मूळव्याध
व्याख्या :-
गुदद्वाराच्या आतल्या व बाहेरच्या भागातील फुगलेल्या व सुजलेल्या दुखणाऱ्या रक्तवाहिन्यांना मुळव्याध असे म्हणतात.
या रोगास संस्कृतमध्ये 'अर्श' असे नाव आहे. यामध्ये दोन प्रकारचे रोग आहेत –
विनारक्तस्राव व रक्तास्रावासहित. या रोगात गुदद्वाराच्या सभोवताल आतमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात. त्याने तेथे सतत ठणकल्यागत वेदना होते. क्वचित रक्तस्राव पण होतो. काटा टोचत आहे अशी भावना होते. अधिक रक्तस्राव झाल्यास रक्त कमतरता ॲनिमिया होतो. गुदद्वाराची आकुंचन क्षमता क्रमशः नष्ट होत जाते. पुष्कळ काळ लोटल्यावर मग संग्रहणी हा रोग पण होऊ शकतो.
या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. भारतात आजघडीस (सन २०१७) साधारणतः ४ कोटी लोकांना हा आजार आहे आणि दरवर्षी या आजाराचे १० लाख रुग्ण नव्याने तयार होत असतात. काही काळापूर्वी मुळव्याध हा साधारण चाळीशीनंतर उद्भवणारा आजार होता. पण, आता १८ ते २५ या वयोगटातील स्त्री- पुरुषांनाही मुळव्याध होऊ लागली आहे. एकूण रुग्णांपैकी १० ते १२ टक्के रुग्ण हे १८ ते २५ वयोगटातील आहेत. दरवर्षी २० नोव्हेंबर हा दिवस जगभर जागतिक मुळव्याध दिन म्हणून साजरा होत असतो. हा रोग कोणालाही सहजपणे होतो म्हणून व्यायाम करा, त्यामुळे पचन सुधारते.[१]
पूर्वरूप
संपादनसूज येणे, अग्निमांद्य, अन्न न पचणे, बलहानी, पोटात गुडगुड आवाज येणे, पोटाचा रोग झाला आहे असे वाटणे, गुडघेदुखी इत्यादी. मुळव्याध हा गुदद्वाराच्या आतील तसेच बाहेरील भागाचा आजार असून यामध्ये गुदद्वाराच्या रक्तवाहिन्या फुगतात, सुजतात, त्या ठिकाणी वेदना होतात, तसेच यातून रक्तस्राव देखील होतो. [२]
मूळव्याधाची लक्षणे
संपादन- शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना, आतड्यांच्या नैसर्गिक हालचाली दरम्यान वेदना
- शौच विधीच्या वेळेस लाल रंगाचे रक्त पडणे
- गुदभागी खाज, गुदातून चिकट पदार्थ येणे – आव पडणे.
- गुदभागी कोम्ब-मोड-कुडी-गाठ येणे.
- पूर्ण पोट साफ न झाल्यासारखे वाटत राहते, गुदभागी काहीतरी आहे असे सतत जाणवत राहते.
- अॅनिमिया- मुळव्याधीमध्ये रक्त-स्राव झाल्यामुळे शरिरातील रक्ताचे प्रमाण कमी होते या अवस्थेला अॅनिमिया असे म्हणतात.
- भूक मंदावणे – शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना व रक्त-स्राव होतो या कारणामुळे रुग्ण जेवण कमी करू लाग़तो. परंतु याचा तोटा जास्ती होतो, कमी जेवणामुळे बद्धकोष्ठता वाढते तसेच मुळव्याधीचा त्रासही वाढतो.
- रुग्णाचे वजन कमी होते.
- मुळव्याधीच्या सततच्या त्रासामुळे दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण होतो.
मुळव्याधीचे प्रकार
संपादनउत्पत्ती स्थानानुसार प्रकार
संपादनउत्पत्ती स्थानानुसार म्हणजेच मुळव्याध नक्की कुठल्या ठिकाणी होते त्यानुसार तिचे २ प्रकार पडतात.
अंतर्ग़त मुळव्याध व बाह्य मुळव्याध
संपादन१)अंतर्ग़त मूळव्याध :-
गुदद्वाराच्या आत होणाऱ्या मुळव्याधीला अंतर्ग़त मुळव्याध असे म्हणतात. या प्रकारच्या मुळव्याधीमध्ये वेदना कमी प्रमाणात व रक्तस्राव जास्त प्रमाणात असतो.
२) बाह्यः मूळव्याध :- गुदद्वाराच्या बाहेरील भागात होणाऱ्या मुळव्याधीला बाह्यः मुळव्याध असे म्हणतात. या प्रकारच्या मुळव्याधाीध्ये वेदना व रक्तस्राव अत्यल्प असतो. परंतु खाज जास्त प्रमाणात असते.
मूळव्याधाचे प्रकार अवस्थेनुसार
संपादनमुळव्याधीचा आजार किती बळावलेला आहे, त्यानुसार त्याचे ४ अवस्थांमध्ये वर्गीकरण केले जाते.
प्रथम अवस्था – Grade 1
जेव्हा गुदभागी अल्पप्रमाणात वेदना, खाज व आग होते. तेव्हा त्यास प्रथम अवस्था असे म्हणतात. या अवस्थेत मुळव्याधीचा उपचार केल्यास औषधोपचाराने मुळव्याध पूर्ण बरी होऊ शकते.
द्वितीय अवस्था- Grade 2
जेव्हा प्रथम अवस्थेतील गुदभागी वेदना, खाज व आग ही लक्षणे वाढतात. तसेच बद्धकोष्ठता होते, पोट साफ होत नाही. न होणे
गुदाच्या ठिकाणी कोम्ब आल्यासारखा जानवणे, त्या ठिकाणी वेदना खाज होते.
रक्तस्राचे प्रमाण प्रथम अवस्थेपेक्षा वाढते तेव्हा त्यास व्दितीय अवस्था असे म्हणतात.
यामध्ये मूळव्याधाचे कोम्ब शौच विधीच्या वेळेस गुदद्वाराच्या बाहेर येतात व शौच विधीच्या नंतर ते बाहेर आलेले कोम्ब आपोआप आत जातात.
या अवस्थेत मूळव्याधाचा उपचार व पथ्थपालन केल्यास औषधोपचाराने मुळव्याध पूर्ण बरे होते.
तृतीय अवस्था- Grade 3 बद्धकोष्ठता, शौचाच्या वेळी त्रास, रक्तस्राव, दाह,खाज ही लक्षणे व्दितिय अवस्थेपेक्षा वाढतात. या अवस्थेमधे शौच विधीच्या वेळेस गुदद्वाराच्या बाहेरआलेले मुळव्याधाचे कोम्ब आपोआप आत जात नाहित, ते तसेच गुदद्वाराच्या बाहेर राहतो, कोम्बाला बोटांनी आत ढकल्या नंतरच कोम्ब आत जातो. या अवस्थेत मूळव्याधाचा उपचार व पथ्यपालन केले तरिही काही रुग्णांमधे औषधोपचाराने मूळव्याध बरे होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे या अवस्थेत शल्यचिकित्सा म्हणजेच ऑपरेशन करावे लागू शकते.
चतुर्थ अवस्था- Grade 4 चतुर्थ अवस्थेत तृतिय अवस्थेतिल लक्षणे वाढतात. ही गंभीर अवस्था आहे, या अवस्थेत उपचारास विलंब करु नये. यामध्ये शौच विधीच्या वेळेस गुदद्वाराच्या बाहेर आलेले मूळव्याधाचा कोम्ब आपोआप आत जात नाहित, तसेच तो बोटानी ढकलून सुद्धा आत जात नाही ते तसेच गुदद्वाराच्या बाहेर राहतात. या चतुर्थ अवस्थेत मूळव्याधाचा उपचार फक्त शल्यचिकित्सेने म्हणजेच ऑपरेशन द्वारेच होऊ शकतो.
कारणे
संपादनबद्धकोष्ठता- शौचविधीच्या वेळेस जोर करणे, कुंथण्यामुळे मुळव्याध होऊ शकते.
व्यायामाचा अभाव, आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण(गुणाने) पदार्थ खाणे, वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे, अतितिखट सेवन, सतत बैठे काम, अनियमित दिनचर्या, रक्तदोष, वेळच्यावेळी शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबींमुळे गुदद्वारावर जोर द्यावा लागतो.
मूळव्याधाची कारणे काय आहेत?
१. बद्धकोष्ठता- पोट साफ न होणे
२. शौच्याच्या वेळेस कुंथणे/ जोर करणे
३. गर्भधारणेदरम्यान – गर्भाचे वजन आतड्यावर पडते, त्यामुळे बद्धकोष्ठता होते
4. प्रसूतीनंतर – प्रसुतीदरम्यान अतिजोर केल्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते.
५. चुकिची आहार पद्धति- फास्ट फुड व कमी फायबर युक्त आहाराचे सेवन
६. बराच काळ एका जागी बसून राहणे.
७. लिवर सिरोसीस सारख्या आजारामुळे
८. अनुवंशिकता
९. अतिमांसाहार, अतितिखट आहार खाण्यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता वाढते.
१०. रक्तवाहिण्यांचे आजार
उपचार
संपादनहिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते. दही, ताक याचा वापर करणे, रोज भरपूर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्यावेळी घेणे हे आवश्यक असते. हा रोग अनेक दिवस लपविला जातो त्यामुळे तो वाढल्यावर लोकं उपचारासाठी धावतात.अॅलोपॅथीमध्ये शस्त्रक्रिया हा उपचार आहे.
- सुरणाचा कंद आणून त्याची वरची साल काढून टाकावी. आतील गुलाबी भागाच्या बटाट्यासारख्या काचऱ्या करून त्या गाईच्या तुपात परताव्यात व खाव्यात. यात मीठ टाकू नये.नंतर अधूनमधून ही भाजी खात जावी.
- रात्री एका वाटीत १ चमचा तूप गरम करून, पातळ करून त्यात साखर घालावी.त्यात अर्धा वाटी पाणी घालून ते प्यावे. सकाळी त्रास कमी होतो.
- ताजे लोणी खावे. ताजे ताक प्यावे.(आंबट नव्हे.)
- रक्तस्राव असल्यास निरंजनचे फळ आणून ते पाउण पेला पाण्यात रात्री भिजू घालावे.सकाळी ते फळ त्याच पाण्यात कुस्करून ते पाणी प्यावे.असे दोन्ही वेळेस करावे.(सकाळी व रात्री)
- इसबगोलचा भुसा आणून त्यात पाणी घालून रात्री भिजत ठेवावे व सकाळी ते गाळून प्यावे.
- कागदी लिंबू कापून ५ ग्रॅम काथ बारीक वाटून त्या अर्ध्या-अर्ध्या कापलेल्या लिंबावर लावावा व रात्र भर तसाच ठेवावा , सकाळी दोन्ही तुकडे चोखावे. रक्तस्राव बंद करण्यासाठी हे उत्तम औषध आहे, १५ दिवस दररोज हा उपाय करावा.
- झेंडूची १० पाने आणि ३ ग्रॅम काळी मिरी पाण्यात वाटून गाळून प्यायल्याने मुळव्याध मधून रक्त येणे थांबते.
- आल्याची एक गाठ वाटून एक कप पाण्यात उकळावी, एक चतुर्थाश पाणी उरल्यावर चूलीवरून उतरून थंड करावे, त्यात एक चमचा साखर घालून रोज सकाळी प्यायल्याने मूळव्याध बरे होतात.
- एक ग्लास मुळयाचा रस काढून त्यात शुद्ध तुपातली जिलेबी ( १०० ग्रॅम ) टाकून तासभर झाकून ठेवावे, नंतर जिलबी खात – खात मुळयाचा रस पिऊन टाकावा. ८-१० दिवस हा प्रयोग केल्याने मूळव्याध बरे होतात.
- महानिंब बीयांचे चूर्ण बनवून सकाळ – सायंकाळ जेवणाच्या अर्धा तास आधी साध्या पाण्याबरोबर ३ ग्रॅम चूर्ण घेतल्यास विशेष फायदा होतो .
- कायाकल्प तेलात किंवा जात्यादि तेलात सूती कपडा / कापूस तेलात भिजवून थोडी रात्री गुदा मार्गाच्या आत ठेवावा.
- नारळाच्या शेंड्या ( भुया ) जाळून राख बनवून चाळून घ्यावी . नारळाचे हे भस्म तीन – तीन ग्रॅम सकाळी , दुपारी उपाशी पोटी ताकाबरोबर आणि सायंकाळी कोमट पाण्याबरोबर घ्यावे . एकदाच घेतल्याने मूळव्याधीत अपेक्षित फायदा होतो .
- रुईचा चिक व हळद यांच्या मिश्रणाचा १ ठिबका रोज रात्री मूळव्यधावर लावावा.
शुष्कार्श आणि रक्त मूळव्याधीचे अचूक औषध :-
- देशी कापूर १००-२०० मिग्रॅ ( हरब-याच्या डाळिच्या १ दाण्या एवढा ) त्याला केळाच्या एका तुकड्यात ठेवून उपाशी पोटी गिळावे. एका घेण्यातच रक्तस्त्राव बंद होतो .
रक्तस्त्राव न थांबल्यास उपरोक्त प्रयोग तीन दिवसांपर्यंत दिवसातून तीन वेळा करू शकता. हा प्रयोग यापेक्षा जास्त वेळा करू नये . ( हा प्रयोग संपल्यानंतर केळे खाणे निषिद्ध आहे . )
- गायीच्या सहज पिता येईल अशा १ कप कोमट दूधात अर्ध्या लिंबाचा रस पिळून दूध फाटण्या पूर्वीच त्वरीत प्यावे . हा प्रयोग रक्त मूळव्याधजन्य रक्तस्त्रावाला त्वरीत बंद करतो . उपरोक्त प्रयोग एक किंवा दोन वेळेपेक्षा जास्त वेळा करू नये . आवश्यकता असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा .
वरील कुठलाही उपाय करतांना त्याबरोबर ओवा, जंगली ओवा, आणि खुरासानी ओवा तिघांना बारीक चूर्ण करून थोडयाश्या लोण्यात कालवून सकाळ – संध्याकाळ पाइल्स फोडांवर लावावे. अर्धा चमचा हस्तिदंताचे चूर्ण अग्नित जाळून त्याचा धूर पाइल्स वर घेतल्यास पाइल्स मधे आराम येतो. जर वरील उपायांनी आराम पडत नसेल तर चिकित्सकांकडून इलाज करणे आवश्यक ठरेल.
मूळव्याध रोगासाठी योगाभ्यास:- मण्डूकासन , शशकासन , गोमुखासन , वक्रासन , योगमुद्रासन , पवनमुक्तासन , पादांगुष्ठनासास्पर्शासन , उत्तानपादासन , नौकासन , कंधरासन , सर्व प्राणायाम व विशेषतः मूलबंधाचा अभ्यास करावा .
मूळव्याद आधुनिक चिकित्सा पर्यायः- मूळव्याध जर प्रथम व व्दितीय अवस्थेत असेल तर ते औषध-ग़ोळ्या-मलमा द्वारे बरे होऊ शकते. यासाठी आपले डॉक्टर खालिल प्रकारे औषधे देतात. १) वेदनाशामक गोळ्य २) Laxative ३) अॅन्टिबॉयोटिक्स ४)मूळव्याधाचा आकार कमी करण्यासाठीची गोळ्या ५) मलम वेदनाशामक+मूळव्याधाचा आकार कमी करण्यासाठीची औषधे+अन्टिबॉयोटिक्स+सुज कमी करणारे अशा सर्व घटकांना एकत्र करून तयार केलेला मलम दिला जातो. मलम शौच्याला जायच्या आधी व शौच्याला जाऊन आल्यानंतर मूळव्याधावर लावतात.
बिनटाक्याच्या व विना-चिरफाड मूळव्याध उपचार पद्धती :- या मध्ये प्रामुख्याने खालील ४ उपचार पद्धतींचा समावेश होतो
मूळव्याधाचे इंजेक्शन,- मूळव्याध प्रथम अवस्थेत (लहान कोंब) असल्यास मूळव्याधीच्या कोम्बांच्या मुळाशी फिनॉल व बदामाच्या तेलाच्या किंवा Aluminum Potassium Sulphate and Tannic acid मिश्रणाचे इंजेक्शन दिले जाते, दिड-दिड महिण्यांच्या अंतराने ३ वेळा अशा प्रकारचे इंजेक्शन देतात. या उपचारानंतर गरम पाण्याचा शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते. ह्या उपचारानंतर काही वर्षांनी मुळव्याध पुन्हा उत्पन्न होऊ शकते. ही बिनटाक्याची व विनाचिरफाड मुळव्याध उपचार पद्धती आहे
रिंग बॅंडिंग (रिंग टाकणे), :- व्दितीय अवस्थेतील मूळव्याध (थोडा मोठा कोंब) असल्यास मुळव्याधाच्या मुळावर बॅंड (रिंग) लावून मुळव्याधाच्या कोंबाचा रक्तप्रवाह बंद केला जातो. यामुळे काही दिवसांत कोंब बारिक होतो, सुकतो, कुजतो आणि लावलेल्या रिंगसह गळून बाहेर पडतो. रिंग बॅंडिंग (रिंग टाकणे), एकाच वेळी केवळ दोनच कोंबांवर बॅंड (रिंग) लावून उपचार करता येतात. ही प्रक्रिया सोपी असून रुग्ण उपचारानंतर त्याच दिवशी घरी जाऊ शकतो. उपचारानंतर संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते. ही बिनटाक्याच्या व विनाचिरफाड मूळव्याध उपचार पद्धती आहे महानिंब बीयांचे चूर्ण बनवून सकाळ – सायंकाळ जेवणाच्या अर्धा तास आधी साध्या पाण्याबरोबर ३ ग्रॅम चूर्ण घेतल्यास विशेष फायदा होतो .
- कायाकल्प तेलात किंवा जात्यादि तेलात सूती कपडा / कापूस तेलात भिजवून थोडी रात्री गुदा मार्गाच्या आत ठेवावा.
- नारळाच्या शेंड्या ( भुया ) जाळून राख बनवून चाळून घ्यावी . नारळाचे हे भस्म तीन – तीन ग्रॅम सकाळी , दुपारी उपाशी पोटी ताकाबरोबर आणि सायंकाळी कोमट पाण्याबरोबर घ्यावे . एकदाच घेतल्याने मूळव्याधीत अपेक्षित फायदा होतो .
- रुईचा चिक व हळद यांच्या मिश्रणाचा १ ठिबका रोज रात्री मूळव्यधावर लावावा.
क्रोयोसर्जरी अती थंड अश्या लिक्विड नायट्रोजनद्वारे मूळव्याधाचा कोंब गोठवला जातो. हा कोंब नंतर गळून जातो. आजकाल ही शस्त्रक्रिया खुप कमी प्रामाणात प्रचलित आहे, कारण या उपचारा नंतर गोठविलेल्या कोंबातून बरेच दिवस स्राव होत राहतो तसेच खुप दिवस वेदनाही होतात. उपचारानंतर गरम पाण्याचा शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते. ही बिनटाक्याच्या व विनाचिरफाड मूळव्याध उपचार पद्धती आहे
इन्फ्रारेड फोटोकोऑगुलेशन, या उपचार पद्धतीत इंफ्रारेड किरणांचा वापर केला जातो, ही किरणे मूळव्याधावर सोडली जातात, त्यामुळे उष्णता निर्मान होते, मुळव्याध जळून नष्ट होते. गुदद्वाराच्या आतील बाजुच्या मूळव्याध कोंबाच्या उपचारा साठीच या उपचार पद्धतिचा वापर केला जातो. उपचारानंतर गरम पाण्याचा शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते. मुळव्याद पुन्हा निर्माण होण्याचा प्रमाण या उपचारात कमी असतो. ही बिनटाक्याच्या व विनाचिरफाड मूळव्याध उपचार पद्धती आहे
तृतीय किंवा चतुर्थ अवस्थेतील मूळव्याधासाठी (कोंब मोठे असल्यास, गुदद्वाराच्या बाहेर येत असल्यास किंवा खूप जुनाट असल्यास) या पद्धतीच्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो.
या पद्धतीत भूल देऊन मूळव्याधीचे कोंब कापूण टाकतात.
या पद्धतीच्या शस्त्रक्रिये नंतर रुग्णाला ३-५ दिवसापर्यंत रुग्णालयात भर्ति व्हावे लागते.
शस्त्रक्रियेनंतर दिड ते दोन आठवडे ड्रेसिंग करावी लागते.
तसेच गरम पाण्याचा शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते.
लेझर लेसर किरणांचा मूळव्याधावर मारा केला जातो, लेसर किरणांच्या संम्पर्कात आल्यामुळे मूळव्याध जळून नष्ट होते. सध्या हिच उपचार पद्धती जास्ती प्रचलित आहे, यामध्ये कोणतीही चिरफाड केली जात नाही, तसेच टाकाही घेतला जात नाही. यामध्ये कमीत-कमी रक्तस्राव होतो. तसेच उपचारा नंतर रुग्ण त्याच दिवशी घरी जाऊ शकतो. १-२ दिवसांच्या आरामानंतर रुग्ण त्याची दैनंदिन कामे सुरू करू शकतो. या पद्धतीत गुदाच्या रिंगला अजिबात इजा होत नाही, त्यामुळे इतर मुळव्याधाच्या ऑपरेशन नंतर शौचाचा कंट्रोल जाण्याची भिती राहत नाही. लेझर सर्जरी ही नवीन ऑपरेशनची पद्धत, मूळव्याधाच्या रूग्णासाठी एक वरदानच आहे, या नंतर त्या मूळव्यधाच्या जागी पुन्हा मुळव्याध होत नाही.
महानिंब बीयांचे चूर्ण बनवून सकाळ – सायंकाळ जेवणाच्या अर्धा तास आधी साध्या पाण्याबरोबर ३ ग्रॅम चूर्ण घेतल्यास विशेष फायदा होतो .
- कायाकल्प तेलात किंवा जात्यादि तेलात सूती कपडा / कापूस तेलात भिजवून थोडी रात्री गुदा मार्गाच्या आत ठेवावा.
- नारळाच्या शेंड्या ( भुया ) जाळून राख बनवून चाळून घ्यावी . नारळाचे हे भस्म तीन – तीन ग्रॅम सकाळी , दुपारी उपाशी पोटी ताकाबरोबर आणि सायंकाळी कोमट पाण्याबरोबर घ्यावे . एकदाच घेतल्याने मूळव्याधीत अपेक्षित फायदा होतो .
- रुईचा चिक व हळद यांच्या मिश्रणाचा १ ठिबका रोज रात्री मूळव्यधावर लावावा.