संग्राम थोपटे
संग्राम अनंतराव थोपटे महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य आहेत. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघातून सलग ३ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. याच विधानसभा मतदारसंघातून ६ वेळा आमदार राहिलेले माजी शिक्षणमंत्री अनंतराव थोपटे यांचे ते पुत्र आहेत.
संग्राम अनंतराव थोपटे | |
विद्यमान | |
पदग्रहण २००९ | |
मागील | अनंतराव थोपटे |
---|---|
पुढील | शंकर मांडेकर |
मतदारसंघ | भोर विधानसभा मतदारसंघ |
जन्म | ७ नोव्हेंबर, १९७७ भोर, पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
वडील | अनंतराव थोपटे |
अपत्ये | पृथ्वीराज थोपटे |
निवास | भोर |
शिक्षण | बी.ए.(राज्यशास्त्र) |
गुरुकुल | आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे |
व्यवसाय | शेती, राजकारण |
धर्म | हिंदू धर्म |
राजकीय कारकीर्द
संपादनभोर विधानसभा मतदारसंघातील भोर - राजगड - मुळशी तालुक्यात 'कार्यसम्राट आमदार' म्हणून ओळख. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचा राजकीय वारसा लाभल्यामुळे संग्राम थोपटे यांनी सलग तीन वेळा आमदार होण्याचा मान मिळवला आहे. राज्यात भौगोलिकदृष्ट्या सर्वांत मोठा व अडचणीचा असलेल्या भोर मतदारसंघातील प्रत्येक गावात आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेले आमदार आहेत.
● २००२ ते २००३ उपसभापती पंचायत समिती, भोर.
● २००७ ते २०२४ संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
● २००७ ते २०२४ अध्यक्ष, राजगड सहकारी साखर कारखाना अनंतनगर निगडे, ता. भोर, जि. पुणे
● २००९ ते २०२४ भोर - राजगड - मुळशी विधानसभा मतदार संघाचे सलग तीन वेळा आमदार
संदर्भ
संपादन- ^ "'भोर म्हणजे थोपटे' आणि 'थोपटे म्हणजे भोर'; कोण आहेत संग्राम थोपटे?, वाचा सविस्तर". TV9 Marathi. 2021-09-14. 2024-09-06 रोजी पाहिले.