन उरवडे गावी आणून अभिमानाने रोवलं.